Online Maid Safety Tips : आजकालच्या व्यग्र जीवनशैलीत ऑनलाईन ॲप्सच्या माध्यमातून मेड म्हणजेच घराच्या कामासाठी मदतनीस बोलावणे खूप सोपे झाले. परंतु, हे खरोखरच सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेकदा आपला हा निर्णय मानसिक ताण आणि असुरक्षिततेचे कारण बनतो. कारण- नुकतीच मुंबईतील खारमध्ये एक घरात ऑनलाईन बोलावलेल्या मेडने चोरी केल्याची घटना समोर आली. त्यामुळे ऑनलाईन मेड बोलावताना आपण कशी काळजी घेतली पाहिजे, याबाबत काही सोप्या गोष्टी आपण जाणून घेऊ…

ऑनलाईन मेड बोलावणे आले अंगाशी…

हल्ली अनेक जण तब्येत बरी नसल्याने किंवा इतर काही कारणांमुळे क्लीनिंग ॲपवरून घरातील कामांसाठी (जसे की कपडे व्यवस्थित करणे आणि साफसफाई) एक मेड बुक करतात. पण या मेड कुठून आल्या, त्या काय करतात याची कोणालाच माहिती नसते. अशा वेळी थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण अनेकदा मेडसह भांडण होते, काम न आवडल्यास आपण रागात काही बोलतो अशाने परिस्थिती बिघडू शकते. काहीवेळी कोण कोणत्या उद्देशाने घरात आलं हे समजत नाही, त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगा, ट

अशी परिस्थिती उद्भवल्यास त्वरित काय करावे?

शांत राहा: ओरडणाऱ्या व्यक्तीसमोर राग दाखवल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. आपला आवाज मर्यादित ठेवा आणि सरळ शब्दांत त्यांना जाण्यास सांगा.

वादापासून दूर राहा : अशा परिस्थितीत वाद लांबवण्याऐवजी ॲपवर काम ‘कम्प्लीट’ दाखवून किंवा ओटीपी देऊन त्यांना त्वरित बाहेर घराबाहेर जाण्यास सांगा, जेणेकरून त्यांच्याकडे थांबण्याचे कोणतेही कारण राहणार नाही.

एकटे राहणे टाळा : जर तुम्ही आजारी किंवा एकटे असाल, तर अशा वेळी तुमच्या एखाद्या शेजाऱ्याला किंवा कुटुंबातील सदस्याला घरी बोलावून घ्या, जेणेकरून मेडला असे वाटणार नाही की, तुम्ही घरात पूर्णपणे असहाय आहात.

[टीप : बुकिंग करण्यापूर्वी नेहमी त्या प्रोफाईलचे रेटिंग आणि पूर्वीच्या ग्राहकांच्या कमेंट्स (अभिप्राय) काळजीपूर्वक वाचा.]