Cardamom Kitchen Hack: भारतीय स्वयंपाकघरात वेलचीचं स्थान नेहमीच खास राहिलं आहे. गोड पदार्थांपासून मसालेदार भाजीपर्यंत एकच वेलची सगळ्याच पदार्थांची शान वाढवते. तिचा सुगंध इतका मोहक आहे की, जेवणाची इच्छा दुप्पट होते. पण तुम्हाला ठाऊक आहे का, हीच वेलची स्वयंपाक करताना गॅसवर फक्त २ मिनिटं ठेवली तर ती अशी कमाल करते की अनेक गृहिणींचा डोक्याला हात लागला आहे?
सध्या सोशल मीडियावर असा एक भन्नाट ‘किचन जुगाड’ व्हायरल होत आहे, ज्याने लाखो महिलांना आश्चर्यचकित केलंय. पदार्थाचा सुगंध वाढवण्यासाठी आपण नेहमीच वेलची पदार्थात घालतो, पण तिची खरी जादू ती वापरण्याआधी कशी उलगडते हे अनेकांना माहितीच नव्हतं.
एका गृहिणीने यूट्यूबवर दाखवलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक अक्षरशः दंग झाले आहेत. ती सांगते,
“वेलची वापरण्यापूर्वी गॅसवर किंचित गरम करा… मग पाहा तिचा सुगंध आणि कुरकुरीतपणा कसा दुप्पट होतो!”
गॅसवर वेलची ठेवली की काय होतं?
जेवण बनवत असताना गॅसच्या कोपऱ्यात दोन वेलच्या ठेवायच्या… एवढंच काम! २-३ मिनिटांनी त्या हलक्या गरम होतात आणि मग वेलची पुन्हा कुरकुरीत आणि ताजी वाटते. हाताने दाबली की लगेच नाजूकपणे तुटते. तिच्या दाण्यांचा सुगंध प्रचंड वाढतो. पूड करणे अगदी सोपं होतं आणि पदार्थाची चव अगदी सुगंधाने भरलेली, रेस्टॉरंट-स्टाईल!
नाहीतर घरात ठेवलेली वेलची काही दिवसांत नरम, ओलसर आणि बेस्वाद होते; ती हातात घेतली तरी ‘त्या’ खास सुगंधाचा पत्ता नसतो. पण, हा छोटासा जुगाड म्हणजे गेमच बदलून टाकणारा.
वेलची म्हणजे घरचं औषध!
वेलची ही केवळ चव वाढवणारा मसाला नाही, तर अनेक घरगुती आजारांवर उपयुक्त ठरणारी नैसर्गिक औषधी वनस्पती आहे.
- तोंडाची दुर्गंधी होते दूर
वेलचीतील नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुण दुर्गंधी निर्माण करणारे जंतू नष्ट करतात.
- रक्तदाब नियंत्रणात
त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि ड्युरेटिक घटक रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात.
- पचनसंस्था मजबूत
अपचन, ॲसिडिटी, गॅस किंवा बद्धकोष्ठता वेलची पचन सुधारण्यात फार उपयुक्त.
- सर्दी-खोकल्यावर आराम
वेलची छातीत साचलेला कफ हलका करते आणि श्वसन सुधारते.
‘Avika Rawat Foods’ या यूट्यूब चॅनेलवर हा जुगाड दाखवणारा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर महिलांनी अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
काही म्हणाल्या, “आम्ही तर इतकी वर्ष वेलची तशीच वापरली… पण हा उपाय भन्नाट!” तर काहींचा प्रतिसाद, “गरम वेलचीचा सुगंध इतका अप्रतिम आहे की आता तिच्याशिवाय चहा करणंच अशक्य!”
तर मग पुढच्यावेळी लक्षात ठेवा… वेलची फक्त चहात, खिरीत किंवा बिर्याणीत घालायची नसते… ती आधी हलकीशी गरम करा आणि मग पाहा चव, सुगंध, ताजेपणा आणि आरोग्य… सगळंच एकाच वेळी मिळतं.
येथे पाहा व्हिडीओ
हा छोटासा जुगाड आजमावून पाहा, एकदा वापरला तर पुन्हा मागे वळून पाहावंसं वाटणार नाही!
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)
