Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य यांनी सामाजिक कल्याणासाठी एक धोरण तयार केलं होतं, ज्याला ‘चाणक्य नीति’ असं म्हणतात. या धोरणात करिअर, यश, संपत्ती, मैत्री, प्रेमसंबंध, सन्मान आणि वैवाहिक जीवन यासह जवळपास प्रत्येक विषयाशी संबंधित सूचना देण्यात आल्या आहेत. असं मानलं जातं की चाणक्याची धोरणं आजही तितकीच प्रासंगिक आहेत जितकी हजारो वर्षांपूर्वी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आचार्य चाणक्यजींनी त्यांच्या नीतिशास्त्रात स्त्रियांबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे. आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की, स्त्री एखाद्या व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते, मग ती आई म्हणून असो किंवा बहीण, मुलगी, मित्र आणि पत्नी म्हणून. स्त्रियांमध्ये तिच्या गुणांनी माणसाचं नशीब बदलण्याची ताकद असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या स्त्री मध्ये असे गुण असतील तर लग्नानंतर तिच्या पतीचे भाग्य खुलते.

हे गुण स्त्री मध्ये असावेत-

संतोष : आचार्य चाणक्य यांच्या मते स्त्री मध्ये समाधानाचा गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण समाधान हा सुखी जीवनाचा पाया आहे. संतोषी स्त्री नेहमी कुटुंबाला जोडून ठेवते. तसंच, अशी महिला प्रत्येक कठीण प्रसंगात आपल्या पतीची साथ देते.

धार्मिक विचार असलेली स्त्री: आचार्य चाणक्यजी मानत होते की, ज्या घरात रोज पूजा केली जाते, तिथे देवी लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे ज्या महिला धार्मिक स्वभावाच्या असतात, त्यांच्या पतीचे भाग्य खुलते.

शांत राहणे : आचार्य चाणक्य यांनी क्रोध हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं सांगितलं आहे. आचार्य चाणक्यजी मानतात की, जी स्त्री रागवत नाही, ती आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असते. कारण क्रोधामुळे तुम्ही सर्व काही नष्ट करू शकता.

आणखी वाचा : Venus Transit 2021: मकर राशीत प्रवेश करणार शुक्र, या ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

गोड बोली : चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की ज्या स्त्रियांची वाणी गोड असते ती आपल्या पतीचे भाग्यही बदलू शकते. कारण गोड बोलून घरातील वातावरण नेहमी आनंदी आणि सुखी राहतं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारत राहते.

आणखी वाचा : Vastu Tips : लग्न उशीरा होण्याचं कारण असू शकतं वास्तुदोष, या उपायांनी दोष दूर करा

संयम बाळगणारी स्त्री: आचार्य चाणक्यजी मानतात की, जीवनात यश मिळवण्यासाठी संयम बाळगणे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच महिलांमध्ये हा गुण आवश्यक मानला जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women with these qualities can change their husband life chanakya niti prp
First published on: 05-12-2021 at 21:31 IST