Happy International Women’s Day 2026 : ‘जागितक महिला दिन’ दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जात आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक स्त्री, जी लेक, आई, बहीण, बायको, मैत्रीण किंवा अगदी कर्मचारी अशा वेगळ्या रूपात आपल्यासमोर आयुष्य जगत असते. २४ तास काम, रोज एक्स्ट्रा ड्युटी करते, तिला कधीच सुट्टी नसते. तरीही चेहऱ्यावर तिच्या नेहमीच हसू असते. मग आजच्या खास दिवशी तर तिचे आभार आपण वेळ काढून मानायला हवेत नाही का?

तुमच्या ओळखीतली सर्व महिलांना फक्त ‘हॅप्पी वूमन्स डे’ म्हणण्यापेक्षा छान छान मराठमोळ्या शब्दांमध्ये शुभेच्छा द्या. सध्या कोणत्याही सण-उत्सवाच्या निमित्ताने सर्वांत आधी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट केले जातात. आपण स्वतःही असे फोटो एडिट करून बनवू शकता. पण, तुमचे कष्ट वाचवण्यासाठी आम्हीच तुमच्यासाठी काही खास मराठमोळ्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. खाली महिला दिनानिमित्त विशेष सुंदर मराठी गाणी, कवितांमधील ओळी निवडून शुभेच्छा तयार केल्या आहेत, ज्या तुम्ही डाऊनलोड करून, तुमच्या सोशल मीडियावर मोफत शेअर करू शकता.

ती मुलगी आहे, ती बहीण आहे,
ती आई आहे, ती बायको आहे,
ती आजी आहे, ती मैत्रीण आहे
ती जन्म आहे, ती माया आहे,
ती सुरुवात आहे आणि तीच शेवट आहे,
ती नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

रेल्वेच्या धक्काबुक्कीतून प्रवास करते
घरी येऊन सगळ्यांना पोटभर खाऊ घालते
कोणी मुद्दाम आवाज वाढवला
तर ‘अरे ला’, ‘का रे’ करण्याची हिंमत ठेवते
स्त्री हीच खरी सगळ्यांची ताकद असते
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईच्या त्यागाला
बहिणीच्या प्रेमाला
मैत्रिणीच्या विश्वासाला
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला मनाचा मुजरा
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या उपकाराचे जगी तोड नाही
कितीही काम केली तरीही थकवा मात्र चेहऱ्यावर दिसत नाही
अशा प्रत्येक कष्टकरू स्त्रियांना
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्त्रियांना द्या इतका मान की, वाढेल आपल्या देशाची शान
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती वेगळ्या रूपात दिसते
कधी आई, बहीण तर कधी मैत्रीण असते
सगळ्यांची ताकद, सगळ्यांची प्रेरणा असते
एक स्त्री म्हणून ती नेहमी तुमच्या पाठीशी उभी असते
जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

इंग्रजीत म्हणतात Women
मराठीत म्हणतात महिला
तुझ्याचमुळे सखे
आम्ही श्वास घेतो पहिला
जागतिक महिला दिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा!

तुझ्यामुळे जन्म झाला
पाहिले हे जग
फक्त कुटुंबासाठीच नाही, कधीतरी स्वतःसाठीही जग
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“प्रत्येक स्त्रीला, तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला,
तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला सलाम
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !”

जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला,
अशा प्रत्येक ‘ती’ला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लोकसत्ता.कॉमच्या वतीने सर्व महिलांना मनापासून सलाम!