काही दिवसांनी नवरात्री सुरू होत आहेत. त्यानंतर दसरा आणि दिवाळी…फेस्टीव्ह सीजनमध्ये आपल्या लूकमध्ये नवनवीन प्रयोग करायला प्रत्येकालाच आवडते. लूकमध्ये बदल करायचा असेल तर सुरूवात ही केसांपासून होते. आपल्या केसांना काहीतरी करावं, अशी हुक्की सर्वांनाच येत असते. आधी केसांना रंगवण्यासाठी फक्त काळा रंग वापरला जायचा. पण आता हेअर कलरमध्ये लेटेस्ट ट्रेन्डी मोरपंखी, मिळा, पिवळा, चेस्टनट कलर, डार्क चॉकलेट शेड, रेड, कॉपर रेड, पर्पल, हनी ब्लॉण्ड, खाकी ब्राऊन, पिंक, ग्रीन, यासारखे नवनवे हेअर कलर मार्केटमध्ये आले आहेत. तसंच सिल्वर, ब्लॉण्ड, कारमेल हे हेअर कलर सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

यातही पूर्ण केस हेअर कलर करावेत का, हाय लाईटनिंग करावेत की आणखी काही असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असतील. हल्लीच्या ट्रेंडप्रमाणेच कुठल्या रंगाचं हेअर कलर तुम्हाला परफेक्ट होईल, याचाही विचार करणं गरजेचं आहे. हेअर कलर निवडताना सुरूवातीला तुमचा चेहरा कसा आहे, आकार कसा आहे, तुमचं व्यक्तीमत्व कसं आहे, काय काम करता याचाही विचार आवर्जून करा.

इंडियन स्कीनसाठी चेस्टनट कलर आणि डार्क चॉकलेट शेडचे कलर परफेक्ट वाटतात. हा कलर आपल्यावर उठून दिसतो आणि तो फॅशनेबलही दिसतो. आपल्या त्वचेचा रंग पाहून हेअर कलर निवडणं कधीही चांगलं. जर तुमची त्वचा हलक्या पिवळसर रंगाची असेल तर डार्क हेअर कलर निवडा. त्यामूळे तुमच्या केसांना नॅचलर लूक मिळतो. जर तुमची त्वचा गोरी असेल तर कोणताही रंग तुम्हाला चांगला दिसेल. तुम्ही कोणत्याही शेडचे हेअर कलर उठून दिसतील. जर तुमची त्वचा गुलाबी रंगाची असेल तर सोनेरी हेअर कलर वापरणं टाळा. तसंच हेअर कलर लावताना ऐश टोनचा वापर नक्की करा.

आपल्या केसांना सुपर स्टायलिश लूक कसा मिळेल याचे काही तंत्र जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्यासाठी सुपर स्टायलिश लूक मिळवण्यासाठी इथे काही ट्रेन्डी स्टाईल आम्ही सांगत आहोत.

हायलाईट:
हल्लीच्या ट्रेन्टी हेअर कलरसाठी ही सर्वात लोकप्रिय स्टाईल आहे. या स्टाईलमध्ये तुम्ही मध्यम, डार्क आणि हलका टेक्स्चर असलेले हेअर कलर वापरू शकता. आपल्या पसंतीनुसार, तुम्ही हे आपल्या केसांवर पूर्ण किंवा केसांच्या काही भागावर लावू शकता.

स्लाईस:
स्लाइसिंग ही एक ट्रेन्डी फॅशन आहे. केसांचा साधारणतः 1/8 इंचची केसांची पट्टी जाडीच्या फॉइलमध्ये हायलाइट केली जाते. केसांच्या जाड पट्टीसह हायलाइट केलेले केस अधिक सुंदर दिसतात आणि अधिक आकर्षक दिसतात. थीकर स्लाईससोबत ही स्टाईल अप्रतिम दिसते. यात हलका, मध्यम किंवा डार्क हेअर कलर आपण वापरू शकतो.

बालेयाज
करीना कपूर, दीपिका पदुकोण आणि इतरांसारख्या अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी त्यांच्या फॅशनेबल हेअर कलरमध्ये अलीकडेच या ट्रेन्डी स्टाईलची निवड केली आहे. आपल्या केसांना नॅचलर लूक देणारा हायलाइट इफेक्ट देणारा हा ट्रेंड आहे. “बालेयाज” हा प्रकार पश्चिम देशांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. या स्टाईलला भारतातील अनेक सेलिब्रिटी वापरताना दिसून येत आहेत.

ओंब्रें
ओंब्रें स्टाईल सध्या कॉलेजमधील तरूणींपासून ते ऑफीसमध्ये जाणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांची आवडती स्टाईल आहे. केसांच्या अर्ध्या भागाला कलर करण्याच्या या स्टाईलला ओंब्रे म्हणतात. यात साधारण हलका, तपकिरी आणि सोनेरी रंगाला प्रत्येक महिला पसंती देताना दिसून येत आहेत. यात तुम्ही केसांना दोन वेगवेगळ्या रंगानी रंगवू शकता. यातला एक रंग हा हलका आणि दुसरा रंग हा डार्क ठेवा.

सोंब्रे
सोंब्रे हा फेस्टीव्ह सीजनमध्ये सर्वात जास्त पसंती मिळत असलेली हेअर कलर स्टाईल आहे. बालेयाज आणि ओंब्रे यांची एकत्रित केलेली ही स्टाईल आहे. या स्टाईलमध्ये हेअर कलर केसांच्या मुळांपासून शेवटपर्यंत लावले जाते. ही स्टाईल तुमच्या लूकला आणखी जास्त आकर्षण देऊन तुमचा एकूणच चेहरा मोहरा बदलू शकतो.

फेस फ्रेमिंग बालेयाज
या स्टाईलमध्ये तुमच्या चेहऱ्याला कव्हर करणारे समोरील केस आणि गळ्याभोवती येणारी केस हेअर कलरने रंगवून आकर्षित केले जातात. चेहऱ्यासमोर येणाऱ्या केसांची पट्टी घेऊन त्यांना कलर केलं जातं. या स्टाईलमुळे तुमचा चेहऱ्याला जास्त ग्लॅमरस लूक येतो.

अंडरहायलाईट्स
हा ट्रेन्ट सध्या अनेक मुली आणि महिला वापरताना दिसून येत आहेत. यात मुख्यतः फंकी, चमकदार रंगांसह स्ट्रँड हायलाइट केले जातात. कानामागुन येणाऱ्या केसांची जाड पट्टी आणि मानेच्या खालून येणाऱ्या केसांच्या खालच्या भागाला हेअर कलर केलं जातं. हायलाइट केलेल्या केसांचा रंग स्टाईलवर अवलंबून दिसू शकतो किंवा लपवता येतो.