Office Bag Essentials For Working Women: कामावर जाणाऱ्या महिलांना घरातल्या आणि ऑफिसमधल्या कामाच्या गडबडीत स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. अशात त्यांना आवश्यक गोष्टी रोजच्या बॅगेत ठेवल्यास गरजेच्या वेळी त्या उपयोगी येऊ शकतात. कामावर जाणाऱ्या महिलांनी बॅगेत कोणत्या गोष्टी ठेवाव्या जाणून घ्या.
ऑफिसच्या बॅगेत या गोष्टी आठवणीने ठेवा:
चार्जर
घराबाहेर पडताना चार्जर घेण्याचे नेहमी लक्षात ठेवा. फोन सतत वापरल्याने बॅटरी लगेच संपू शकते. अशावेळी तुमच्याकडे चार्जर असल्यास फोन सुरू ठेवण्यास मदत मिळेल आणि इतरांचे चार्जर वापरल्याने फोन खराब होणार नाही.
आणखी वाचा: चहा करून पावडर फेकून देताय? त्याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
सेफ्टी पिन
ट्रेन मधून किंवा गर्दीतून प्रवास करताना महिलांना कधीकधी कपडयांबाबत अडचणी निर्माण होतात. अशावेळी सेफ्टी पिन खुप मदत करते. त्यामुळे ऑफिसच्या बॅगेत नेहमी सेफ्टी पिन ठेवा.
सॅनिटरी पॅड
मासिक पाळीची तारीख जवळ आली असेल किंवा त्याआधी देखील तुमच्याजवळ सॅनिटरी पॅड असणे आवश्यक आहे. त्यामुळे ऐनवेळी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
आणखी वाचा: घराच्या खिडकीत कबुतरांनी मांडलाय उच्छाद? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून लगेच पळवून लावा
रुमाल किंवा टिशू
मेकअप करणाऱ्या महिलांना विशेषतः मेकअप स्प्रेड झाल्यास रुमाल किंवा टिशूची गरज भासते. यासाठी रुमाल किंवा टिशू जवळ ठेवा.
हेडफोन
अनेकदा मिटिंगमधील रेकॉर्डिंग किंवा व्हॉइस नोट्स शेअर केल्या जातात, त्या ऐकण्यासाठी तुम्हाला हेडफोनची गरज भासू शकते. त्यामुळे ऑफिसच्या बॅगमध्ये आठवणीने हेडफोन ठेवा.