१४ जून रोजी जगभरात जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो. यंदाच्या ‘जागतिक रक्तदाता दिना’ची थीम ‘रक्तदान हे एकतेचे कार्य आहे’ अशी आहे. रक्तदानाला महादान असे म्हटले जाते, कारण या उदात्त कार्यातून रक्ताअभावी मृत्यूच्या जवळ पोहचलेल्या लोकांना नवसंजीवनी मिळते. या दिवशी रक्तदानाची गरज, महत्त्व, फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. योग्य वेळी रक्तदान करून तुम्ही अनेकांना नवजीवन देऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमचे वय १८ वर्षांहून अधिक असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता, मात्र रक्तदान करण्यापूर्वी आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तविक, रक्तदान केल्यानंतर काही लोकांना चक्कर येणे, थकवा येणे किंवा अशक्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत, रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर निरोगी अन्न खाण्याची खात्री करावी. चला जाणून घेऊया, रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये, जेणेकरून तुम्हाला अशक्तपणा किंवा चक्कर येण्याची समस्या होणार नाही.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

  • हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, तुम्ही रक्तदान करणार असाल तर रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर स्वतःला हायड्रेट ठेवा. भरपूर पाणी प्या, कारण शरीरातील रक्त पाण्यानेच बनलेले असते.
  • तसेच रक्त दिल्यानंतर लोहाचे अधिक सेवन करावे, कारण रक्त दिल्यानंतर शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते. शरीरात लोहाची पातळी कमी झाल्यामुळे थकवा जाणवू शकतो.

लोह हे एक अतिशय महत्त्वाचे खनिज आहे, जे शरीर हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी उपयुक्त असते. हिमोग्लोबिन तुमच्या फुफ्फुसातून तुमच्या उर्वरित शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार आहे. हिमोग्लोबिन फुफ्फुसातून ऑक्सिजन तुमच्या शरीराच्या इतर भागापर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदार आहे.

फ्लश करताना टॉयलेट सीटचे झाकण बंद ठेवावे की उघडे? संशोधनातून समोर आली माहिती

  • जर तुम्ही रक्तदान करणार असाल तर तुम्ही लोहयुक्त पदार्थ जसे चिकन, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या, रताळे, बीन्स, बीट, ब्रोकोली, इत्यादी हिरव्या भाज्या खाऊ शकता.
  • रक्तदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करू शकता. फळांच्या सेवनाने शरीर तर निरोगी राहतेच, पण अशक्तपणा आणि थकवा दोन्हीही दूर होतात. अशा परिस्थितीत तुम्ही सफरचंद, डाळिंब, किवी, पेरू इत्यादी गोष्टींचे सेवन करू शकता.
  • रक्तदान केल्यानंतर तुम्ही सुका मेवा देखील घेऊ शकता. सुका मेवा हे आरोग्यदायी तर असतातच पण त्यामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. अशा वेळी त्यांच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. तसेच, थकवा देखील निघून जाऊ शकतो.

रक्तदान केल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या आहारात समाविष्ट कराव्यात ज्यात भरपूर ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड आणि लोह असते. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात अ‍ॅनिमिया होऊ शकतो. त्याचबरोबर लोहाचे सेवन करून शरीराला अ‍ॅनिमियाच्या समस्येपासून वाचवता येते. अशा परिस्थितीत रक्तदान केल्यानंतर आवश्यक गोष्टींचा आहारात समावेश करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World blood donor day 2022 what to eat before and after blooddonation find out pvp
First published on: 14-06-2022 at 12:46 IST