World Brain Tumor Day 2023: दरवर्षी ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या ट्यूमरने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी दरवर्षी ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमरविरूद्धच्या लढ्यात जागरूकता वाढवणे, लक्षणे, वेळेवर उपचार आणि योग्य पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे.  ब्रेन ट्यूमरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या ट्यूमरने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमरविरूद्धच्या लढ्यात जागरूकता वाढवणे, लक्षणे, वेळेवर उपचार आणि योग्य पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. कारण असे केल्याने तुमच्या जगण्याची शक्यता वाढू शकते.

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय

प्राथमिक लेवलला मेंदूमध्ये गाठी येतात ज्या मेंदूच्या पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतात. या गाठी घातक कर्करोग असू शकतात. कर्करोग नसलेल्या ट्यूमरमुळे मेंदूच्या सामान्य ऊतींवर देखील परिणाम होऊ शकतो आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. जेव्हा कर्करोगाच्या पेशी फुफ्फुस, कोलन, मूत्रपिंड आणि स्तन यांसारख्या इतर अवयवांमधून मेटास्टेसिस करतात आणि मेंदूमध्ये पसरतात तेव्हा त्याला दुय्यम ब्रेन ट्यूमर किंवा ब्रेन मेटास्टेसिस म्हणतात.

Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?

ब्रेन ट्यूमर लक्षणे

  • चक्कर
  • मानसिक स्थितीत बदल
  • व्हिज्युअल समस्या
  • अशक्तपणा
  • डोकेदुखी
  • बेशुद्धी
  • मळमळ आणि उलटी
  • गोंधळ आणि चिडचिड

वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ लक्ष्मी लावण्य यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे सतत किंवा तीव्र डोकेदुखी सतावणे. डोकेदुखींसोबत मळमळ, उलट्या किंवा दृष्टी बदलणे यांसारखा अतिरिक्त लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे. पुढे, दृष्टीतील बदल जसे की अंधुक किंवा दुहेरी दृष्टी, परिधीय दृष्टी कमी होणे, किंवा प्रकाशाचा त्रास हे देखील ब्रेन ट्यूमरशी संबंधित लक्षणं असू शकतात. यामुळे स्मरणशक्तीवर, एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो, तसेत चिडचिडेपणा, मूड बदलणे किंवा भावनिक अस्थिरता यासारखे बदल घडतात असंही डॉ लक्ष्मी पुढे म्हणाल्या.

मेंदूतील ट्यूमर असलेल्या तरुण व्यक्तींमध्ये चालणे, समतोल राखण्यात अडचणी किंवा अडखळण्याची समस्या, यासह संतुलन आणि समन्वयाच्या समस्या देखील दिसून येतात. याव्यतिरिक्त, हात, पाय किंवा चेहऱ्यावर अशक्तपणा किंवा सुन्नपणा जाणवला, विशेषत: जर त्याचा शरीराच्या एका बाजूला परिणाम होत असेल तर, ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.

ब्रेन ट्यूमरचे प्रकार

शंभराहून अधिक ब्रेन ट्यूमर आहेत. ब्रेन ट्यूमरमध्ये मेंदूतील गाठी घातक किंवा सौम्य असू शकतात, अशी माहिती डॉ अशोक हांडे यांनी दिली आहे.काही ब्रेन ट्यूमर प्रामुख्याने मेंदूमध्ये किंवा त्याच्या आवरणांमध्ये किंवा कवटीच्या इतर संरचनांमध्ये उद्भवतात, तर काही शरीरात इतरत्र कर्करोगापासून पसरतात, ज्याला आपण मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमर असे म्हणतो. न्यूरो-इंटरव्हेंशनल सर्जर, डॉ. विपुल गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार ब्रेन ट्यूमरचा आकारावर त्याची लक्षणं बदलू शकतात.

ब्रेन ट्यूमरची कारणे आणि प्रतिबंध

न्यूरोफिब्रोमेटोसिस, टर्कोट सिंड्रोम, गोर्लिन सिंड्रोम, ट्यूबरस स्क्लेरोसिस आणि ली-फ्रॉमेनी सिंड्रोम यांसारखे दुर्मिळ अनुवांशिक ब्रेन ट्यूमरच्या स्पेक्ट्रमशी संबंधित असू शकतात, डॉ शैलेश म्हणाले. “ब्रेन ट्यूमर असलेल्या ५ ते १० टक्के व्यक्तींना अनुवांशिकतेने तो त्रास होतो. जर एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले असेल, तर ते अनुवांशिक आहे.

हेही वाचा – Hair Care Tips: केस गळतीने वैतागला आहात? एकदा फक्त अशाप्रकारे लंवग पाणी केसांना लावा

निदान आणि उपचार

सर्वपर्थम तरुणांनी ब्रेन ट्यूमरची लक्षणे ओळखली पाहिजेत. कोणतीही लक्षणे कायम राहिल्यास, निदानासाठी न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे चांगले आहे. या संभाव्य चिन्हांबद्दल जागरूक राहून वेळेवर वैद्यकीय मदत घेतल्यास यातून तरुण बाहेर येऊ शकतात. सर्व ब्रेन ट्यूमरवर शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही, असे डॉ. हांडे यांनी सांगितले