जागतिक स्तनपान सप्ताह २०२१: कामावर जाणाऱ्या मातांसाठी स्तनपान एक आव्हान!

कामावर जाणाऱ्या मातांसाठी स्तनपान एक आव्हान आहे. काही गोष्टीमुळे या आव्हानावर तोडगा नक्कीच निघू शकतो.  

World Breastfeeding Week 2021 challenges faced by working women
जागतिक स्तनपान सप्ताह २०२१ (Photo: Reuters)

‘जागतिक स्तनपान सप्ताह’ याची मूळ संकल्पना व जागतिक समन्वय वाबा (WABA:World Alliance of Breastfeeding Action) या संस्थेची आहे. १९९२ मध्ये पहिला जागतिक स्तनपान सप्ताह साजरा झाला. १-७ ऑगस्ट या काळात दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह अनेक देशांमध्ये साजरा होतो. नवीन मातांना स्तनपानासाठी पाठिंबा आणि प्रोत्साहनाची आवश्यकता असते. बाळाच्या जन्माच्या एका तासात बाळाला पहिले स्तनपान मिळावे याची खात्री करणे केवळ आईचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. स्तनपान हा पर्याय नसून संकल्प आहे. कामावर जाणाऱ्या मातांसाठी स्तनपान एक आव्हान आहे. काही गोष्टीमुळे या आव्हानावर तोडगा नक्कीच निघू शकतो.

कामावर जाणाऱ्या मतांनी या गोष्टी लक्षात घ्या.

  • सर्व क्षेत्रातील कामकाजी मातांना म्हणजे कामावर जाणाऱ्या मातांना प्रसूती रजा महत्त्वाची आहे. निदान बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त काळ रजा मिळाल्यास उत्तम.
  • तत्सम सुविधा (हिरकणी कक्ष), पाठींबा व मदत मिळेल यासाठी कार्यालयांनी तत्पर असावे.
  • रजा मिळणे शक्य नसेल तर अर्ध वेळ काम, आठवड्यातून ३ दिवस काम, जवळच्या शाखेत बदली, घरून काम अशा पर्यायांचा विचार व्हावा.
  • रजा शक्य नसेल तर अतिरिक्त दूध घरी साठवून ठेवावे व कामाच्या जागी दूध काढण्याची व साठवण्याची सोय असल्यास दूध साठवून घरी आणावे. दूध न काढल्यास छाती कडक होऊ शकते तसेच थोड्या दिवसांनी दूध कमी होते.
  • आई बाळाजवळ नसते तेव्हा हे दूध वाटी-चमच्याने पाजता येते.
  • कामाच्या वेळेत शक्य असल्यास घरी येऊन स्तनपान करावे.
  • कामाच्या ठिकाणी बाळ नेऊन सांभाळता आल्यास स्तनपानाचा प्रश्न सहज सुटेल.
  • रात्रीच्या वेळी जास्त स्तनपान दिल्यास दिवसा बाळ साहजिकच दूध कमी मागेल.
  • सध्या कोविडमुळे घरून कामाची संकल्पना चांगलीच रुजली आहे. त्यामुळे काम करतानाही आई बाळाला दूध पाजू शकते.

या क्षेत्रातील डॉक्टर आणि जाणकार  सौ. स्वाती टेमकर, लॅक्टेशन कंंसल्टंंट बीपीएनआय महाराष्ट्र आणि  डॉ प्रशांत गांगल यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे.

(त्याचप्रमाणे याविषयी प्रथम आपण आपले फॅमेली डॉक्टर व याविषयातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा. )

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: World breastfeeding week 2021 challenges faced by working womens ttg