आपल्यापैकी सर्वांनाच नारळाच्या आश्चर्यकारक आणि आपल्या आरोग्यासाठीच्या फायद्यांबद्दल माहिती असेलच. एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटीच्या (APCC) स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २ सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन अर्थात World Coconut Day साजरा केला जातो. APCC चं मुख्यालय हे जकार्ता इंडोनेशिया येथे आहे. भारतासह सर्व प्रमुख नारळ उत्पादक देश APCC चे सदस्य आहेत. पण २ सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय नेमका का घेतला गेला? याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

जागतिक नारळ दिन हा फक्त नारळाचा नाही तर त्याचं उत्पादन करणाऱ्या लोकांसाठी देखील महत्त्वाचा आहे. आपल्याकडे नारळाची लागवड करणाऱ्या उत्पादकांना येणाऱ्या अडचणींविषयी फारशी जागरूकता नाही. APCC चे सदस्य असलेल्या देशांतील नारळ उत्पादक गरिबी आणि इतर अनेक आव्हानांचा सामना करतात. भारताचा विचार करायचा झाला तर या उत्पदकांना चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागतं. त्याचसोबत, आपल्या उत्पादनासाठी किमान किंमत मिळवणं हे देखील त्यांच्यासाठी मोठं आव्हानात्मक काम आहे.

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

पुरवठा अधिक, मागणी कमी

नारळ उद्योगाची एक समस्या अशी आहे की, अनेक वेळा पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त असतो. अलिकडच्या वर्षांत नारळाच्या आरोग्य फायद्यांविषयी जागरूकता वाढली आहे. मात्र, तरीही असं दिसतं की नारळाची वाढणारी लोकप्रियता देखील इतकी पुरेशी नाही. आपल्या आहारात आणि जीवनात आपल्याला नारळाचा वापर अधिकाधिक प्रमाणात वाढवणं गरजेचं आहे. हे मोठ्या प्रमाणावर तेव्हाच होऊ शकतं त्याच्यापासून आपल्याला असणाऱ्या फायद्यांचं ज्ञान प्रत्येकाला असेल.

नारळ उद्योग हा संथ आणि स्थिर गतीने वाढत आहे. या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. यामध्ये छोट्या शेतकरी आणि उत्पदकांना प्रोत्साहित करणं आणि गुंतवणुकीच्या अधिक संधी निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. नारळ उद्योगाची वाढ म्हणजे त्याच्याशी निगडित प्रत्येक घटकाची वाढ आहे. यामुळे अनेक उत्पादक/शेतकरी कुटुंबांना गरिबीचा सामना करण्यास मोठी मदत होईल.

पहिल्यांदा कधी साजरा झाला?

जागतिक नारळ दिन २००९ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी शेतकरी, तज्ज्ञ आणि व्यवसाय मालक मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर नारळाविषयी जागरूकता वाढवणं हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. नारळाबद्दल वाढलेली जागरूकता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य किंमत मिळण्यास आणि पुरवठा आणि मागणीमधील तफावत दूर करण्यास निश्चित मदत करेल. त्याचप्रमाणे नारळ उद्योग वाढण्यास याची मदत होईल.

या दिवशी आपण सर्वांनी नारळाबद्दल अधिक जाणून घेण्यासोबत आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर अधिकाधिक वाढवण्याची आवश्यकता आहे. मग यानिमित्ताने आपल्या खाद्यपदार्थांमधला नारळाचा वापर वाढवता येईल किंवा नारळापासून बनणाऱ्या विविध उत्पादनांच्या मदतीने आपली त्वचा, केस आणि आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात करता येईल.

नारळाचे फायदे

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष आणि नारळाला आपण श्रीफळ म्हणतो. नारळाच्या झाडाचा असा एकही भाग नाही कि जो उपयोगी ठरत नाही. यावरून आपल्याला त्याचं महत्त्व किती मोठं आहे हे लक्षात येतच. नारळ हा व्हिटॅमिन, पोटेशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजांनी समृद्ध असतो. आपल्या शरीरासाठी देखील त्याचे अनेक चमत्कारिक फायदे आहेत.

  • उन्हाळ्यात नारळाच्या पाण्यासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. हे शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवून शरीराला हायड्रेटेड ठेवतं.
  • पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम देतं. नारळाच्या पाण्याने पोट्यातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ कमी होते.
  • नारळाच्या पाण्यात असलेल्या व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम, पोटॅशियमसारख्या पोषक घटकांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • नारळात ६१% फायबर असतं. हे आपल्या स्मरणशक्तीला वाढविण्यास देखील मदत करतं.
  • नारळाचे तेल स्वयंपाकासाठी सर्वात चांगलं आणि सुरक्षित मानलं जातं.
  • त्याचसोबत नारळाच्या तेल आपल्या केसांना अधिक निरोगी आणि चमकदार बनण्यास मदत करतं.
  • नारळ पाण्याला दररोज आपल्या चेहऱ्यावर लावल्याने मुरूम आणि डाग बरे होतात.

देशातील प्रमुख नारळ उत्पादक राज्यांमध्ये ‘आसाम’चाही समावेश

भारतात नारळ विकास मंडळ हे (Coconut Development Board) जागतिक नारळ दिनानिमित्त देशाच्या विविध भागात विविध कार्यक्रम आयोजित करतं. या प्रसंगी नारळाचं उत्पादन, उद्योग आणि नारळाशी संबंधित इतर उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. २०१९ मध्ये, देशातील नारळ दिनासाठीचा कार्यक्रम आसाममध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान बोर्डाने आसामला भारतातील पुढील प्रमुख नारळ उत्पादन करणारे राज्य म्हणून घोषित केलं आहे. ईशान्य भारतातील सात राज्यांमध्ये सुमारे ३३,४९३ हेक्टरमध्ये नारळाची लागवड होते. तर एकट्या आसाममध्ये २०,३६८ हेक्टर लागवड होते.