करोना महामारीच्या जागतिक संकटानंतर खऱ्या अर्थाने प्रत्येकाला आरोग्याचं महत्त्व कळलं आहे. वजन कमी करण्यापासून आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा याची प्रत्येक जण काळजी घेताना दिसत आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध बरा ही म्हण आरोग्याच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. आज जागतिक आरोग्य दिन साजरं करत असताना आरोग्य आणि संतुलित जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. करोनानंतर विकार टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. आपण दररोज खात असलेल्या विविध पदार्थांमध्ये आपल्याला जीवनसत्व मिळतात. आता उन्हाळा सुरु असल्याने थकवा जाणवतो. या काळात तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.

  • ‘क’ जीनवसत्व असलेली फळे: लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि इतर अनेक पोषक तत्त्वे असतात. कामाच्या आधी किंवा उठल्यानंतर एक ग्लास मध लिंबू पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत होईल. यामुळे उर्वरित दिवसासाठी तुम्हाला ऊर्जा मिळेल.
  • फळांचा रस: ​​उन्हाळ्यात रोगांशी लढण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग नाही. ताज्या फळांचे रस नियमितपणे पिणे आवश्यक आहे. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.
  • दही: उन्हाळ्यात दही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हे केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवत नाही तर तुमचे पचन, हृदय आणि ऍलर्जी नियंत्रणात ठेवते. तुम्ही दुपारच्या जेवणासोबत साइड डिश म्हणून दह्याचा तुमच्या आहारात समावेश करू शकता किंवा त्यात थोडा मध टाकून मिष्टान्न म्हणूनही त्याचा आनंद घेऊ शकता.
  • ग्रीन टी: मसाला चहा आणि कॉफी यांसारख्या गरम पेयांना आरोग्यदायी पर्याय म्हणून ग्रीन टी लोकप्रिय आहे. ग्रीन टी केवळ वजन राखण्यात किंवा कमी करण्यात मदत करत नाही तर मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास देखील मदत करते. उन्हाळ्यात उबदार पेयांचा आस्वाद घेणाऱ्या लोकांसाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

World Health Day 2022: म्हणून साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन, जाणून घ्या सुरुवात कशी झाली ?

cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
seven ways to ensure you boost your water intake
Water Intake In Winter Season: हळदीच्या दुधात एक चिमूटभर काळी मिरी घातल्याने काय फायदा होतो? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Health tips diet advice from social media influencers can be harmful
तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा; शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
  • आले: आले आरोग्यवर्धक आहे. यात पोषणमूल्य खूप जास्त असते आणि ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. शरीराला कोणत्याही आजारांपासून किंवा रोगांच्या वाहकांपासून संरक्षण करण्यास मदत करते. तुमच्या फळांच्या किंवा भाज्यांच्या रसामध्ये काही आले मिसळून त्याचे सेवन केले जाऊ शकते.
  • लसूण: आल्याप्रमाणेच लसूण देखील आरोग्यवर्धक आहे. तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. लसणामध्ये उत्कृष्ट उपचार गुणधर्म आहेत.
  • बटण मशरूम: बटन मशरूममध्ये रिबोफ्लेविन आणि नियासिनचे प्रमाण जास्त असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तुम्ही मशरूम करी बनवून किंवा ब्रेकफास्ट टोस्टसाठी टॉपिंग म्हणून तुमच्या आहारात बटन मशरूमचा समावेश करू शकता.
  • रताळे: रताळे हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे. बटाट्याचा हा एक आरोग्यदायी पर्याय आहे .

Story img Loader