scorecardresearch

World Health Day 2022: दैनंदिन जीवनात लावा ‘या’ ५ सवयी, अन् रहा तंदुरुस्त!

चांगल्या आयुष्यासाठी तंदुरुस्त राहणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या काळाच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेऊ शकत नाही.

जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजरा केला जातो. (photo credit: indian express)

जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस १९४८ मध्ये सुरू करण्यात आल आहे. ज्याचा उद्देश आरोग्याशी संबंधित प्रत्येक समस्येबद्दल लोकांना जागरूक करणे हा आहे. चांगल्या आयुष्यासाठी तंदुरुस्त राहणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या काळाच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेऊ शकत नाही आणि अनेक गंभीर आजारांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यासाठी उत्तम आरोग्यासाठी या ५ सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही निरोगी राहण्यासाठी अंगीकारू शकता.

उत्तम आरोग्यासाठी या ५ सवयी पाळा

निरोगी आहार घ्या

निरोगी राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. दैनंदिन आहारात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. याशिवाय जंक फूड, फास्ट फूड, साखर, कोल्ड्रिंक्स यांचे सेवन कमी करा.

शरीर हायड्रेटेड ठेवा

शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून दिवसातून किमान ८ ते ९ ग्लास पाणी प्या. कारण शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे, असे न केल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील बहुतांश घाण निघून जातात.

पुरेशी झोप घ्या

तुमचे दैनंदिन जीवन कितीही व्यस्त असले तरी ७ ते ८ तासांची झोप घेणे फार महत्वाचे आहे. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने तर राहाल, पण तणावापासूनही दूर राहाल. हे करणे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

नियमित व्यायाम करा

जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल आणि शरीरात फॅक्ट वाढू द्यायची नसेल तर नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. चालणे, जॉगिंग, पोहणे आणि जिममध्ये जाण्याचे पर्याय आहेत.

धुम्रपान आणि मद्यपानपासून दूर राहा

धुम्रपान आणि मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. जर तुम्हाला याचे व्यसन लागले असेल तर आजच ते सोडून द्या कारण यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World health day 2022 these 5 good habits can change your life keep away from various disease scsm

ताज्या बातम्या