World Heart Day 2023: जागतिक हृदय दिन हा दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि या आजारांचा जागतिक प्रभाव कमी करण्यासाठीच्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी तो साजरा केला जातो. हृदयाच्या आरोग्याबाबत लोकांना जागरूक करणे हा जागतिक हृदय दिनाचा मुख्य उद्देश आहे.

जागतिक हृदय दिनाचा इतिहास –

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

१९९८ मध्ये, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी इंटरनॅशनल कार्डिओलॉजी फेडरेशनमध्ये विलीन झाल्यानंतर वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) अस्तित्वात आले. प्रोफेसर अँटोनियो बायस डी लूना (Antonio Bayés de Luna) हे १९९७ ते १९९९ पर्यंत WHF चे अध्यक्ष होते. त्यांनीच जागतिक हृदय दिन साजरा करण्याची कल्पना मांडली, कारण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हा एक महत्त्वपूर्ण जागतिक आजार बनला होता. पहिला जागतिक हृदय दिन २४ सप्टेंबर २००० रोजी साजरा करण्यात आला. २०११ पर्यंत सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा दिन साजरा केला जात होता. परंतु २०१२ पासून तो २९ सप्टेंबरला साजरा करण्यात येऊ लागला.

हेही वाचा- Health Special: हृदयविकाराचे प्रकार

जागतिक हृदय दिनाचे महत्त्व –

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVDs) च्या प्रतिबंधाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निमार्ण करण्याबाबत जागतिक हृदय दिन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. तसेच तो तंबाखू सेवन, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बैठी जीवनशैलीशी संबंधित धोक्यांकडे लक्ष वेधतो, जे हृदयरोग आणि स्ट्रोकमुळे अंदाजे ८० टक्के अकाली मृत्यूंना कारणीभूत ठरतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) हृदय-निरोगी जीवनशैलीच्या संकल्पनेला मूलभूत मानवी हक्क म्हणून प्रोत्साहन देते आणि जगभरात तिचा अवलंब करण्याचे समर्थन करते.

जागतिक हृदय दिन २०२३ ची थीम

जागतिक हृदय दिन २०२३ ची थीम ‘हृदयाचा वापर करा, हृदय जाणून घ्या’  (Use Heart, Know Heart) अशी आहे, जी आपल्या हृदयाला समजून घेऊन त्याची काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखीत करते. ही मोहीम आपल्याला आठवण करून देते की, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची खऱ्या अर्थाने कदर करू शकतो आणि त्याचे रक्षणही करू शकतो.

Story img Loader