आजच्या दिवशी जगभरात ‘जागतिक उच्च रक्तदाब दिन २०२२’ साजरा केला जातो. उच्चरक्तदाबाची सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की, जरी तो झाला तरी एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे हे लवकर कळत नाही. खरं तर, सुमारे एक तृतीयांश लोकांना उच्च रक्तदाब आहे हे माहित नाही, म्हणून या आजाराला ‘सायलेंट किलर’ असेही म्हणतात, त्याची लक्षणे लवकर लक्षात येत नाहीत. या आजाराची थकवा, कामाचा ताण यांसारखी लक्षणे आहेत. परंतु लोक याला सामान्य समस्या मानतात आणि याकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत, नियमित तपासणी करूनच, तुमचा रक्तदाब खूप जास्त आहे की खूप कमी आहे हे समजू शकते.

तुम्ही तुमचा रक्तदाब घरी देखील तपासू शकता. रक्तदाबाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने कधी कधी हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, हृदय अपयश, स्मरणशक्ती कमी होणे, स्मृतिभ्रंश यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आज आपण उच्च रक्तदाबाच्या सुरुवातीच्या काही लक्षणांविषयी जाणून घेऊया.

Photos : ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने ओळखा लाल आणि रसाळ कलिंगड

उच्च रक्तदाबाची लक्षणे :

वेबएमडीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, जर तुमचा रक्तदाब खूप जास्त असेल, तर तुम्हाला खालील लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे:

  • तीव्र डोकेदुखी
  • नाकातून रक्त येणे
  • थकवा जाणवणे किंवा भ्रम होणे
  • डोळ्यांच्या संबंधित समस्या जाणवणे
  • छातीत दुखणे
  • श्वास घेण्यात अडथळा
  • हृदयाचे अनियमित ठोके
  • लघवीतून रक्त येते
  • छाती, मान किंवा कान दुखणे

Summer Tips : वीजेशिवायही उन्हाळ्यात घर ठेवता येणार थंड; ‘या’ टिप्सचा वापर ठरेल उपयुक्त

ही उच्च रक्तदाबाची लक्षणे नाहीत :

  • चक्कर येणे
  • भीती वाटणे
  • घाम येणे
  • झोप न येणे
  • डोळ्यांमध्ये रक्ताचे डाग येणे
  • चेहरा लाल होणे

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे सतत दिसली तर तुम्ही निश्चितपणे डॉक्टरांना भेट द्या. कधीकधी उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी किंवा नाकातून रक्तस्त्राव होत नाही, परंतु हायपरटेन्सिव्ह क्रायसिसमध्ये हे होऊ शकते. यामध्ये रक्तदाब १८०/२० च्या वर जातो. हायपरटेन्सिव्ह संकटात, हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका असतो किंवा इतर गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात.

उच्च रक्तदाबाशी संबंधित खालील लक्षणे समजून घ्या

नाकातून रक्त येणे –

एक रिपोर्टनुसार नाकातून रक्त येणे ही समस्या काहीवेळा साईनसायटस, नाक वारंवार गळणे किंवा उच्च रक्तदाब यामुळे असू शकते.

Summer Tips :उन्हाळ्यात उष्माघातापासून कसा करावा बचाव; जाणून घ्या घरगुती उपचार

सततची डोकेदुखी –

वारंवार डोकेदुखी होणे हे देखील चांगले लक्षण नाही. ही समस्या खूप सामान्य आहे, परंतु उच्च रक्तदाबामुळे देखील कधीकधी डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे सतत डोकेदुखी होत असेल तर त्वरित उपचार करा.

थकवा जाणवणे –

अनेक वेळा ऑफिस किंवा घरातील कोणतेही काम पूर्ण करण्यात अडचण येते. संभवतः ही उच्च रक्तदाबाची समस्या असू शकते. कोणतेही शारीरिक श्रम न करताही तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर तुमचा रक्तदाब तपासा किंवा डॉक्टरांना भेटा.

श्वास घेण्यास त्रास जाणवणे –

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांना कधीकधी श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हे हायपरटेन्शनचे मुख्य लक्षण आहे.

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

डोळ्यांशी संबंधित समस्या –

अनियंत्रित रक्तदाबाचा डोळ्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. उच्च रक्तदाबावर उपचार न केल्यास दृष्टी अंधुक होऊ शकते.

छाती दुखणे –

उच्च रक्तदाबाच्या लक्षणांमध्ये छातीत दुखणे, जडपणा इत्यादींचा समावेश होतो. तुम्हालाही असेच वाटत असेल तर त्वरित उपचार करा.

याशिवाय जास्त घाम येणे, तणाव जाणवणे, अस्वस्थ वाटणे, झोप न लागणे, चिडचिड किंवा चक्कर येणे, चिंताग्रस्त होणे इत्यादी लक्षणे जाणवल्यास याकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.