World Kidney day 2019: मूत्रपिंड विकाराने दरवर्षी ६ लाख महिलांचा मृत्यू, जाणून घेऊया आजाराची लक्षणे

जगभरात १९.५ कोटी महिला मूत्रपिंड विकारचा सामना करत आहेत

जगभरात १९.५ कोटी महिला मूत्रपिंड विकारचा सामना करत आहेत.
मूत्रपिंडाची (किडनी) योग्य वेळी योग्य ती काळजी न घेतल्याने शरीरासाठी घातक ठरु शकते. बदलेलती जिवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे मूत्रपिंड आजाराचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय विज्ञानव्दारे मूत्रपिंडचा ‘क्रॉनिक किडनी आजार’ (CKD) समोर आला आहे. या आजारात मूत्रपिंड काम करणं बंद करते. या आजाराबद्दल जागरुकता पसवरण्यासाठी १४ मार्च ‘जागतिक मूत्रपिंड दिवस’ साजरा केला जातो. २०१९ मधील World Kidney day ची थीम “किडनी हेल्थ फॉर एव्हरी वन, एवरी वेयर” अशी आहे.

श्री बालाजी एक्शन मेडिकल इंस्टीट्यूटचे सीनिअर कंसल्टेंट नेफोलॉजिस्ट डॉक्टर राजेश अग्रवाल यांच्या मते, संपूर्ण देशात १४ % महिला आणि १२% पुरूष हे मूत्रपिंड विकाराने ग्रासले आहेत. तर जगभरात १९.५ कोटी महिला मूत्रपिंड विकारचा सामना करत आहेत. जगभरात वर्षाला सहा लाख महिला मुत्रपिंडाच्या विकाराने मृत्यू पावतात. भारतात ही संख्या वाढतच चालली आहे. तसेच दरवर्षी भारतामध्ये २ लाख लोकांना या आजाराचा सामना करावा लागतो. सुरूवातीच्या काळात मूत्रपिंड विकार ओळखणे फार कठीण असते. कारण ६०% मूत्रपिंड खराब झाल्यानंतर रोग्याला या आजराबद्दल माहिती होते. तसेच शरीरात रक्त साफ न होणे तसेच क्रिएटनिन वाढण्यास सुरूवात होते.

नारायणा सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, गुरुग्राम येथील कंसल्टंट नेफ्रोलॉजी आणि रीनल ट्रांसप्लांट विशेषज्ञ डॉक्टर सुदीप सिंह यांच्या मते मूत्रपिंड विकारची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये खाण्याच्या अयोग्य सवयी तसेच सतत पेन किलर घेतणे हे देखील असू शकते. या जागतिक मूत्रपिंड दिवसानिमीत्त आम्ही मधूमेह, उच्च रक्तदाब आणि बराच काळ एखाद्या रोगाचा सामना करणाऱ्या लोकांना मूत्रपिंडशी संबंधीत सर्व चाचण्या करुन घेण्यास सांगतो. तसेच यूरीन टेस्टसोबतच केएफटी सारख्या मूत्रपिंडाच्या तापसण्या करण्याचा सल्ला ही देतो’ असे त्यांनी म्हटलं आहे.

साधारण गर्भधारणेच्या प्रकियांमुळे महिलांमध्ये मूत्रपिंड विकार होण्याची शक्यता असते. हळूहळू थकवा येणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, रात्री लघवीला जाण्यासाठी उठावे लागणे, सारखे लघवीला जावे लागणे अशी लक्षणे या रुग्णांमध्ये दिसू लागतात. महिलांनी योग्य वेळी मूत्रपिंड तापसण्या करुन घेणे अत्यंत गरजेच आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: World kidney day 2019 6 lakh woman dies owing of kidney stone disease