World Milk Day: आपल्याकडे आहारामध्ये दुधाला फार महत्त्व आहे. गाय, म्हैस यांच्या दुधाचा वापर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केला जातो. पण बहुतांश जणांना या दुधाचे सेवन करणे त्रासदायक होते. lactose-intolerant असलेल्यांच्या शरीरात दूध पचायला वेळ लागतो. अनेकदा अशा लोकांना दुधाचा त्रास होतो. याशिवाय काही जण हे Vegan असतात. हे लोक गाय, म्हैस अशा कोणत्याच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधाचा वापर करणे टाळतात. अशा वेळी त्यांना प्राण्यांच्या दुधाला Non Dairy पर्याय हवे असतात. अशा लोकांसाठी दुधाच्या प्रकारांची माहिती आम्ही देत आहोत.

Soy Milk

बरेचसे लोक गाईच्या दुधाला पर्याय म्हणून Soy Milkचा वापर करतात. हे दूध गाईच्या दुधाप्रमाणे पौष्टिक असते असे म्हटले जाते. Soy Milk हा हाय प्रोटीन दुधाचा सर्वोत्तम पर्याय आहे.

best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
shani surya yuti in kumbh rashi ended
शनि-सूर्याची युती संपली; या राशींचे लोक होतील मालामाल, मिळणार अमाप पैसै
Panvel water
‘पिण्यासाठी पाणी द्या, मग पाणी बचतीचा संदेश द्या’

Almond Milk

बदाम हे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात. बदाम रात्रभर पाण्यात भिजवत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी एका कपड्यामध्ये ते भिजवलेले बदाम गाळून घ्यावेत. अशा प्रकारे तुम्ही बदामापासून दूध तयार करू शकाल.

Cashew Milk

बदामाप्रमाणे काजूपासूनदेखील दूध तयार करता येते. काजूमध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मार्केटमध्ये Cashew Milk चे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे योग्य बॅण्डची निवड करणे आवश्यक असते.

आणखी वाचा – Cow Milk Vs Buffalo Milk: लहान मुलांसाठी कोणतं दूध असतं आरोग्यदायी? गाईचं की म्हशीचं? जाणून घ्या फरक

Rice Milk

Rice Milk चा वापर बरेचसे लोक गाईच्या दुधाला पर्याय म्हणून करत आहेत. गाईपासून मिळणाऱ्या दुधाप्रमाणे यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते.

Oat Milk

ओट्स आणि पाणी यांच्या मिश्रणाने Oat Milk तयार केले जाते. काही वेळेस विशिष्ट कारणांसाठी उत्पादक त्यामध्ये ठराविक रसायनांचा वापर करत असतात. हे दूध मध्यम चवीचे असते. स्वयंपाक करताना याचा वापर करता येतो.

Coconut Milk

नारळापासून मिळणाऱ्या दुधाला Coconut Milk म्हटले जाते. प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधाचा वापर करायचा नसल्यास तुम्ही या पर्यायाचा अवलंब करू शकता. यामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते.

आणखी वाचा – World Milk Day 2023: नियमितपणे दुधाचे सेवन केल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या सविस्तर

Hemp Milk

यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन्स असतात. Hemp Milk मध्ये ओमेटी-३ फॅटी अ‍ॅसिड्सदेखील मुबलक प्रमाणात असतात. पण हे दूध पचायला बऱ्याच जणांना त्रास होतो. त्यामुळे याचे सेवन करणे लोक टाळतात.