Premium

World Milk Day 2023: नियमितपणे दुधाचे सेवन केल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या सविस्तर

दुधाचे सेवन करणे शरीरासाठी किती फायदेशीर असते ते सविस्तरपणे जाणून घ्या..

milk benefits
World Milk Day 2023 (संग्रहित फोटो)

World Milk Day: बाळाच्या जन्मानंतर त्याला आईचे दूध पाजले जाते. दूध हे आरोग्यासाठी आणि शरीराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स यांसारखे असंख्य पोषक घटक असतात. दुधाच्या सेवनामुळे शरीराला खूप फायदा होतो. विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी याची मदत होते. शारीरिक आणि बौद्धिक वाढ व्हावी यासाठी लहान मुलांना नियमितपणे दूध प्यायला दिले जाते. दुधाचे महत्त्व आणि डेअरी क्षेत्राची गरज लोकांच्या लक्षात यावी या उद्देशाने अन्न आणि कृषी संशोधन परिषदेने दिलेल्या निर्देशनानुसार भारतासह जगभरात २००१ पासून जागतिक दूध दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने आपण दुधाच्या विविध फायद्यांविषयी माहिती घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दातांसाठी फायदेशीर

दुधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. कॅल्शियम दातांसाठी आवश्यक असते. त्यामुळे जर नियमितपणे दूध प्यायल्याने दात किडत नाहीत. कॅल्शियम, फॉस्फरससह दुधामध्ये केसिन नावाचे प्रोटीनदेखील असते. या प्रोटीनमुळे अनेक आजारांवर मात करता येते.

छातीमध्ये जळजळ होण्यापासून रोखते.

मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पोट आणि छातीमध्ये जळजळ व्हायला सुरुवात होते. हा त्रास होऊ नये यासाठी जेवल्यानंतर थोड्या वेळाने दूध प्यावे.

त्वचेलाही होतो फायदा

दुधाच्या सेवनामुळे त्वचा मऊ, चमकदार राहण्यास मदत होते. त्वचा निरोगी राहावी यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधामधील प्राकृतिक गुणांमुळे त्वचा ग्लो करायला लागते.

आणखी वाचा – World Milk Day : दूध उत्पादनात भारत जगात पुढे पण, महाराष्ट्र मागे असे का?

वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

वजन नियंत्रणामध्ये राहण्यासाठी दुधाची मोठी मदत होते. दररोज २ ते ३ कप दूध प्यायल्याने वजन नियंत्रणामध्ये राहते असे म्हटले जाते. वजन कमी करण्याचा जे लोक प्रयत्न करत आहेत, ते हा उपाय करून बघू शकतात.

हाडांना बळकटी येते.

दुधामध्ये व्हिटॅमिन-डीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्याच्या सेवनाने हाडे मजबूत बनतात. लहान मुलांची शारीरिक वाढ होत असताना त्यांच्या हाडांना बळकटी यावी म्हणून त्यांच्या आहारामध्ये दुधाचा समावेश केला जातो.

एनर्जी बूस्टर म्हणून काम करते.

सकाळी दूध प्यायल्याने दिवसभर उत्साह टिकून राहतो. दुधाचे सेवन केल्याने काम करायची ऊर्जा मिळते असे म्हटले जाते. निरोगी राहण्यासाठी दूध पिणे फायदेशीर असते.

आणखी वाचा – विश्लेषण : International Milk Day : दुधाची किंमत सातत्याने का वाढतेय? नेमकं अर्थकारण काय?

ताणतणाव कमी होतो.

दुधामुळे ताणाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. दुधामधील व्हिटॅमिन डीमुळे शरीरात सेरोटोनिनचे उत्पादन तयार व्हायला उत्तेजन मिळते. सेरोटोनिन हे निद्रा, भूक यांच्याशी संबंधित हार्मोन आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 12:42 IST
Next Story
Vat Purnima 2023: या वर्षी केव्हा आहे वटपौर्णिमा? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्त्व