World Ocean Day, 08 June 2022: जागतिक महासागर दिवस दरवर्षी ८ जून रोजी साजरा केला जातो. संपूर्ण जगभरात या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे. लोकांमध्ये समुद्र आणि महासागराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पृथ्वीवरील ७१ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाणी महत्वाचा भाग आहे. समुद्रामुळे आपणास खनिजे , मासे प्राप्त होत असतात.जे आपल्या शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्व पुरवतात. पण आपण याचं समुद्रात कचरा , सांडपाणी टाकून त्याला दूषित करत आहोत. त्यामुळे महासागराचे संरक्षण होणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रांनी १९९२ मध्ये ८ जूनला हा दिवस अधिकृतरीत्या साजरा करण्यास सुरूवात केलीय.

जागतिक महासागर दिवसाचा इतिहास

जागतिक महासागर दिन ही संकल्पना १९९२ मध्ये कॅनडा सरकारने रिओ दि जानेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत प्रस्तावित केली होती. २००८ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने अधिकृतपणे जागतिक महासागर दिवसाची स्थापना केली. युनोकडून मान्यता मिळाल्यानंतर दरवर्षी हा दिवस ८ जूनला साजरा केला जाऊ लागला. आपल्या दैनंदिन जीवनातले समुद्राचे महत्त्व आणि त्याचे संरक्षण कसे करता येईल याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ह्या दिवसाचे विशेष महत्व आहे.

Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क
serious allegations against boeing
अन्वयार्थ : बडयांवर बडग्याची बाजारकेंद्री ‘संस्कृती’
pune, Pwd Minister, ravindra chavan, Report Potholes, Online App, Discontinued, Urges Citizens,
पीडब्ल्यूडी मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा हवेतच

जागतिक महासागर दिनाचे महत्व

जागतिक महासागर दिनानिमित्ताने सागरी परिसंस्थेशी संबंधित संस्था , संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य, संशोधक,अभ्यासक एकत्र येऊन समुद्राविषयीचे विविध पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. सांडपाणी, घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या , पिशव्या समुद्रात टाकल्या जातात. यामुळे समुद्रातील जीवसृष्टीला हानी पोहोचत असून हवामानावर देखील परिणाम होत आहे. तसंच विशिष्ट सजीव सुद्धा नष्ट होऊ लागले आहेत हे सर्व थांबविणे हेच या दिनाचे उद्दिष्ट आहे.

जागतिक महासागर दिवस २०२२ थीम

२०२२ च्या जागतिक महासागर दिवसाची थीम ही पुनरुज्जीवन: महासागरासाठी सामूहिक कृती करणे आहे. समुद्राचे संरक्षण करण्यासाठी एकत्रितपणे सर्व समुदायाने समुद्राचे रक्षण करण्यासाठी तसंच निसर्गाचे जतन करण्यासाठी विविध उपायांवर एकत्रितपणे प्रकाश टाकणे हा आहे.