दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे. अलिकडच्या काळात झपाट्याने वाढतच चालेले शहरीकरण, सिमेंटचे रस्ते यामुळे मृदेची अधिक प्रमाणात झीज होत आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी ८०० ते १००० वर्षांचा कालावधी लागतो.

इतिहास

मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने २०१३ साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीनं या दिवसाचे आयोजन केलं जातं. शेतकऱ्यांसोबतच सामान्य माणसांमध्येही मृदेसंबंधी जागरुकता करण्याचा उद्देश आहे.

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…
Narendra Modi opinion that textile industry is important in developed India
‘विकसित भारता’त वस्त्रोद्योग महत्त्वाचा – मोदी
Transport system plays a vital role in strengthening the economy
पहिली बाजू: दळणवळणातून विकासाला ‘गतिशक्ती’

थीम

दरवर्षी मृदा दिवस साजरा करताना एक वेगळी थीम तयार केली जाते आणि वर्षभर त्या आधारे मृदा संवर्धनासाठी जागरुकता केली जाते. या वर्षीच्या मृदा दिवसाची थीम आहे “halt soil salinization boost soil productivity ” म्हणजे मातीचे क्षारीकरण थांबवल्याने मातीची उत्पादकता वाढेल.

महत्व

मृदेचं संरक्षण म्हणजे संपूर्ण सजीवांचं संरक्षण असाच अर्थ होतोय. जगातील ९५ टक्के अन्नधान्य मृदेच्या माध्यमातून येतं. तसेच मृदेत पृथ्वीवरील एकूण सजीवांपैकी २५ टक्के सजीव आसरा घेतात. फळे, भाज्या आणि अन्नधान्याची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्तेवरुन ठरते. सध्या या मृदेच्या संवर्धनासमोर वातावरण बदलाचं मोठं आव्हान उभं आहे.

मृदेची काळजी का घेतली पाहिजे हे जाणून घ्या

माती हा एक जिवंत स्त्रोत आणि २५% पेक्षा जास्त ग्रहांचे जीवन आहे.

आपले ९५% अन्न मातीमधून येते फळे, भाज्या आणि धान्य यांचे गुणवत्ता व प्रमाण मातीच्या आरोग्यावर अवलंबून आहे.

पृथ्वीवरील जीवन टिकवण्यासाठी मातीचे जीव सतत कार्यरत असतात.

माती हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगशी लढायला मदत करते.

माती प्रदूषण थांबविण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

प्लास्टिकचा वापर टाळा.

पर्यावरणास अनुकूल, बागकाम, साफसफाईची आणि वैयक्तिक काळजीची उत्पादने निवडा.

बॅटरीसारख्या घातक कचर्‍याची जबाबदारीने विल्हेवाट लावा.

आपला अन्न कचरा कंपोस्ट करा वनस्पती-आधारित आहार घ्या.