प्रत्येकाचा पहिलं गुरु आईच असते. त्याच्याही पलीकडचे ज्ञान मिळवण्यासाठी गरज असते ती शिक्षक रुपी मार्गदर्शकाची. विद्यार्थ्याला घडवत असताना त्याच्यावर चांगले संस्कार लादणे, चांगले चरित्र घडवणे, त्याच्या मनात थोर व्यक्तींच्या बद्दल आदर, निर्माण करणे. एक आदर्श आणि आज्ञाधारक विद्यार्थी घडवणे. हे शिक्षकाचे काम आहे. असा विद्यार्थी ज्ञानाबरोबरच समाजातली छोट्या मोठ्या गोष्टींचं ज्ञान मिळवून एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व निर्माण करून एक आदर्श नागरिक बनावा. असच प्रत्येक शिक्षकाला वाटत असते. त्यांचे हे सारं श्रेय शिक्षकांनाच जातं.

भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. त्याचबरोबर आज म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी जगभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. या वर्षीचा जागतिक शिक्षक दिन गेल्या दीड वर्षांपासून लढत असलेल्या संपूर्ण जगाच्या कोरोना महामारीच्या संकटापासून मुक्त होण्यासाठी शिक्षकांच्या त्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देतो. याच कारणामुळे या वर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन २०२१ ची थीम – ‘शिक्षकांचा हार्ट ऑफ एज्युकेशन रिकव्हरी’ युनेस्कोने निश्चित केली आहे.

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
BJP, Namo Yuva Sammelan, Nagpur University, ground, Student Organizations, Strong Opposition,
नागपूर : विद्यापीठाच्या मैदानावर भाजप अध्यक्ष नड्डा यांचे भाषण; विद्यार्थी संघटना आक्रमक, काय आहे प्रकरण…
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education 10th exam from tomorrow pune
राज्यात आजपासून दहावीची परीक्षा, १६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
Bird Wardha
आंतरराष्ट्रीय पक्षीगणना ! वर्धा जिल्हा नोंदणीत अग्रेसर, आढळले ‘हे’ पक्षी

जागतिक शिक्षक दिनाचा इतिहास

संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNCESCO) आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) १९६६ साली जगभरातील शिक्षकांची स्थिती आणि त्यांच्याशी संबंधित समस्यांबाबत सूचनांसाठी मसुदा तयार केला होता. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात यावा ही यूनेस्कोची शिफारस १९९४ साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजूर करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर या दिवशी जगाच्या उभारणीत शिक्षकांचे योगदान लक्षात ठेवले जाते.

जागतिक शिक्षक दिनाची थीम

जगभरातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाची थीम ही – ‘शिक्षकांचा हार्ट ऑफ एज्युकेशन रिकव्हरी’ (‘Teachers: Leading In Crisis, Re-Imagining The Future’) अशी ठेवण्यात आली आहे. आंतराष्ट्रीय शिक्षक दिन हा यूनेस्को, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या वतीनं साजरा करण्यात येतो.