scorecardresearch

World Tourism Day 2021: या खास दिवसाची सुरुवात का झाली? जाणून घ्या कारण

करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या महामारी दरम्यान, हे एक मोठ क्षेत्र आहे ज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

World Tourism Day 2021: या खास दिवसाची सुरुवात का झाली? जाणून घ्या कारण
जागतिक पर्यटन दिवस २०२१ (प्रातिनिधिक फोटो)

पर्यटन हा सर्वात महत्वाचे पैलू पैकी एक आहे कारण हे क्षेत्र कोणत्याही देशाच्या GDP मध्ये मोठा वाटा आहे. परंतु करोना व्हायरस महामारीच्या दरम्यान, हे एकमेव क्षेत्र आहे ज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे क्षेत्र केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत नाही, तर लाखो रोजगाराच्या संधी निर्माण करते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देते.जागतिक पर्यटन दिन दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे ध्येय पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे.

जागतिक पर्यटन दिनाचा इतिहास काय?

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने जबाबदार, शाश्वत आणि सार्वत्रिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन दिन घोषित केला आहे. याचा फायदा पर्यटकांना आणि त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणांना होतो तसेच देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. १९८० पासून, जागतिक पर्यटन दिन दरवर्षी जगभरात २७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यूएनडब्ल्यूटीओ ने २७ सप्टेंबर १९८० रोजी पहिला जागतिक पर्यटन दिवस आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला.

जागतिक पर्यटन दिनाचे महत्त्व काय आहे?

जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट जगभरातील पर्यटनाचे महत्त्व वाढवणे आणि सामान्य जनतेला हे दर्शवणे आहे की पर्यटन केवळ देशाच्या आर्थिक मूल्यांवरच नाही तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मूल्यांवर देखील परिणाम करते. इस्तंबूल, तुर्की येथे १९९७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यापार संघटनेच्या सर्वसाधारण सभेने जागतिक पर्यटन दिनादरम्यान सहभागी म्हणून काम करण्यासाठी प्रत्येक वर्षी यजमान देशाचे नामांकन करण्याचा निर्णय घेतला. जागतिक पर्यटन दिन २०१९ चा उत्सव दिल्लीमध्ये साजरा झाला.

भारतातील जागतिक पर्यटन दिन

भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे भारताने प्रथमच जागतिक पर्यटन दिनाचे आयोजन केले. भारत त्याच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे आणि पर्यटकांना विविध पाककृती, साहसी ठिकाणे, संगीत, इतिहास, भाषा इत्यादी देण्याची क्षमता आहे.यूएनडब्ल्यूटीओने पर्यटन आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व, पर्यटनासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि त्याशी संबंधित नोकऱ्या निर्माण करण्यावर भर दिला आहे. प्रदर्शनादरम्यान, लोकांना याबद्दल शिकवून आमचा वारसा आणि संस्कृतीबद्दल सांगितले गेले होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-09-2021 at 12:29 IST

संबंधित बातम्या