आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. बायबलचे अनुवादक सेंट जेरोम यांच्या स्मरणार्थ जागतिक अनुवाद दिन साजरा केला जातो. आजच्या काळात प्रत्येकाला प्रत्येक भाषेचे ज्ञान असणे शक्य नाही. पण आधुनिक काळात कोणतीही भाषा अनुवादाद्वारे सहज समजते. चला तर मग जागतिक अनुवाद दिनाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व आणि थीम जाणून घेऊयात

जागतिक अनुवाद दिनाचा इतिहास

जागतिक अनुवाद (भाषांतर) दिवस हा दरवर्षी ३० सप्टेंबरला बायबलचे अनुवादक आणि भाषांतराचे जनक, संत जेरॉम यांच्या स्मृत्यर्थ साजरा केला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५३ मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. जागतिकीकरणाच्या ह्या युगात लोकांना जागृत करण्यासाठी १९९१ मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सने जागतिक पातळीवर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
What Aditya Thackeray Said?
“४० गद्दारांनी आता विचार करावा..”, आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

जागतिक अनुवाद दिनाचे महत्त्व

अनुवादाची प्रक्रिया शतकानुशतके जुनी आहे, भारतातील भाषांतर रचित ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आहे. जे मूळतः संस्कृतमध्ये रचलेले आहे. ज्याचे हिंदीत भाषांतर झाले. भारतात ब्रिटीश राजवटीनंतर भारतातील धार्मिक ग्रंथांचे इंग्रजीमध्ये भाषांतर होऊ लागले.

जागतिक अनुवाद दिन २०२१ थीम

दरवर्षी जागतिक अनुवाद दिनानिमित्त एक थीम प्रसिद्ध केली जाते. यामुळे लोकांची जागरूकता वाढेल. या वर्षी आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन २०२१ ची थीम “अनुवाद आणि स्वदेशी भाषा” ही आहे.