scorecardresearch

Premium

उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्यांमुळे चिंतेत आहात? ‘या’ टिप्सचा वापर करून करा स्वतःचे रक्षण

उष्णतेचा त्वचेवर अनेक प्रकारे परिणाम होत असला तरी दीर्घकाळानंतर घराबाहेर पडणाऱ्या लोकांमध्ये टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्या वाढण्याची शक्यता असते.

घरातून बाहेर पडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. (Photo : Pexels)
घरातून बाहेर पडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. (Photo : Pexels)

उन्हाळा आल्याने आरोग्याची विशेष काळजी घेण्यासोबतच उन्हापासून त्वचेचे रक्षण करणे खूप गरजेचे आहे. बराच वेळ घरून काम केल्यानंतर, आता हळूहळू लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळत आहे. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. उष्णतेचा त्वचेवर अनेक प्रकारे परिणाम होत असला तरी दीर्घकाळानंतर घराबाहेर पडणाऱ्या लोकांमध्ये टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. जसजसे तापमान वाढते तसतसे खाज सुटणे, पुरळ उठणे, त्वचेचा लालसरपणा, अ‍ॅलर्जी आणि सनबर्नचे प्रमाण वाढते. सतत मास्क लावल्याने त्वचेच्या समस्याही वाढल्या आहेत.

मास्क घातल्याने त्वचेच्या झाकलेल्या भागात घाम साचू लागतो. त्वचेवर असलेले तेल, घाम आणि बॅक्टेरिया एकत्रितपणे त्वचेची छिद्रे बंद करतात. त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ लागतात. त्यांना ‘मास्कने’ असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय अनेकवेळा मास्क घातल्यानंतरही त्वचेची लवचिकता कमी होऊ लागते आणि छिद्रांचा आकार वाढू लागतो. जसजसे मास्कच्या आत तापमान वाढते, तसतसे त्वचेतील पीएच पातळी कमी होते, यामुळे त्वचेवर सूर्यप्रकाश आणि धुळीचा जास्त परिणाम होऊ लागतो. म्हणूनच घरातून बाहेर पडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Benefits Of Makhana try 3 tasty and healthy recipes of makhana
मखाना खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे; ट्राय करा मखानाच्या ‘या’ 3 स्वादिष्ट, पौष्टिक रेसिपी
Heart Attack At Gym
जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
World Heart Day 2023 How stress affects heart health and 7 ways to reduce stress
World Heart Day 2023: तणावाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? तणाव कमी करण्याचे सोपे मार्ग, जाणून घ्या
smoking and drinking alcohol raise high blood presure problem in youngsters
दारू, सिगारेट ओढणाऱ्या तरुणांना हाय ब्लड प्रेशरचा सर्वाधिक धोका? डॉक्टरांनी सुचवले बचावासाठी ‘हे’ उपाय

हायड्रेटेड रहा

उन्हाळ्यात दोन ते तीन लिटर पाणी प्या. त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि उन्हापासून त्वचेला होणारे नुकसान कमी होते. शरीरातील विषारी पदार्थ निघून गेल्याने पिगमेंटेशन आणि सुरकुत्यापासूनही आराम मिळतो.

उन्हाळ्यात काकडीचे सेवन करणे ठरेल सर्वोत्तम; शरीराला थंडावा देण्यासोबतच आहेत इतर अनेक फायदे

चांगला आहार घ्या

आहारात व्हिटॅमिन सी असलेली फळे अधिक प्रमाणात घ्या. तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. हंगामी फळे आणि भाज्या खा.

चांगले मॉइश्चरायझर-सनस्क्रीन लावा

किमान 30 SPF असलेले सनस्क्रीन वापरा. मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीनचा थर लावल्यास सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होईल.

मल्टीव्हिटॅमिनसह त्वचेचे पोषण करा

त्वचेतील पोषणाची कमतरता पाहता तज्ज्ञ आहार आणि विशेष क्रिमद्वारे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डीच्या पोषणावर भर देतात. यामुळे त्वचा टवटवीत राहते. काळे डाग, सुरकुत्या आणि कोरडेपणा देखील दूर होतो.

त्वचा स्वच्छ ठेवा

स्वच्छ टॉवेल किंवा मऊ कापडाने चेहरा स्वच्छ करा. मास्कखाली घाम साचू देऊ नका. कापडाने त्वचा जोरात घासू नका. जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तेलविरहित उत्पादनेच खरेदी करा. सुती कापडाचा मास्क घाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Worried about summer skin problems protect yourself using these tips pvp

First published on: 02-04-2022 at 18:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×