सोशल मीडियावर बराचसा वेळ वाया जातोय का? 'या' टिप्स वापरून राहा त्यापासून दुर | Worried about wasting too much time on social media these tips will help you to stay away from it | Loksatta

सोशल मीडियावर बराचसा वेळ वाया जातोय का? ‘या’ टिप्स वापरून राहा त्यापासून दूर

सोशल मीडियापासून दुर राहण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या टिप्स जाणून घ्या

सोशल मीडियावर बराचसा वेळ वाया जातोय का? ‘या’ टिप्स वापरून राहा त्यापासून दूर
सोशल मीडियावर वेळ वाया जाऊ नये यासाठी मदत करतील या टिप्स (फोटो: Freepik)

अनेकांच्या दिवसाची सुरूवात आणि शेवट सोशल मीडियावरील पोस्ट स्क्रोल करत होतो. पण यामुळे दिवसभरातला बराचसा वेळ वाया जातो. काहीजणांना सोशल मीडिया पाहण्याची, त्यावर सतत सर्फिंग करण्याची एखाद्या व्यसनाप्रमाणे याची सवय होते. याचा परिणाम त्यांच्या कामासह आरोग्यावरही होतो. काही टिप्स वापरून तुम्ही सोशल मीडियापासून लांब राहू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.

सोशल मीडियापासून लांब राहण्यासाठी मदत करतील या टिप्स

आणखी वाचा: टूथब्रश किती दिवसानंतर बदलावा? टूथब्रश ठेवण्याच्या जागेचाही होतो आरोग्यावर परिणाम? जाणून घ्या

नोटीफिकेशन बंद करा
नोटीफिकेशन हे सोशल मीडियाकडे आकर्षित करणारे मुख्य कारण असते. कारण त्यातून आपल्याला कोणी मेसेज केला आहे किंवा कोणी एखादी पोस्ट शेअर केली आहे याची माहिती मिळते आणि आपण ते लगेच पाहतो, त्यात व्यस्त होतो. म्हणून यापासून लांब राहण्यासाठी नोटीफिकेशन बंद करा.

होम स्क्रीनवरून सोशल मीडिया अ‍ॅप्स काढून टाका
होम स्क्रीनवर सोशल मीडिया अ‍ॅप्स असल्यास ते सतत उघडून पाहण्याची इच्छा होऊ शकते, त्यामुळे असे अ‍ॅप्स होम स्क्रीनवरुन काढुन टाका.

सकाळी उठल्यानंतर फोन पाहू नका
अनेकांना सकाळी उठल्यावर सर्वात आधी फोन चेक करण्याची सवय असते, यामुळे बराचसा वेळ वाया जातो. त्यामुळे सकाळी उठल्यावर फोन पाहण्याऐवजी योगा, व्यायाम अशा चांगल्या सवयी स्वतःला लावा.

आणखी वाचा: Kitchen Tips: स्वयंपाकघरातील करपलेली भांडी लगेच होतील स्वच्छ; फक्त वापरा या सोप्या टिप्स

सोशल मिडीयावर किती वेळ घालवता हे तपासा
तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवता हे तपासा, यावरून तुम्हाला तुमचा किती वेळ वाया जात आहे याचा अंदाज येईल आणि तुम्ही वेळेबाबत अधिक जागृक व्हाल.

फोन वेगळ्या खोलीत ठेवा
जर तुम्हाला महत्त्वाचे काम किंवा परीक्षा असेल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जात असेल. तर तुमचा फोन वेगळ्या खोलीत ठेवा, यामुळे लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 14:59 IST
Next Story
‘हे’ आयुर्वेदिक उपाय ट्राय करा; खराब कोलेस्ट्रॉल पासून कायमस्वरूपी सुटका मिळेल