शाओमीच्या ‘पॉवरफुल’ फोनवर डिस्काउंट, कंपनीकडून 3,000 रुपयांची सवलत

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टशिवाय mi.com या संकेतस्थळावरुनही खरेदी करता येणार

चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीचा Redmi K20 Pro हा फोन खरेदी करण्याची ग्राहकांना चांगली संधी आहे. कंपनीकडून या फोनवर 3,000 रुपयांची सवलत दिली जात आहे. शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. कंपनीने जुलै महिन्यात लाँच केलेला हा फोन शाओमीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर आता Redmi K20 Pro (6GB रॅम ) 24 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. यापूर्वी या व्हेरिअंटसाठी ग्राहकांना 27,999 रुपये मोजावे लागत होते. हा फोन अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टशिवाय mi.com या संकेतस्थळावरुनही खरेदी करता येईल.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील पहिला Sony IMX586 सेंसरसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 20 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh क्षमतेची दमदार बॅटरी यात आहे.

आणखी वाचा – Samsung ची भन्नाट ऑफर, TV खरेदीवर 77 हजारापर्यंतचा स्मार्टफोन Free

अन्य स्पेसिफिकेशन्स –
6.38 इंच फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले,
स्नॅपड्रॅगन 855 एसओसी प्रोसेसर,
256जीबी इंटरनल स्टोरेज,
MIUI 10 ऑपरेटिंग सिस्टिम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Xiaomi redmi k20 pro get a price cut know all details sas