पुर:स्थ ग्रंथीमध्ये होणाऱ्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकरण उपचारांचे (रेडिओथेरेपी) दुष्परिणाम नियमित योगाचा सराव केल्यामुळे कमी होत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. या संशोधनामध्ये एका भारतीय वंशाच्या संशोधकाचा समावेश होता.

पुर:स्थ ग्रंथीतील कर्करोगावर विकरण उपचार करणाऱ्या पुरुषांनी आठवडय़ातून दोन वेळा योगा वर्गाला हजेरी लावल्यामुळे त्यांच्यामधील थकवा दूर होतो. तसेच लैंगिक व मूत्रमार्गातील कार्यामध्ये इतरांच्या तुलनेत अधिक चांगले होत असल्याचे अभ्यासात दिसून आल्याचे संशोधकांनी सांगितले.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती

ही या बाबतीतील पहिलीच वैद्यकीय चिकित्सा असून, आठवडय़ातून दोन वेळा योगा केल्यामुळे कर्करोगावरील उपचार करताना काय फरक होतो, हे तपासण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले.

अमेरिकेतील पेनसिल्वेनिया विद्यापीठामध्ये पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनच्या नेतृत्वाखाली या सर्व रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. यामध्ये ज्यांच्यावर सहा ते नऊ आठवडे पुर:स्थ ग्रंथीतील कर्करोगावर विकरण उपचार सुरू होते, यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.

यावेळी रुग्णांना दोन गटात विभागण्यात आले होते. जे पुरुष आठवडय़ातून दोन वेळा योगाचा वर्ग करतात अशांचा एक गट, तर दुसरा नियंत्रण गट सहभागी करण्यात आला.

प्रत्येक सत्र ७५ मिनिटे चाललेल्या योगा वर्गामध्ये श्वास घेण्यापासून ते तंत्र अभ्यास आणि पाच मिनिटांचे शवासन करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये त्यांना इतरांच्या तुलनेत थकवा कमी जाणवत असून आणि लैंगिक व मूत्रमार्गातील कार्यामध्ये अतिशय चांगली सुधारणा अभ्यासात दिसून आली. पुर:स्थ गंरथी ही सुपारीच्या आकाराची असून, ती फक्त पुरुषात असते. ही ग्रंथी ओटीपोटात मूत्राशयाखाली असते. या ग्रंथीतून मूत्रमार्ग जातो.