Avoid 5 W Foods From Kitchen: शरीरस्वास्थ्य चांगले राहावे यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे महत्वाचे आहे. पण आरोग्यदायी आहार घेण्यासाठी किचनमध्येही काही विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळे कुटुंबातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे हाईल, यात काही असे पदार्थ आहेत जे किचनमधून पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत, ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर विविध आजारांपासून दूर राहता येऊ शकते. यावर ४० वर्षांचा अनुभव असलेले ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. आलोक चोप्रा यांनी सांगितले की, किचनमध्ये ‘हे’ 5W FOOD अजिबात आणू नयेत. हे पदार्थ केवळ ह्रदयाच्या आरोग्यावरचं गंभीर परिणाम करत नाही तर विविध आजारांचा धोका वाढवतात. या 5W FOOD ऐवजी तुम्ही कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत हेही त्यांनी सांगितले आहे. पण हे ‘5W FOOD’ नेमके कोणते याविषयी जाणून घेऊ…

किचनमधून आजच काढून टाका ‘हे’ 5 W FOOD

१) साखर (White Sugar)

साखर केवळ शुद्ध केलेलीच नसते, तर ??? व्यसन लावणारीही आहे. ती शरीरातील दाह वाढवते आणि इन्सुलिनची पातळी झपाट्याने वाढवते. (ती व्यसन लावण्यास आणि शरीरातील दाह वाढवण्यासही कारणीभूत ठरते. तसेच साखर इन्सुलिनची पातळी झपाट्याने वाढवते. )??? इतकेच नाही, तर साखर आतड्यातील जीवाणूंचे संतुलनही बिघडवते. म्हणून किचनमधून साखर काढून टाका आणि त्याऐवजी मध, गूळ, खजूर किंवा नारळाच्या साखरेचा वापर करा.

२) मैदा (White Flour)

रिफाईंड पीठ म्हणजे एक शुद्ध केलेले कर्बोदक आहे. त्यात फायबर किंवा पोषक तत्त्वे नसतात, ते शरीरात शोषले गेल्यावर त्याचे साखरेसारखेच दुष्परिणाम आहेत. त्यामुळे जेवणात रिफाईंड पिठाचा वापर पूर्णपणे टाळा. रिफाईंड पिठाऐवजी तुम्ही बाजरी, गव्हाच्या कोंड्याचे, ओट्स, बेसन पीठ किंवा बदाम पावडर वापरू शकता.

३) पांढरे मीठ (White Refined Salt)

बाजारात मिळणारे शुद्ध पांढरे मीठ घरगुती जेवणात वापरणे टाळा. डॉ. आलोक चोप्रा सांगतात की, साखरेप्रमाणेच हे मीठदेखील शरीरातील दाह वाढवते. कारण- त्यातील सर्व खनिजे काढून टाकलेली असतात आणि ते केवळ रसायनांचे मिश्रण असते. या शुद्ध केलेल्या मिठाऐवजी सैंधव मीठ, गुलाबी मीठ किंवा नैसर्गिक समुद्री मीठ वापरा.

४) रिफाईंड ऑईल (White Refined Oil)

किचनमधून रिफाईंड ऑईल पूर्णपणे काढून टाका. या रिफाईंड तेलामुळे शरीरातील दाह वाढतो, फॅट्स वाढतात. त्यामुळे रिफाईंड तेलाऐवजी कोल्ड प्रेस्ड मोहरीचे तेल, देशी तूप, खोबरेल तेल किंवा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरा.

५) व्हाईट तांदूळ (White Polished Rice)

किचनमध्ये पांढरा तांदूळ वापरणे पूर्णपणे टाळा. हा तांदूळ खूप पॉलिश केलेला असतो आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यात पोषण मूल्य फार कमी आणि कर्बोदके जास्त असतात. पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राईस, लाल तांदूळ, ब्लॅक राईस किंवा बाजरी आणा.

डॉक्टर सांगतात की, पदार्थ जेवढा जास्त पांढरा असतो, तेवढे त्यात पोषक घटक कमी असतात. त्यामुळे आपल्या किचनमधून हे पाच प्रकारचे पांढरे पदार्थ टाळा आणि आरोग्य सुधारा.