Mint and Coriander Juice Benefits: पुदिना आणि कोथिंबिरीची पाने बहुतेकदा चटणी बनवण्यासाठी आणि कोणताही पदार्थ गानिर्श करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. कोथिंबिरीच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे अ, क, के, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. पुदिन्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे अ, क, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात. हे सर्व घटक तुमच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. दररोज सकाळी रिकाम्या पोटी पुदिना आणि कोथिंबिरीचा रस प्यायल्याने अनेक महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात.

पुदिना आणि कोथिंबिरीचा रस पिण्याचे फायदे (Mint and Coriander Juice benefits)

  • दररोज पुदिना आणि कोथिंबिरीचा रस प्यायल्याने तुमचे शरीर थंड होईल, पोटाची जळजळ कमी होईल आणि तुम्ही हायड्रेटेड राहाल. या दोन्ही पानांचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. उन्हाळ्यात हा रस पिणे हा एक उत्तम उपाय आहे. शिवाय वजन कमी करण्यासाठीही हा रस फायदेशीर आहे, त्यामुळे चरबी आणि कॅलरीज जलद बर्न होण्यास मदत होते.
  • हा रस प्यायल्याने मुरुमांचे डाग हलके होतात आणि रंग उजळतो. कोथिंबीर आणि पुदिन्याचा रस पचनसंस्थेसाठीदेखील फायदेशीर आहे.
  • हा रस प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीदेखील मजबूत होते. उन्हाळ्यात पुदिना आणि धणे खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते.

पुदिना आणि कोथिंबिरीचा रस कसा बनवायचा? (How To Make Mint and Coriander Juice)

आवश्यक साहित्य:

  • १ कप पुदिन्याची पाने
  • १ कप कोथिंबीर पाने
  • १/२ कप पाणी
  • १/२ टीस्पून लिंबाचा रस
  • १/२ टीस्पून मध (पर्यायी)
  • बर्फाचे तुकडे (पर्यायी)

रसाची कृती :

  • सर्वप्रथम पुदिना आणि कोथिंबीर चांगले धुऊन घ्या.
  • त्यानंतर पुदिना, कोथिंबीर , पाणी, लिंबाचा रस आणि मध मिक्सर ग्राइंडरमध्ये ठेवा.
  • आता मिक्सर ग्राइंडर चालवा आणि सर्व साहित्य नीट मिसळा.
  • रस एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यात बर्फाचे तुकडे घाला.
  • हा रस आता तुम्ही पिऊ शकता.