बदलती जीवनशैली आणि स्वतःसाठी पुरेसा वेळ न दिल्यास याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. काही आजार वृद्धापकाळात उद्भवू शकतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून अनेक आजारांनी तरूणांना अडचणीत आणण्यास सुरुवात केली आहे. यातील एक प्रमुख आजार म्हणजेचं हृदयविकाराचा झटका आहे. एका संशोधन अहवालात असे दिसून आले आहे की, तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढत आहे. हृदयविकाराचा झटका ही गोष्ट तरुणांसाठी अतिशय गंभीर आहे. हृदयविकाराचा धोका कोणालाही असू शकतो. मात्र, तारुण्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे.

एम्सच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ अंबुज रॉय म्हणतात की, कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त असतो. कोरोना संसर्ग आणि लोकांची खराब जीवनशैली हे यामागचे प्रमुख कारण म्हणून समोर आले आहे.

कोरोनानंतर हृदयाचे ठोके असामान्य होणे, हृदयाचे स्नायू कमकुवत होणे, पायातून रक्ताच्या गुठळ्या फुफ्फुसापर्यंत पोहोचणे इत्यादी लक्षणे दिसू लागली आहेत. अशा परिस्थितीत तुमचा रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल वेळोवेळी तपासत राहा, असे त्यांचे म्हणणे आहे.

हृदयाची जळजळ होण्याचा धोका २० पट वाढला

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात असे म्हटले आहे की आयसीयूमध्ये दाखल असलेल्या कोरोना संक्रमित लोकांमध्ये हृदयाच्या जळजळ होण्याचा धोका २० पटीने वाढला आहे. त्याचे हृदय किमान एक वर्षासाठी गंभीर धोक्यात आहे. इतकेच नाही तर कोविडमध्ये गंभीर आजारी न पडलेल्या आणि होम आयसोलेशनमध्ये बरे झालेल्यांनाही हृदयविकाराचा धोका आठ पटीने जास्त आहे.

आणखी वाचा : World Heart Day 2022 : नवजात बालकांनाही जन्मतःच हृदयविकाराचा धोका; कशी ओळखावी लक्षणे? जाणून घ्या

धोकादायक असण्याची कारणे

  • कोरोना हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या पेशींच्या अशा प्रथिनांना चिकटून राहतो.
  • बाधित लोकांमध्ये रक्त गोठण्याची प्रकरणे अधिक आहेत.
  • दोन आठवड्यांनंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका १६७ टक्के जास्त होता.

३०-३५ वयोगटातील तरूणांमध्ये हृदयाचे ठोके जलद होत असल्याच्या तक्रारीत वाढ

३० ते ३५  वयोगटातील तरुणांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. तरुणांच्या हृदयाचे ठोके ६० ते १०० प्रति मिनिट ऐवजी १८० ते २०० प्रति मिनिट धावत आहेत. तरुणांमध्ये ह्रदयविकाराचा त्रास वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या आजारात हृदयाचे ठोके सामान्यपणे हलत नाहीत. मुझफ्फरपूरच्या एसकेएसएमएच आणि इतर रुग्णालयांमध्ये २० टक्के रुग्ण या आजाराने पोहोचत आहेत.

हृदयाचे ठोके वाढण्याच्या आजारातून बरे होण्यासाठी सुमारे १५ दिवस लागतात. हृदयाचे ठोके जलद होत असल्याची तक्रार घेऊन दररोज रुग्ण त्यांच्याकडे येतात. त्यात ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुणही आहेत.