‘या’ ५ चुकांमुळे तुमची रक्तातील साखर वाढू शकते, राहू नका बेफिकीर

भारतीय मधुमेह महासंघाच्या म्हणण्यानुसार, भारतात सुमारे ७ कोटी लोकं या आजाराने ग्रस्त आहेत.

lifestyle
मधुमेहाच्या रुग्णांनी हिरव्या भाज्या म्हणजे पालक, कारले, दुधी, कोबी यांचे सेवन करावे. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन्स, बीटा कॅरोटीन आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे साखरेची पातळी संतुलित राहते. त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहते. (photo: jansatta)

मधुमेह ही गंभीर समस्या बनत चालली आहे. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाने ग्रस्त लोकं अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. रक्तातील साखरेला ‘स्लो पॉयझन’ असेही म्हणतात. भारतीय मधुमेह महासंघाच्या म्हणण्यानुसार, भारतात सुमारे ७ कोटी लोकं या आजाराने ग्रस्त आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे अंधुक दिसणे, जास्त थकवा येणे, चिडचिडेपणा यासारख्या समस्या सामान्य होतात.

रक्तातील साखर वाढल्यामुळे हृदयविकार, त्वचा खराब होणे, किडनी निकामी होणे इत्यादी अनेक आजार जन्माला येतात. मधुमेहामुळे लोकं असे जीवन जगू लागतात ज्यामध्ये ना चव असते ना आरोग्य. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहावर कोणताही इलाज नाही.

शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की आहार हाच उपाय उरतो. मधुमेह पातळी वाढण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत या घरगुती उपायांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच ५ चुका सांगणार आहोत, ज्या अनेकदा मधुमेहाचे रुग्ण करतात आणि त्‍यांच्‍या प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो.

साखरेची पातळी न तपासणे

तुम्ही जर तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वेळेवर तपासली नाही, तर साखरेचे चढउतार दिसत नाहीत. त्यामुळे उपवास, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर दिवसातून चार वेळा साखरेची पातळी तपासा. जेवणानंतर दोन तासांनी तुम्ही साखरेची पातळी तपासू शकता.

व्यायाम न करणे

मधुमेही रुग्णांना व्यायाम करायला सांगितल्यावर ते टाळतात. साधारण घरातील कामे तुमच्‍या शरीराला त्‍या प्रमाणात व्यायाम करत नाहीत. त्यामुळे नियमित व्यायाम करा.

अधिक व्यायाम करणे

मधुमेहामध्ये स्नायू तयार करणे फार महत्वाचे मानले जाते. त्यामुळे लोकं त्यांच्या स्नायूंच्या प्रशिक्षणात अधिक व्यायाम करण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे स्नायूंचा आकार लवकर वाढू लागतो. व्यायाम करताना शरीराची काळजी घ्या.

विश्रांती न घेणे

व्यायामादरम्यान स्नायूंवर येणारा ताण दूर करण्यासाठी, व्यक्तीने पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. पण जर तुम्ही व्यायामानंतर शरीराला पूर्णपणे आराम करण्याची संधी दिली नाही तर ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते.

हिरव्या भाज्या न खाणे

मधुमेहाच्या रुग्णांनी हिरव्या भाज्या म्हणजे पालक, कारले, दुधी, कोबी यांचे सेवन करावे. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन्स, बीटा कॅरोटीन आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे साखरेची पातळी संतुलित राहते. त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Your blood sugar may increase due to these 5 mistakes control diabetes eat healthy food you should know scsm

ताज्या बातम्या