जागतिकीकरणाची दारं खुली झाल्यापासून मानवाच्या जीवनशैलीत आणि त्याच्या राहणीमानात कमालीचा बदल झाला आहे. या बदलामुळेच मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. एवढंच नाही तर त्याच्या आरोग्याबरोबरच पर्यावरणाचा -हासही होत चालला आहे. जागतिकीकरणाच्य़ा नावाखाली माणूस सिमेंटची जंगलं उभारत आहे, वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने वायू आणि ध्वनीप्रदूषण निर्माण होत आहे. या आणि अशा असंख्य कारणांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. मात्र जे डोळ्यांना दिसतं केवळ त्यानेच प्रदूषण निर्माण होतं असं नाही. तर काही असेही घटक आहेत ज्यांचा वापरामुळे देखील पर्यावरणाचा -हास होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साजश्रृंगार करणे हा महिलांचा आवडता छंद आहे. कोणत्याही स्त्रीला आपल्या प्रसाधनांविषयी विशेष प्रेम असते. मात्र, हीच प्रसाधनं प्रदूषणकारी असतील असं सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, हो हे खरं आहे. प्रसाधनांमध्ये सर्वात जास्त वापरात येणारी वस्तू म्हणजे ‘फेसवॉश’. पण, हा फेसवॉशही काही प्रमाणात प्रदूषणकारी आहे.

फेसवॉश आणि स्क्रबमुळे जरी आपला चेहरा उजळून निघत असल्याचा दावा कंपन्या करत असल्या तरी या वस्तूंमध्ये असलेल्या मायक्रोप्लास्टिकमुळे प्रदूषणात भर पडत आहे. हे मायक्रोप्लास्टिक जलजीव आणि मानवासाठी धोकादायक ठरत आहेत.
बाजारात विकणा-या अनेक पर्सनल केअर उत्पादानांच्या चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये बहुतांश प्रसाधनांमध्ये नॉन- बायोडिग्रेडेबल मायक्रोबिड्स असल्याचे आढळून आले आहे. हे नॉन- बायोडिग्रेडेबल मायक्रोबिड्स पाण्यामार्फत नदी, समुद्र या जलसाठ्यांपर्यंत पोहोचते आणि नकळतपणे अन्नसाखळीच्यामार्फत ते माणसांच्या पोटापर्यंत पोहोचतात.

एन्वाइरन्मेंट प्रोटेक्शन ग्रुप टॉक्सिक लिंकनुसार, भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक जास्त विक्री होणा-या महत्वाच्या अशा १६ ब्रॅंडमधील १८ पर्सनल केअर उत्पादनांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत फेशवॉशमध्ये ५० टक्के आणि स्क्रबमध्ये ६७ टक्के मायक्रोप्लास्टिक असल्याचे आढळून आले. या मायक्रोप्लास्टिकलाच मायक्रोबीड्स असे देखील संबोधले जात असून अनेक देशांमध्ये यासारख्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, आपल्या त्वचेबरोबरच आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे आपली प्रसाधने, फेसवॉश, स्क्रब यांची निवड करतांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Your face wash too is spreading pollution is harmful for human health
First published on: 05-05-2018 at 10:41 IST