Depression Symptoms : प्रत्येक जोडप्याला वाटतं की, त्यांनी त्यांचे आयुष्य आनंदाने जगावं. त्यांच्या नात्यात कधीही दुरावा किंवा कोणत्याही अडचणी येऊ नयेत. त्यामुळे प्रत्येक जोडीदार नातं जपण्यासाठी प्रयत्न करतो. दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात; पण अनेकदा व्यक्तीला जबाबदारी आणि कामामुळे तणाव जाणवू शकतो. अशात जर नात्यातसुद्धा मतभेद असतील, तर व्यक्तीला नैराश्य येऊ शकतं. नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण आहे. तुमचा जोडीदार नैराश्यातून जात आहे का? जर हो, तर ते कसं ओळखायचं? आज आपण सविस्तर जाणून घेऊ.

  • नेहमी दु:खी राहणं, हे नैराश्याचं सर्वांत सामान्य लक्षण आहे. जर तुमचा जोडीदार पूर्वीसारखा हसत किंवा बोलत नसेल आणि सतत तणावात राहत असेल, तर समजायचं की, तो नैराश्यात आहे. सतत शांत राहणं, कोणत्याही गोष्टीमध्ये इच्छा किंवा आवड न दाखवणं आणि अचानक एकटं राहायला आवडणं हेसुद्धा नैराश्याचं लक्षण असू शकतं.

हेही वाचा : Binge Drinking : महिन्यातून एकदा दारूचे अतिसेवन केल्यामुळे स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
  • नैराश्यात असलेली व्यक्ती स्वत:ला इतरांपासून दूर ठेवते. पार्टी, सामाजिक कार्यक्रमाला जाणं टाळते. मित्र किंवा नातेवाइकांना भेटणं त्यांना आवडत नाही. जर तुमच्या जोडीदारामध्ये अशी लक्षणं दिसत असतील, तर वेळीच सावध व्हा.
  • जोडीदाराची झोपण्याची वेळ आणि पद्धत त्या व्यक्तीला माहीत असते. जर तुमचा जोडीदार कधी खूप जास्त झोपत असेल किंवा कधी खूप कमी झोपत असेल, तर समजायचं हे नैराश्याचं लक्षण आहे. नैराश्य आलेले लोक अनेकदा रात्रभर कूस बदलत असतात किंवा रात्री वारंवार जागे होतात.
  • जर तुमचा पार्टनर खूप शांत स्वभावाचा असेल; पण अचानक चिडचिड करीत असेल किंवा सतत राग व्यक्त करीत असेल, तर ते नैराश्याचं लक्षण असू शकतं. सतत मूड बदलणं, विचित्र वागणं अशी लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader