जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतातील मधुमेही रुग्णांची संख्या लक्षात घेता याला मधुमेहाची राजधानी देखील म्हटले जाते. मधुमेहाच्या आजारात आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वैद्यकीय भाषेत साखरेचे प्रमाण वाढणे याला हायपरग्लायसेमिया म्हणतात.

तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास उपचार केल्याशिवाय राहू नये. या आजारात रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रितपणे चढ-उतार होत राहते, त्यामुळे हृदयविकाराचा झटका, मेंदूचा झटका, किडनी निकामी होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या जीवघेण्या परिस्थितीचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकता. पण त्याआधी रक्तातील साखर वाढण्याची कारणे कोणती आहेत हे जाणून घेऊया.

Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
How do you manage salary expenditures
कर्मचाऱ्यांनो​, महिन्याचा पगार लगेच संपतो; पगाराचे कसे नियोजन करावे? जाणून घ्या, खास टिप्स
Budh gochar 2024 mercury transit in tula horoscope
पैसाच पैसा! बुधाच्या तूळ राशीतील संक्रमणामुळे ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब; नोकरी, व्यवसायातून मिळू शकतो आर्थिक फायदा
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
Fennel seeds carom seeds water benefits
आरोग्याच्या ‘या’ ५ समस्या होतील झटक्यात दूर; जाणून घ्या ओवा, बडीशेपच्या मॅजिक ड्रिंकचे फायदे
non-vegetarian food, lunch boxes, food safety, danger zone temperature, bacteria, foodborne illnesses, Dt. Umang Malhotra, tiffin safety, Salmonella, food storage
टिफिनमध्ये मांसाहारी पदार्थ घेऊन जाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?

( हे ही वाचा: १८ वर्षांनंतर राहू मेष राशीत करेल प्रवेश , ‘या’ ४ राशीच्या लोकांच्या जीवनात आणेल आनंद आणि समृद्धी )

अयोग्य आहार

अनेकांना योग्य आहाराबद्दल उदासीनता असते. अशा स्थितीत त्यांना फास्ट फूड, दारू, सिगारेट आणि अनेक वाईट सवयींचे व्यसन लागले आहे. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. अशा लोकांनी आपल्या रक्तातील साखरेची नियमित तपासणी करावी.

( हे ही वाचा: ब्लड शुगर सोबत काजू हाय बीपीही ठेवते नियंत्रित; जाणून घ्या इतर फायदे )

लठ्ठपणा आणि ताणतणाव

लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात, काही वेळा लठ्ठपणा हे रक्तातील साखर वाढवण्याचे कारणही असते आणि जास्त ताणामुळे कोर्टिसोल नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात जे रक्तातील साखर वाढवण्याचे काम करतात.

( हे ही वाचा: Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेतील भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया )

आहार आणि व्यायाम

उच्च रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचे सेवन करावे तसेच ड्राय फ्रूट्स आणि काही औषधे वापरावीत. याशिवाय नियमित व्यायाम, योगासने आणि ध्यान केल्याने तुमचे शरीर आणि मन निरोगी राहते, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

( हे ही वाचा: Marriage Horoscope 2022: नवीन वर्षात तुमचे लग्न होईल की नाही? या ‘५’ राशींसाठी आहे खुशखबर )

इतर उपाय

जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल, तर सर्वप्रथम तुमचे वजन नियंत्रित करा आणि तणावापासून दूर राहा. याशिवाय तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा आणि कारल्याचा रस, चुरणे, मेथी इत्यादी काही घरगुती उपाय आहेत ज्याद्वारे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते.

या सगळ्या उपाययोजनाआधी आधी आपल्या डॉक्टरचा सल्ला आवर्जून घ्या.