Depression symptoms : आजच्या काळात धावपळीचे आयुष्य आणि कामाच्या तनावामुळे मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याचे एक मोठे कारण तुमच्या चुकीच्या सवयी. या सवयी तुमचा ताण वाढवू शकतात. या लेखात आम्ही त्या चुकीच्या सवयींबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये सुधारणा करुन तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करू शकता.
नैराश्याचे कारण
पहिले कारण म्हणजे झोप न लागणे. आजकाल बहुतेक लोक रात्री जागे राहतात आणि नंतर ऑफिससाठी सकाळी लवकर उठतात, अशा स्थितीत आरोग्य तज्ज्ञांच्या मते आवश्यक असलेली ८ तासांची झोप पूर्ण होत नाही.




चांगला आहार न घेणे हे देखील नैराश्याचे कारण असू शकते. तुमच्या आहारात पौष्टिकतेने समृध्द अन्न समाविष्ट करणे आवश्यक आहे. पोषक तत्वांचा अभाव देखील तुम्हाला नैराश्याकडे घेऊन जातो.
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने देखील तुम्हाला नैराश्य येऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयी सोडल्या पाहिजेत.
जे लोक स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात ते देखील नैराश्याला बळी पडू शकतात. त्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉपवर जास्त वेळ घालवणे मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही.
लोकांच्या सहवासात न राहणे देखील तुम्हाला नैराश्याकडे नेऊ शकते. म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्हाला असे काहीतरी वाटते तेव्हा शक्य तितक्या लोकांमध्ये रहा. स्वतःला एकटे सोडू नका. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा.
(टीप – हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)