ऐका होsss! युट्युबचे Music फिचर लाँच, तीन महिने फ्री सबस्क्रिप्शन

गतवर्षी जूनमध्ये अमेरिकासह १७ देशात युट्युबने ही सर्व्हिस सुरू केली होती.

भारतात युट्युबने Youtube Music, Youtube Music Premium आणि Youtube Premium लाँच केले आहे.  यासोबतच भारतामध्ये स्ट्रिमिंग स्पेसमध्ये आणखी एक मोठ नाव जोडलं गेलं आहे. गतवर्षी जूनमध्ये अमेरिकासह १७ देशात युट्युबने ही सर्व्हिस सुरू केली होती.

यूट्यूब प्रीमियमससाठी कोणतेही नवीन अॅप डाऊनलोड करायची गरज नाही. तुमचे युट्युब फक्त अपडेट करावे लागेल. त्यानंतर ही सुविधा तुम्हाला मिळणार आहे. पहिले तीन महिने याचा मोफत लाभ घेता येणार आहे. त्यानंतर मात्र, प्रति महिना ९९ रूपये देऊन सबस्क्रिप्शन करावे लागेल. भारतात असलेल्या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सला Youtube Music चांगलीच टक्कर देईल. गुगलनेही आपल्या होमपेज Youtube Music बद्दल माहिती दिली आहे.

Youtube Musicमध्ये गाण्यांचा खजाना आहे. सर्व गाणी एकाच ठिकाणी उपबलब्ध असणार आहेत. मूळ गाण्यासोबत रीमिक्स, लाइव परफॉर्मेंसचे कव्हरेज, कव्हर सॉन्ग्स आणि म्यूजिक विडियोही असणार आहे. युट्युबवर तुम्हाला कॅटलॉग मिळेल. त्यामध्ये कंपनी दोन प्रकारची सर्व्हिस देत आहे. यामध्ये एक फ्री Youtube Music आणि दुसरे Youtube Music Premium आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Youtube launches music streaming services in india