मस्त थंड पाऊस पडत असला की आपली वाट सहज किचनच्या दिशेने जाते. मस्त थंड वातावरणात काही तरी गरम, चटकदार खाण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. पण हा मोह आपल्या शरीरासाठी तसा घातक असतो. नेहमीच्या तेलकट पदार्थांचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतात. सध्या अनेकजण हार्डकोअर वर्कआउट आणि हेल्दी आहार घेण्याकडे लक्ष देतात. मग अशावेळी कसे तेलकट पदार्थ खाणार. नेहमीच्या तेलकट पदार्थांना बाजूला करून तुम्ही हेल्दी पण चवदार अशा काही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. याबद्द आहारतज्ज्ञ, विधी चावला इंडियन एक्प्रेसशी बोलतांना सांगतात की “तळलेले पदार्थ जसे समोसे, पकोरा, टिक्की अशा पदार्थांना नको बोलणे कठीण असले तरी ते तेलकट आणि तळलेले असतात आणि म्हणून वजन कमी करण्याच्या दृष्टीने योग्य नसतात. याव्यतिरिक्त, हे पदार्थ पचविणे देखील अवघड आहे कारण पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाचन क्रियेवर परिणाम होतो.”

हे आहेत सोप्पे ५ आरोग्यदायी स्नॅक्स!

  • मकई – पावसाळ्यात स्वीट कॉर्न कोणाला आवडत नाही? अगदी सगळ्याचं वयोगटातील लोकांना स्वीट कॉर्न आवडतं. पण इंटरनेटवर सर्रास स्वीट कॉर्न आरोग्यदायी नाही, त्यात साखर जास्त असते आणि यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होत नाही अशी आणिक मिथक तुम्हाला सापडतील. खरं तर मकई हे चवदार आणि पौष्टिक स्नॅक्स आहे. हे एक लोकप्रिय रेन फूड आहे जे आपल्या नेहमीच्या स्नॅक पदार्थांनामध्येही सामायिक झालं आहे. या पावसाळ्यात भाजलेल्या गरम गरम स्वीट कॉर्नवर मस्त मसाला आणि बटर टाकून नक्की खा.
  • ग्रील्ड फळ: फळ आरोग्यासाठी किती चांगली असतात हे सर्वांना माहितच आहे. उन्हाळ्यात तर आवर्जून फळ खायला सांगितले जाते. परंतु पावसाळ्यातही आवश्य फळ खावी. फळांचे सेवन केल्यामुळे शरीरात पाण्याच प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. पावसाळ्यात तुम्ही या फळांची हटके रेसिपी ट्राय करू शकता.उपलब्ध आवडत्या फळांचे तुकडे करा त्यावर  लिंबाचा रस घाला. व्यवस्थितपणे मिक्स केल्यावर ग्रीलवर ठेवून ग्रील करा आणि त्यावरून चाट मसाला घाला.
  • पॉपकॉर्नः अजून एक सगळ्यांचा आवडता पदार्थ. पॉपकॉर्न बद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते धान्यापासून बनवलेला पौष्टिक स्नॅक आहे. एक कप पॉपकॉर्नमध्ये एका वेळेच्या आहारातील फायबर आणि प्रथिने असतात आणि म्हणूनच पॉपकॉर्न हा एक उत्कृष्ट स्नॅक्स बनतो.
  • पफ्ड राइस भेळ: बद्धकोष्ठतावर उपचार करण्यासाठी फायबर असलेले पफ्ड तांदूळ आवश्यक आहे. यात प्रतिजैविक पदार्थ, खनिजे आणि पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यास मदत होते आणि सूक्ष्मजंतूंचा विरूद्ध लढा देण्यासही मदत होते. एका बाउलमध्ये सुमारे २० ग्रॅम पफ्ड राइस मुरमुरा घ्या. तुम्ही हा मुरमुरा गरम करूनही घेऊ शकता. त्यावर ताजी घरातील कोथिंबीर चटणी, चिरलेला टोमॅटो आणि कांदा घाला. यावर टोमॅटो केचअप घालणे मात्र टाळा.
  • कमी चरबीयुक्त दही: १०० ग्रॅम ६०-कॅलरी डबल-टोनिंग दही घ्या. एकूण १०० कॅलरीसाठी सुमारे पाच ग्रॅम हंगामी फळे आणि बेरी घाला. मिक्स करा आणि तुमचा स्नॅक तयार आहे. दहीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण जास्त असते, जे आपल्याला आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Foods For a Diabetic:
तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात
how to take Care of indoor plants
घरातल्या झाडांची निगा