अशोक रावकवी

मुंबईतल्या समलिंगींसाठी आम्ही ‘बॉम्बे दोस्त’ या नावाचं एक छोटं नियतकालिक सुरू केलं आणि पहिल्याच प्रयत्नाला २००० लोकांचा प्रतिसाद मिळाला. काही पत्र वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. लिहिणारे जवळजवळ सगळेच पुरुष भेदरलेले, घाबरलेले आणि एकाकी होते. त्यांपैकी अनेक जणांना तर एकटेपणामुळं आत्महत्या करावीशी वाटत होती. मदत मागायला कुठं जावं, हे त्यांना कळत नव्हतं. अखेर आम्ही या समुदायाकरिता संघटित पद्धतीनं काम करण्यासाठी ‘हमसफर ट्रस्ट’ची स्थापना केली..

girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
pune school girl suicide, pune school girl attempts suicide
धक्कादायक! तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; लोणी काळभोर येथील घटना
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

मी अगदी नशीबवान माणूस आहे. प्रत्येकाला केवळ एकच आई असते, माझी काळजी घेणाऱ्या मात्र तीन आया होत्या. माझी जन्मदात्री शोभाअम्मा, मी राहतो त्या शहराची मातृदेवता मुंबादेवी आणि तिसरी होती मुंबई महानगरपालिका. जीवन-मृत्यूचा सततचा संघर्ष असणाऱ्या माझ्या जगात या तीन देवतांनीच मला साथ दिलेली आहे. १९९०च्या दशकात या तिघींनी एकत्र येऊन धडपडत हातपाय मारणाऱ्या एका जिवाला सावरलेलं आहे.

आईची गरोदरपणाची मुदत पूर्ण होण्याआधीच मी जन्माला आलो. जन्मत: माझं वजन जेमतेम ६ पौंड होतं (म्हणजे धड २ किलोसुद्धा नव्हतं.) मी जगेन अशी कुणालाच आशा वाटत नव्हती. आज ज्या समुदायासाठी मी काम करतो आहे, तो समलिंगी समुदाय तर त्या वेळी अस्तित्वातदेखील नव्हता. भारतीय समाज म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या प्रचंड लोकसंख्येत हा एक दडलेला आणि अदृश्य गट होता. त्या काळच्या व्याख्येनुसार हे सारे ‘गुप्त प्रवृत्ती’ बाळगणारे ‘गुप्त लोक’ होते. मुंबईमध्ये इतर पुरुषांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असली, तरी त्यांचा कुठला विशिष्ट समुदाय मात्र नव्हता. या पुरुषांना कोणी समलिंगी म्हणून ओळखतही नसे. असं का झालेलं होतं, याबाबतचे सारे प्रश्न आपण आधीच्या काही स्तंभांमध्ये पाहिलेच आहेत. या साऱ्यांना मला एकत्र आणायचं होतं. माझ्यासमोरचा त्यांना एकत्र आणण्याचा मार्ग तसा सोपा होता. मी पत्रकार असल्यानं मला चांगलं लिहावं कसं आणि वृत्तपत्र किंवा नियतकालिकं कशी प्रसिद्ध करावीत, हे नीट ठाऊक होतं. खरं सांगायचं, तर जगात मला केवळ हीच एक गोष्ट चांगली येत होती. केवळ शब्द हेच ज्याचं शस्त्र आहे, असा कुशल कारागीर मी होतो. व्यवसाय करणं, पैसा मिळवणं आणि त्याचं नियोजन करणं याचा तर मला गंधच नव्हता. या वेळी राकेश माझ्या मदतीला धावून आला.

त्यानं ‘प्राइड पब्लिकेशन’ नावाच्या एका प्रकाशन संस्थेची नोंदणी केली. (त्या वेळी आम्ही तर या कंपनीची शेअर सर्टिफिकेट्सदेखील छापली होती. भविष्यात कधी तरी संग्राहकांसाठी ती फारच मौल्यवान ठरावीत!) अखेर आम्ही व्यवसायामध्ये प्रवेश केलाच! आम्ही भारतातल्या समलिंगी व्यक्तींसाठी पहिलं वृत्त-नियतकालिक सुरू केलं. हे नियतकालिक दोन भाषांमध्ये होतं : इंग्रजी आणि हिंदी. याच्या पहिल्या आवृत्तींच्या प्रतींची संख्या होती तब्बल ६००. पण आम्ही त्यांचं वितरण नेमकं कसं करणार होतो? आम्हाला नियतकालिकाच्या वितरणाबद्दल काहीच ठाऊक नव्हतं. अखेर मी फोर्टमधल्या एका पुस्तकांच्या वितरकाकडं हे नियतकालिक घेऊन गेलो. त्याचा विषय समजताच त्यांनी माझी ‘विकृत’ आणि ‘निल्र्लज माणूस’ अशी संभावना करून बाहेर हुसकावूनच दिलं.

अखेर आम्हाला एक कल्पना सुचली. आमची दिल्ली, कोलकाता आणि  चेन्नई इथल्या काही लोकांशी ओळख होती. आम्ही त्या प्रत्येकाला नियतकालिकाच्या २५ प्रती पाठवण्याचं ठरवलं. त्यांनी त्या प्रती विकल्या, की आम्हाला पुढचा अंक काढता आला असता. अशा प्रकारे समलिंगींसाठी असणारं भारतातलं पहिलं ‘बॉम्बे दोस्त’ या नावाचं नियतकालिक आम्ही सुरू केलं. त्याला इंग्रजी प्रसारमाध्यमांमधून चांगल्यापैकी प्रसिद्धीही मिळाली. हिंदी आणि मराठीमध्ये मात्र कुणी त्याची विशेष दखल घेतली नाही. अल्पसंख्याक लैंगिक गटाबद्दल असणाऱ्या अशा पहिल्याच प्रयत्नाबद्दल आपल्याला काहीच ठाऊक नाही, असं आपली मराठी माणसं का भासवत होती कुणास ठाऊक? पुढं तर ‘न्यू यॉर्क टाइम्स’नं आमची याबद्दल मुलाखत घेतली आणि ती अमेरिकेत प्रसिद्ध झाली.

‘बॉम्बे दोस्त’च्या रूपानं आम्ही एक छोटासा प्रयत्न सुरू केला होता. त्यानं पुढं मोठं स्वरूप धारण केलं. बांद्रा रेल्वे स्टेशनसमोर एक ‘वीणा-बीना बिझनेस सेंटर’ नावाची एक इमारत आहे. या नियतकालिकासंदर्भात आम्हाला येणारी पत्रं मिळण्यासाठी आणि काही प्रती साठवून ठेवण्यासाठी एका पत्त्याची सोय आम्ही तिथं करून ठेवली होती. पहिला अंक प्रसिद्ध होईतो आम्ही या पत्त्याबद्दल पार विसरूनही गेलो होतो.

अंक प्रसिद्ध झाल्यावर सुमारे महिन्याभरानंतर त्या इमारतीतून एका बाईंचा मला फोन आला. त्या अगदी घाईघाईनं बोलत होत्या. ‘‘अहो, लवकर या, लवकर इकडे या – इथं तुमच्यासाठी २,००० पत्रं येऊन पडलेली आहेत. शेकडो लोक तुम्हाला शोधत इथं येताहेत.’’ नेमकं काय घडतं आहे, याची मला कल्पना न आल्यानं मी जरा गांगरूनच गेलो होतो. मनात ही भीती बाळगूनच मी तिथं पोचलो. मात्र त्यांपैकी काही पत्रं वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी सारी पत्रं आमच्या छोटय़ाशा संपादक मंडळाला दाखवली. सुहेल अब्बासी, श्रीधर रंगायन आणि ज्याला आपलं नाव गुप्त ठेवायचं आहे, असे एक जण असे लोक आमच्या संपादक मंडळावर होते. ती पत्रं बघून आम्ही चक्रावलोच. साऱ्या भारतभरातूनच ही पत्र आलेली होती. इतकंच काय, आमचं नियतकालिक पाकिस्तानमधल्या क्वेट्टा आणि अफगाणिस्तानमधल्या काबूलपर्यंतही पोचलेलं होतं, हेही आम्हाला पत्रांवरून कळलं. अगदी गोहाटी, दुबई आणि ढाका अशा ठिकाणांहूनही पत्रं आलेली होती. याआधी मी एकाच वेळी इतका आनंदी आणि चिंतित कधीच झालेलो नव्हतो. इतक्या प्रचंड संख्येनं असणाऱ्या वाचकांना आणि या असंघटित समुदायाला आम्ही कसे काय पुरे पडणार होतो? पत्र लिहिणारे जवळजवळ सगळेच पुरुष भेदरलेले, घाबरलेले आणि एकाकी होते. त्यांपैकी अनेक जणांना तर एकटेपणामुळं आत्महत्या करावीशी वाटत होती. मदत मागायला कुठं जावं, हे त्यांना कळत नव्हतं. बहुसंख्य लोकांना आपण जगात एकटेच ‘तसले’ पुरुष आहोत असं वाटत होतं. जवळजवळ प्रत्येकालाच कसल्या ना कसल्या मदतीची गरज होती. इतक्या साऱ्या लोकांपर्यंत पोचणं, इतक्या मोठय़ा प्रश्नाची हाताळणी करणं आमच्यासारख्या छोटय़ा नियतकालिकासाठी व्यावहारिकदृष्टय़ा अशक्यच होतं. अखेर आम्ही साऱ्यांनी एकत्र बसून रणनीती ठरवली. प्रत्येकाचेच वेगवेगळ्या मोठय़ा शहरांमधे कुणी ना कुणी मित्र होते. आम्ही त्यांना या विषयावर मदत करण्याबाबत कळवलं.

ज्या लोकांनी भारताच्या पूर्व भागातून पत्रं पाठवली होती, त्यांचा गठ्ठा आमच्या कोलकाता इथल्या मित्रांना पाठवली. देशाच्या उत्तरेतून येणाऱ्या सगळ्या पत्रांचा गठ्ठा आम्ही आमच्या दिल्लीतल्या मित्रांना पाठवला, तर दक्षिणेतला सारा गठ्ठा आम्ही चेन्नईच्या मित्रांकडे धाडला. अशा प्रकारे या साऱ्या पत्रांना उत्तरं देण्याचं काम आम्ही एकमेकांत वाटून घेतलं.

त्या वेळी देशात नेमकं काय घडतं होतं, याची ‘बॉम्बे दोस्त’मुळं आम्हाला चांगलीच कल्पना आली. एका पुरुषाला दुसऱ्या पुरुषाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाची – म्हणजे समलिंगी पुरुषांची एक नवीनच ओळख देशात तयार होत होती. आता या साऱ्यांना एकत्र येऊन समुदाय म्हणून ओळख प्राप्त होत होती. मुख्य म्हणजे या साऱ्यांना तातडीनं मदत करण्याची गरज होती. ज्या लोकांनी आम्हाला मुंबईतून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून पत्रं पाठवली होती, त्यांना आम्ही थेटपणे मदत करायचं ठरवलं. आम्ही त्यांच्या समुपदेशनाची आणि त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असल्यास परिचित डॉक्टरांकडं पाठवण्याची सोयही केली.

अशा प्रकारे आमचं समाजकार्य सुरू झालं. पुढं आणखी काही जण आम्हाला सामील झाले. राकेश मोदी, रमेश मेनन, विवेक आनंद, पल्लव पाटणकर यासारखे किती तरी साथीदार या कार्यात सहभागी झाले. थोडक्यात, समलिंगी पुरुषांकरिता मुंबईत सुसंघटितपणे समाजकार्य करण्याची सुरुवात एका छोटय़ा नियतकालिकापासून झाली. ‘बॉम्बे दोस्त’मुळं हे सामाजिक कार्य सुरू करण्याचं बीज पडलं असलं, तरी कुठल्याही नियतकालिकाला हा मोठा प्रश्न हाताळता आला नसता, हेही आम्हाला ठाऊकच होतं. पुढची चार वर्ष आम्ही नेटानं समाजकार्य करतच राहिलो. अखेर आम्हाला कार्यालयासाठी हक्काची जागा मिळाल्याखेरीज आम्हाला पुढं जाणं शक्यच होणार नाही, हे लक्षात आलं.

तोवर ‘बॉम्बे दोस्त’ खास करून टेलिफोन हेल्पलाइनच्या माध्यमातून काम करत असे. मदतीची गरज असणारे पुरुष आमच्या हेल्पलाइनवर कॉल करत. आम्ही त्यांच्याशी फोनवर बोलत असू. गरज पडल्यास प्रशिक्षित स्वयंसेवक (स्ट्रीट वर्कर्स) त्यांच्यांशी संपर्क साधून भेटत असत. रेल्वे फ्लॅटफॉर्म, चहाची रेस्टॉरंट्स, उडपी हॉटेल्स यांसारख्या ठरावीक गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी ते भेटत असतं. ‘कुणाच्याही घरी जायचं नाही किंवा कुणालाही स्वत:च्या घरी बोलवायचं नाही,’ अशा स्पष्ट सूचना आम्ही त्यांना दिल्या होत्या.

त्याकाळीसुद्धा समलिंगी व्यक्तींना ब्लॅकमेल, खंडणी आणि हिंसाचार या गोष्टींची मोठय़ा प्रमाणावर भीती वाटत असे. ‘बॉम्बे दोस्त’नं भारतातल्या सगळ्यात मोठय़ा शहरातल्या शेकडो समलिंगी पुरुषांना मदत केलेली आहे. मुंबई शहर हे भारताची आर्थिक राजधानी आहे. मोठय़ा प्रमाणातलं भांडवल आणि श्रमशक्ती इथं एकत्रित आल्यानं मुंबादेवीनं इथल्या रहिवाशांना दिलेलं वचन नेहमीच खरं होत असतं.

आमच्या या संघटित कामाला लवकरच सर्वदूर मान्यता मिळाली. जपान, चीन, हाँगकाँग, थायलंड, फिलिपाइन्स आणि श्रीलंका इथल्या समलिंगी व्यक्तींचे गट आमचं कार्य बघायला येऊ लागले. ऑस्ट्रेलियामधलं समलिंगी संघटनांचं कामकाज कसं चालतं, हे पाहायला मला तिथं निमंत्रित करण्यात आलं. सिडनी आणि कॅनबेरा इथल्या समलिंगी संस्थांना मी भेटी दिल्या. माझ्यासोबत इंडोनेशियातील डेडे इटेमो आणि मलेशियातून हिसाम हुसेन हे दोघे जण आलेले होते. आजही आम्ही मित्र आहोत आणि वयाबरोबरच दूरदेशीच्या मित्रांसोबतची आमची मैत्री वाढतच गेलेली आहे.

यादरम्यान माझ्या वैयक्तिक आयुष्यात उलथापालथी घडण्याचा सिलसिला सुरूच राहिला. काही कौटुंबिक वादांमुळं १९९२मध्ये आम्हाला शिवाजीपार्क इथलं घर गमवावं लागलं. मग मी खार इथल्या रामकृष्ण मिशनजवळ एक छोटं घर घेतलं. आई आणि आत्या या दोघींनीही माझ्यासोबत रहायला यायचं ठरवलं. या नव्या घरामुळं मी आणखी एका ‘आई’जवळ, शारदा माँजवळ आलो. शारदा माँ म्हणजे रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी. अनेक वर्षांपूर्वी मी संन्यासी बनण्यासाठी पळून जाऊन रामकृष्ण मिशनमध्ये दाखल झालेलो होतो. एका दुर्बल पुरुषाला आपलं काम नीट करता यावं म्हणून किती तरी स्त्रिया त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या!

एकदा शारदा माँ माझ्या स्वप्नात येऊन म्हणाल्या, ‘कुठलंही चांगलं काम करायला घराची गरज असते. मुलांनी नीट वाढावं यासाठी कुटुंबांना घर लागतंच. तुझं घर कुठं आहे?’ मग मात्र ‘बॉम्बे दोस्त’करता एक चांगली जागा लागेल, याचा मला साक्षात्कार झाला. पण ‘बॉम्बे दोस्त’ नेमकं काय काम करणार होतं? ‘एका घाबरलेल्या आणि आरोग्यविषयक धोका असणाऱ्या समुदायाला मदत करणं,’ हेच तर त्याचं काम होतं. ते करण्यासाठी आम्ही अधिक चांगल्याप्रकारे संघटित होणं जरुरीचं होतं.

याबद्दलची चौकशी केल्यानंतर एखादी एनजीओ किंवा स्वयंसेवी संस्था स्थापन करणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे, हे माझ्या लक्षात आलं. ‘अखेर आम्ही एका समुदायाकरिता संघटित पद्धतीनं काम करण्यासाठी हा ट्रस्ट स्थापन करतो आहोत’, असे जाहीर करत माझ्या दोन विश्वासू मित्रांना सहसंस्थापक म्हणून घेऊन मी एप्रिल १९९४मध्ये ‘हमसफर ट्रस्ट’ची स्थापना केली. ते दोघे होते सुहेल अब्बासी आणि श्रीधर रंगायन. एका अदृश्य समाजघटकासोबत जर समाजकार्य करायचं असेल, तर सगळ्यांना कामाचं नीट आकलन होईल अशी स्वयंसेवी संस्था उभारणं आणि सगळ्यांना दिसू शकेल अशा जागी ती असणं याची आवश्यकता आहे, हे आम्हाला उमगलेलं होतं.

भारतात समलिंगी व्यक्तींना संस्थात्मक पातळीवर आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. एकत्र आल्यानं आम्हालादेखील आधुनिक भारत निर्माण करण्यामध्ये सहभागी होता आलं असतं. एक नियतकालिक आणि समाजकार्यासाठी असणारी जागा यांमधून आम्हाला समलिंगी व्यक्तींना अधिक मुक्तपणे आणि कोणत्याही प्रकारचा अपराध गंड न बाळगता वावरता यावं, यासाठी साहाय्य करता आलं असतं. समाजाला घाबरावं अशी कोणतीच गैर गोष्ट आम्ही करत नव्हतो. आम्ही कायद्याचं पालन करणारे, सुशिक्षित आणि समाजासाठी चांगलं काही तरी करावं असं वाटणारे पुरुष होतो. पण आम्ही स्त्रियांशी लग्न करायला नकार दिल्यामुळं आणि आमची लैंगिकता उघड न केल्यामुळं आमच्याविरुद्ध याच समाजानं खोटेनाटे समज पसरवलेले होते. आम्ही भारत मातेचे सुपुत्र आहोत. तुमच्यापैकी कुणाचे ना कुणाचे पुत्र, भाऊ, काका, मित्र, वर्गमित्र, कामावरील सहकारी, शिक्षक आणि विद्यार्थीसुद्धा आहोत. १९४७मध्ये, देश स्वतंत्र झाला तेव्हा प्रत्येकाला समान स्वातंत्र्य मिळेल, हे वचन दिलं गेलं होतं. आम्ही आजही आमचा लढा सुरूच ठेवून त्या समतेची, स्वातंत्र्याची मागणी करतो आहोत. आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे, समता हवी आहे! अगदी आत्ताच!

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

अनुवाद – सुश्रुत कुलकर्णी