अशोक रावकवी

काही समिलगी पुरुषांनीही पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरेपूर गैरवापर करून, हुंडा घेऊन स्त्रियांशी लग्न केलेली आहेत. या समिलगी पुरुषांना लग्नानंतरही आपण समिलगीच राहू, हे पूर्णपणे ठाऊक असतं. मात्र, त्यांनी अशी लग्नं करून आपल्या जोडीदारांवर मोठाच अन्याय केलेला आहे. मात्र आता तर त्याच्याही पलीकडे जाऊन ‘कलम ३७७’ चा गैरवापर करत अधिकच अन्याय केला जातोय का?..

The Vietnam War Guided Missiles chip cold wars
संविधानभान: सकारात्मक भेदभाव म्हणजे काय?
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

भारतीय दंडसंहितेच्या ‘कलम ३७७’ नावाच्या एका शतकभर जुनाट, लोकांचं शोषण करणाऱ्या कायद्यातून ‘एलजीबीटी’ समुदायाची मुक्तता होऊन अजून जेमतेम तीन महिनेही झाले नाहीत, तोच दुर्दैवानं या समुदायातल्याच लोकांनी नव्या स्वातंत्र्याचा गैरवापर करायला सुरुवात केलेली आहे. माझा तरुण मित्र आनंद चंद्राणी, नागपूरमध्ये ‘सारथी ट्रस्ट’ ही स्वयंसेवी संस्था ‘एलजीबीटी’ समूहाकरता चालवतो. त्यानं मला जे सांगितलं, ते तुम्हा सगळ्यांना सांगावं, असं मला वाटतं. पुरुष त्याच्या हाती असलेल्या सत्तेचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर करतो आहेच, समिलगी पुरुषही त्याला अपवाद नाहीतच.

आनंदला आता विदर्भ भागातील समिलगी पुरुषांकडून मोठय़ा प्रमाणावर पत्र येत असतात. आपल्यावरची कायद्याची बंधनं तुटताच समिलगी पुरुष इतक्या झटकन संधिसाधू बनतील, याची मी जराही कल्पना केलेली नव्हती. आनंदशी संपर्क साधणाऱ्या बऱ्याचशा पुरुषांना आता आपल्या घरी स्वत:च्या पुरुष मित्रांना आणून ठेवायचं आहे. तेदेखील त्या घरात आधीच त्यांची पत्नी आणि मुलं राहात असताना. अगदी जाणीवपूर्वक! याचाच अर्थ आपल्या पत्नीचा अपमान होवो, तिचं घरातलं स्थान अगदी पायपुसण्याचं झालं तरी चालेल, त्यांना त्याची तमा नाही. काही झालं तरी त्यांना आपल्या पुरुष मित्रांना अगदी कायदेशीररीत्या घरात आणून ठेवायचंच आहे. अशा धक्कादायक मागणीबद्दल त्यांना नेमकं काय सांगावं, ते सरळमार्गी आनंदला समजत नव्हतं. अखेर ‘त्यांना काय उत्तर द्यावं’ याबाबत त्यानं मला विचारणा केली. त्याच वेळी मुंबई-पुण्यासारख्या शहरांतही यांसारखेच अनेक प्रसंग मोठय़ा प्रमाणावर घडत असल्यानं मीदेखील अत्यंत अस्वस्थ झालेलो होतो. एकीकडं स्त्रीमुक्ती चळवळ स्त्रियांना समाजात समान, मानाचं स्थान मिळावं म्हणून अविरत काम करते आहे, तर दुसरीकडे काही समिलगी पुरुषांनी पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरेपूर गैरवापर करून, हुंडा घेऊन स्त्रियांशी लग्नदेखील केलेली आहेत. या समिलगी पुरुषांना लग्नानंतरही आपण समिलगीच राहू, हे पूर्णपणे ठाऊक असतं. मात्र, त्यांनी अशी लग्नं करून आपल्या जोडीदारांवर मोठाच अन्याय केलेला आहे.

वाचकहो, या मुद्दय़ावर आमच्या समुदायानं काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं? आमच्या समुदायातल्या अशा पुरुषांची आम्ही बाजू घेत नाही, असा आमच्या ‘हमसफर ट्रस्ट’वर कधीकधी आरोप केला जातो. तो योग्य आहे का? मी तुम्हाला याचं एक उदाहरणच देतो. आम्ही संधिसाधू समिलगी पुरुषांच्या बाजूनं उभं न राहण्यात आमची काय नैतिक भूमिका नेमकी काय, आहे हे तुम्हाला त्यातून कळेल. शिवाय पुरुषांना फायद्याची ठरतील अशा प्रकारे पारंपरिक मध्यमवर्गीय मूल्यं कशी वापरून घेतली जातात, हे दुर्दैवी सत्यही यातून उघड होईल.

सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ६ सप्टेंबरच्या ऐतिहासिक निकालानंतर मला भेटायला एक श्रीमंत समिलगी पुरुष आला होता. त्याचं एका उच्चवर्णीय कुटुंबातल्या पुरुषावर प्रेम होतं, म्हणजे दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. हे पुरुष-पुरुष प्रेम प्रकरण गेली सहा वर्ष चालू आहे. मात्र त्याच्या कुटुंबानं सातारा जिल्ह्य़ातल्या एका प्रतिष्ठित घराण्यातल्या मुलीशी त्याचं लग्न ठरवलं. आपण पूर्णत: समिलगी आहोत (म्हणजे स्त्रीबद्दल आपल्याला अजिबात शारीरिक आकर्षण वाटत नाही) हे सत्य त्यानं आपल्या आई-वडिलांना स्पष्टपणे सांगितलं असूनही त्याच्यावर हे लग्न करण्याची बळजबरी करण्यात आली. त्यानं याला जर मान्यता दिली नाही, तर आपण ‘कलम ३७७’ खाली तुझ्यावर कारवाई करू अशी घरच्यांनी त्याला त्यावेळी धमकी दिलेली होती. या कायद्यातले बारकावे ठाऊक नसल्यानं घाबरून जाऊन त्यानं अखेर लग्नाला होकार दिला होता. त्याच्या कॉलेजमध्ये आणि शहरात त्याला एक उत्तम क्रिकेटपटू आणि ‘बॉडीबिल्डर’ म्हणून ओळखलं जात असे. आता तो चांगलाच संकटात सापडलेला आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार लग्न केल्यावर पहिले तीन महिने त्याचे पत्नीशी संबंध राहिले आणि तिला दिवस गेले. त्यानंतर मात्र त्यानं तिच्यासोबतचे संबंध पूर्णपणे थांबवले आणि आपल्या पुरुष मित्रासोबतचं प्रकरण पुढं सुरूच ठेवलं. आता ‘कलम ३७७’ च्या निकालानंतर हा पुरुष मित्र या नात्याला कायदेशीर रूप देण्याचा आग्रह धरतो आहे. यावर काय उपाय आहे हे विचारण्यासाठी माझ्याकडे हे दोघेजण एकत्र आलेले होते. यावर मीच त्याला ‘‘तुझी काय करण्याची इच्छा आहे’’ असं विचारलं. त्यावर ‘‘आपल्याला पत्नीला घटस्फोट द्यायचा आहे आणि पुरुष मित्रासोबत ‘विवाहित जोडपं’ म्हणून राहायचं आहे’’ असं त्यानं ठामपणे सांगितलं.

मात्र, त्याचं म्हणणं मुळातच नैतिकदृष्टय़ा चुकीचं आहे, अशी माझी भूमिका आहे. जरी तो समिलगी असला आणि स्त्रीवर प्रेम करण्यासाठी मुळातच सक्षम नसला, तरी त्यानं ते आपल्या पत्नीला लग्नाअगोदरच सांगणं जरुरीचं होतं. समजा तिनं या ‘वास्तवाला’ मान्यता दिली असती आणि तरीदेखील त्याच्याशी लग्न केलं असतं, तर बाब वेगळी असती. त्यानंतर तिला आपलं आयुष्य हवं तसं जगण्याचा अधिकार मिळाला असता. हवंतर तिनं त्याला घटस्फोट देऊन नंतर हव्या त्या पुरुषाशी लग्नही केलं असतं. पण आता जी परिस्थिती आहे, तिच्यानुसार समाजाकडून तिच्यावर नवऱ्याला समजावून न घेतल्याबद्दल ठपका ठेवला जाईल आणि ‘त्यामुळंच लग्न मोडल्याचा’ आरोप तिच्यावरच केला जाईल. लग्नामध्ये कुठल्या अडचणी आल्या की नेहमीच त्याचं खापर स्त्रीवरच फोडलं जातं.

माझ्याकडे आलेल्या या दोन्ही पुरुषांना माझं हे उत्तर अजिबातच आवडलं नाही. मी त्यांच्या पत्नीची बाजू घेतो आहे हे त्यांना मुळीच अपेक्षित नव्हतं. मी यात योग्य ‘नैतिक भूमिका’ मांडतो आहे, हे मी पुन:पुन्हा त्यांना सांगत होतो. अखेर निर्णय त्यांनाच घ्यायचा होता. शेवटी या दोघाजणांनी त्या अन्यायग्रस्त स्त्रीला वाऱ्यावर सोडून देऊन एकत्र राहायचा निर्णय घेतला.

वाचकहो, ‘हमसफर’ची जरी ही नैतिक भूमिका असली, तरी समाजानं हे सारं कसं हाताळावं असं तुम्हाला वाटतं? दिवसेंदिवस समाजात अशा प्रकारचे प्रश्न जास्त प्रमाणात दिसू लागतील. आता लग्नामध्ये त्रास असेल, तर स्त्रियांनी ते निमूटपणे सोसण्याचं प्रमाण कमी कमी होत आहे. तुम्ही मुंबईतल्या कुटुंब न्यायालयाला भेट दिलीत, तर स्त्रियांनी घटस्फोटाची मागणी करण्यामागं त्यांच्या ‘पतीची समलैंगिकता’ हे कारण मोठय़ा प्रमाणात दिसतं. बहुसंख्य बाबतीत पुरुषांनी आपल्या लैंगिकतेबद्दल त्यांना लग्नाआधी नीटसं सांगितलेलं नसल्यामुळं बहुतेक वेळा अशा खटल्यांमध्ये दोष पुरुषांचाच असतो. वर म्हटल्याप्रमाणं नागपूरमध्ये असणाऱ्या माझ्या आनंद या मित्राला आणि त्याच्या संस्थेला आमच्याच समलैंगिक समुदायाकडून याच्या झळा मोठय़ा प्रमाणावर बसत आहेत. तो धीरानं या साऱ्याला सामोरा जातो आहे. मुंबईमध्ये ज्याचं मी समुपदेशन केलं, तो माणूस मात्र सगळीकडं आता ‘समिलगी पुरुषांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘हमसफर’ अजिबात मदत करत नाही.’ अशी आमची विनाकारण बदनामी करत हिंडतो आहे.

अर्थातच स्त्री आणि पुरुष या दोहोंबद्दलही आकर्षण वाटणारे ‘बायसेक्शुअल’ स्त्री-पुरुष अल्पप्रमाणात का होईना, समाजात अस्तित्वात असतातच. मात्र लग्न ठरण्यापूर्वीच आपलं लैंगिक प्राधान्य काय आहे, हे भावी जोडीदाराला स्पष्टपणे सांगणं जरुरीचं असतं. लग्न झाल्यानंतर पती/पत्नीला हे समजलं तर होणारे परिणाम व गुंतागुंती अत्यंत गंभीर असतात. आपल्या समिलगी पतीचं प्रेम मिळावं म्हणून कुठलीच स्त्री दुसऱ्या पुरुषाशी स्पर्धा कशी काय करू शकेल? आज वेगानं आधुनिकीकरण होणाऱ्या आपल्या समाजामध्ये प्रामाणिकपणा आणि नैतिकता या लग्न संस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या, आधारस्तंभ असणाऱ्या गोष्टी आहेत. आईवडील आणि मुलं या साऱ्यांनीच कुटुंबाचा आणि त्यातल्या आनंदाचं भाग असणं जरुरीचं आहे. एखादी लपवून ठेवलेली गोष्ट जर नंतर एखाद्या चुकीनं किंवा अपघातानं उघडकीला आली, तर त्यामुळं होणारे परिणाम अत्यंत गंभीर असतात. आजच्या स्तंभाचा समारोप सध्या आम्ही हाताळत असलेल्या एका अत्यंत दु:खद केसबाबत सांगून करतो.

नुकत्याच एका स्त्रियांसाठीच्या प्रसिद्ध मासिकाला एका तरुणीचं पत्र आलं. काही वर्षांपूर्वी आपलं लग्न झालं असून पती लग्न झाल्यापासूनच आपल्यापासून दूर राहात असल्याचं, प्रेमसंबंध ठेवत नसल्याचं तिनं त्यात लिहिलं होतं. ती तरुणी आणि तिचा पती दोघंही एका श्रीमंत, उद्योगपतीच्या कुटुंबातले होते. आपल्या पतीची कुणी गर्लफ्रेंड आहे की काय, याचा तिनं शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याला कुठल्याच मत्रिणी नाहीत हे तिला लक्षात आलं. ते शोधताना त्याच्याकडं दुसरा एक मोबाइल फोन आहे आणि तो त्या फोनवर तासन्तास कुणाशीतरी बोलत असतो, हे तिच्या लक्षात आलं. तिला तो फोन अनलॉक करता आला नाही. तिच्या पतीनं तो फोन तिच्या हातीही कधी पडू दिला नाही.

अखेर या तरुणीनं आमच्याकडं धाव घेतली. तिच्या पतीचं नाव ऐकताच मला धक्काच बसला. कारण दोनच वर्षांपूर्वी आम्ही त्याचं समलैंगिकतेबाबत समुपदेशन केलेलं होतं आणि त्यानं लग्न करू नये, असा त्याला सल्लाही दिलेला होता. आपण पूर्णत: समिलगी असून कुठल्याही स्त्रीसोबत संबंध ठेवण्यास सक्षम नाही, अशी त्यानं आमच्याकडं कबुलीही दिलेली होती. तो तरुण आणि त्याची पत्नी हे दोघंही श्रीमंत उद्योगपतींच्या घराण्यातले असल्यानं या लग्नाच्या आग्रहाला त्याला ‘नकार’ देता आला नाही. अंतिमत: साऱ्याची परिणती विनाशातच झाली. अखेर पतीनं आपल्या पत्नीला सत्य सांगितल्यावर ती भयंकर संतापली. तीसुद्धा माहेरून अतिशय श्रीमंत असल्यानं तिनं आपल्या आईवडिलांना पतीच्या कुटुंबाला झालेल्या ‘फसवणुकीबद्दल’ न्यायालयात खेचायला सांगितलेलं आहे. आता हा घटस्फोट अत्यंत विनाशकारी होणार आहे.

भविष्यात अशा प्रकारच्या घटनांचं प्रमाण दिसणारच आहे. यावर उपाय तरी काय? प्रामाणिकपणे आणि नैतिकतेनं वागणं हाच! मुंबादेवीनंही मला हीच शिकवण दिलेली आहे. ‘‘लक्षात ठेव’’ तिनं मला सांगितलं होतं. ‘‘मी शक्ती आहे, पण त्याबरोबरच मी स्त्रीदेखील आहे. मी माझ्या मुलींना कधीच निराश करणार नाही.’’ मुंबादेवीचं म्हणणं नैतिकदृष्टय़ा बरोबरच आहे, इतकंच नव्हे तर या युद्धात ती आपल्या मुलींच्या बाजूनं आहे हेदेखील मला अगदी पक्कं ठाऊक आहे. मी मुंबादेवीच्या बाजूनंच आहे. वाचकहो, तुम्हीसुद्धा आहात का?

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी