मुंबईमधील लैंगिक अल्पसंख्याक ‘क्वीयर आज़ादी मुंबई’ या छत्रछायेखाली ऑगस्ट क्रांती मैदानावर दरवर्षी ‘स्वाभिमान यात्रेचे’ आयोजन करतात.  प्रजासत्ताक दिनानंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी ही यात्रा भरत असते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीयांना एक संविधान मिळाले जे त्यांचे भय, कायद्याची समानता आणि समान नागरिक म्हणून अधिकार निश्चित करते. परंतु दुर्दैवाने समलैंगिक स्त्रिया, समलैंगिक पुरुष, उभय लैंगिक पुरुष आणि तृतीयपंथी यांना त्यांच्या लैंगिक भिन्नतेमुळे समाजाच्या या हक्कातून बहिष्कृत केले गेले. हे सदर अशा सर्व समुदायांसाठी आहे, जे या हक्कांपासून दूर राहिले आणि आता आपले अधिकार आणि अस्तित्व अशा स्वाभिमान यात्रा काढून मागत आहेत. आम्हाला आत्तापर्यंत विकृत किंवा अनैसर्गिक म्हणूनच संबोधले गेले आहे. पण आमचा प्रयत्न राहील तो लैंगिक अल्पसंख्याक समुदायाला प्रकाशझोतात आणण्याचा.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

हे सदर आमच्याविषयी आहे. आम्ही कोण आहोत? कोणी वेगळे आहोत का? आम्हीसुद्धा आपले मुलगे, भाऊ, मुली, बहीण, काका,मावशी, आजी अगदी रक्ताचे नातेवाईक आहोत. जशी आपल्या कुटुंबातील कुणी तरी डावखुरी व्यक्ती असते, पण कोणाला तिचे नवल वाटत नाही. तशीच ही लैंगिकतासुद्धा आहे. आम्ही चुकीच्या शरीरात जन्माला आलो आणि आता ते लक्षात आल्यावर आमचे खरे जीवन जगू इच्छितो, इतके सोपे आहे हे. लेस्बियन या दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात. समलैंगिक किंवा गे पुरुष हे दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होतात. उभयलिंगी पुरुष किंवा स्त्रिया या दुसऱ्या पुरुष किंवा स्त्रीकडे आकर्षित होतात. तृतीयपंथीयांना वाटत असते की त्यांनी चुकीच्या शरीरात जन्म घेतला आहे. आधुनिक वैद्यकीय चाचण्यांनुसार ही एक पूर्णपणे नैसर्गिक भावना आहे. ज्याला ‘लिंग नक्कल’ म्हटले जाते.

या सदराच्या माध्यमातून होणारा आपल्यातील हा भाषिक व्यवहार तर्कसंगत आणि वैज्ञानिक असणे आवश्यक आहे. असे सांगण्यात येते की ‘लोक जर समलिंगी बनत गेले तर जगाच्या लोकसंख्येचे काय होईल?’ हा प्रश्न आमच्या कार्यक्षेत्रातही येत नाही; कारण समलैंगिकता लैंगिकदृष्टय़ा नेहमीच अल्पसंख्याक राहते आणि राहील. जसे आपल्या लोकसंख्येत डावखुऱ्यांचे प्रमाण हे अल्पसंख्याकच आहे. विज्ञानाच्या व्याख्येप्रमाणेच जे निसर्गात आहे ते ‘नैसर्गिक’ आहे. जसे पांढरे मोर सामान्य नसतात. पण तरीही ते त्यांचे अस्तित्व दर्शवतात. त्याचं अस्तित्व तुम्ही अमान्य करू शकत नाहीत. म्हणून लैंगिक प्रवृत्ती आणि लिंगभिन्नता समजावून सांगण्यासाठी इतर कारणांचाही विचार व्हायला हवा.

या सदराच्या निमित्ताने धार्मिकविरोधी प्रश्नांना आम्हाला उत्तरं द्यायची नाहीत. आमचा अधिकार कोणत्याही धर्म किंवा देवाने दिला नाही, तो आमच्या घटनेने दिलेला आहे, थेट जगण्याचा आहे, जगामधील सर्वश्रेष्ठ दस्तऐवजांपैकी तो एक आहे. आणि आशा करतो आपणही तो मान्य कराल. कृपया लक्षात घ्या की नवीन मानवाधिकारांच्या संरचनेत, १९७२ मध्ये तज्ज्ञांच्या एका गटाने लिहिलेल्या ‘जोगजाकर्ता तत्त्वे’ या नावाने आमचे हक्क स्पष्टपणे सांगितलेले आहेत..

युनायटेड नेशन्सने २०१६ मध्ये घेतलेल्या आणि मान्य केलेल्या मताने लैंगिक पूर्वाभिमुख आणि लिंग नक्कल (एसओजीआय- सामाजिक लैंगिकता) मानवाधिकाराला पुष्टी करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ दोन मोठय़ा संस्थांनी त्यांचा विरोध केला. एक व्हॅटिकन रोमन कॅथलिक चर्चचे मुख्यालय आणि दुसरे म्हणजे इस्लामिक देशांचे संघटनेचे (ओआयसी) ८०-मजबूत गट. मग, भारतामध्ये तो का संमत व्हावा, याचं कारण मी म्हटल्याप्रमाणे इथली संस्कृती. आपली संस्कृती धर्मातील किंवा आपल्या पारंपरिक जीवनशैलीतील अशा लोकांचा तिरस्कार किंवा निंदा करत नाही म्हणून आम्ही आपल्या लोकसंख्येचा एक महत्त्वाचा भाग आहोत. शिवाय आपल्या संस्कृतीसाठी हे नवे नाही आणि आपल्या पुराणांमध्ये अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. आपल्या वेदांमधील शब्द आणि पुराणांमध्ये षंढ, नपुंसक, क्लिबा, पंडका यांची चर्चा आहे. हे असे पुरुष किंवा स्त्रिया आहेत, ज्यांचे वर्णन थेट पुरुष किंवा स्त्री म्हणून केले जात नाही.

आपल्या सर्वसामान्य लोकसंख्येत आम्हा लोकांचे अस्तित्व नक्कीच आहे. आज मी मला  हवे तसे आयुष्य जगू शकतो. आज आपल्या समाजातही अनेक एलजीबीटीचे लोक आहेत. त्यांचा स्वीकार, त्यांना समजून घेणे सगळ्यांनाच अधिक उदात्त भारताकडे नेईल. हा लेख लिहीत असताना मी कधी कधी कठोर होऊ  शकतो, पण मी येथे जे काही लिहिणार आहे, तुमच्याशी चर्चा करू पाहणार आहे ते प्रामाणिकपणे आणि सचोटीने केले जाईल.  १९७०च्या सुमारास आम्हाला विकृत आणि गुन्हेगार ठरवले गेले. आम्हाला घराबाहेर काढण्यात आले आणि अनेकांना तर मारलेदेखील. मी १९५० च्या दशकात कसाबसा मुंबईमध्ये समलिंगी म्हणून वाढलो आणि १९६०च्या दशकात भारतातच अशा व्यक्तीच्या भावनांना शब्दरूप मिळालं. पेंग्विनने ‘याराणा’ नावाने ते पुस्तकरूपात प्रकाशित केले. या साऱ्यांना समाजात स्थान मिळतेच असे नाही मग ते एकमेकांच्या सोबतीनेच वाढतात. जसे तृतीयपंथीयांनाही त्यांच्या समुदायामध्ये एक आधार असतो, जो त्यांना त्यांच्या ‘घराना’ आणि ‘सिलसिलास’मध्ये मिळतो.

तेव्हा वाचक हो, कृपया आपले डोळे आणि कान बंद करू नका. आम्ही आपल्यासारखेच आहोत. आपल्याला मी विनंती करतो की आपण समजून घेतल्याने आपल्याला अधिक प्रेमळ कुटुंब लाभेल. प्रत्येक पायरीवर आपण आम्हाला समजून घेतले तर, आम्ही तुम्हाला मिठी मारण्यासाठी अनेक पावले उचलू.  जे आम्हाला पाहू, भेटू इच्छितात, तुमचे ३ फेब्रुवारी २०१८ रोजी ऑगस्ट क्रांती मैदानात होणाऱ्या स्वाभिमान यात्रेत स्वागत आहे.

माझ्या दृष्टिकोनातून लैंगिकतेबद्दलच्या इतिहासाची चर्चा दुसऱ्या लेखात केली जाईल. मी तुम्हाला युरोपमध्ये घेऊन जाईन, जेथे ‘होमोसेक्शुअल’ शब्द शोधला गेला आणि १९व्या  शतकाच्या मध्यभागी ही लैंगिक ओळख एकाएकी इतकी महत्त्वाची का झाली तेही सांगेन. मी समकालीन भारतीय एलजीबीटी साहित्य आणि इतिहासाचाही उल्लेख करीन, जेणेकरून आपण आधुनिक भारतातील आपल्या आयुष्याबद्दल जाणून घेऊ शकाल. कृपया मला लिहायला विसरू नका आणि माझा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगत राहा..

अशोक रावकवी

rowkavi@gmail.com

chaturang@expressindia.com