Lokankika 2019

नियम आणि अटी

 • प्रवेश अर्ज लोकसत्ताच्या संकेतस्थळावरून https://www.loksatta.com/lokankika2019/entryform/ डाऊनलोड करता येईल.
 • स्पर्धा एकूण तीन फेऱ्यात होईल. प्राथमिक फेरी सर्व आठ केंद्रांवर १ डिसेंबर ते ११ डिसेंबर, २०१९ या काळात पार पडेल. विभागीय अंतिम फेरीमध्ये ४ ते ६ एकांकिका सादर होतील. सर्व आठ केंद्रांवर २ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान अंतिम फेरी पार पडेल. महाअंतिम फेरी मुंबईत पार पडेल. महाअंतिम फेरीमध्ये आठ केंद्रांवरील प्रथम क्रमांकाच्या एकांकिका सादर होतील.
 • प्रत्येक विभागात कमीत कमी १० प्रवेशिका आल्या तरच स्पर्धा घेतली जाईल. अन्यथा त्या केंद्रावरील स्पर्धा रद्द करण्याचा अंतिम निर्णय आयोजकांकडे राहील.
  एका विभागामध्ये जास्तीत जास्त ६० प्रवेशिका स्वीकारल्या जातील.
 • प्रवेश अर्जासोबत एकांकिकेच्या दोन प्रती, एकांकिका ०१ जानेवारी २०१९ किंवा त्यापुढील असल्याचे रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाचे पावती किंवा प्रमाणपत्र आणि लेखकाचे हमीपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • स्पर्धेच्या अर्जावर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का अनिवार्य आहे. त्याशिवाय अर्जाचा विचार केला जाणार नाही. स्पर्धेत रंगमंचावर काम करणारे विद्यार्थी हे आजी विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
 • महाविद्यालयाव्यतिरिक्त विद्यापीठ विभागातर्फे स्वतंत्र प्रवेशिका स्वीकारली जाईल.
 • प्रवेशपत्रिका अपूर्ण असल्यास किंवा अंतिम तारखेनंतर आल्यास तिचा विचार केला जाणार नाही.
 • प्रवेश फी कोणत्याही कारणास्तव परत दिली जाणार नाही.
 • स्पर्धा समितीने ठरवलेल्या दिवशी, वेळ आणि क्रमानुसार, स्पर्धक संस्थेला आपला नाटय़ प्रयोग विनातक्रार सादर करावा लागेल.
 • स्पर्धक संस्थेने नियोजित सादरीकरणाच्या पूर्वी स्पर्धेच्या ठिकाणी किमान एक तास आधी उपस्थित राहणे बंधनकारक राहील.
 • एकांकिका स्पर्धेचे परीक्षक नेमण्याचा अधिकार आयोजक संस्थेस असेल. परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम असेल व तो स्पर्धक संस्थांस बंधनकारक राहील.
 • कोणताही स्पर्धक (दिग्दर्शक/अभिनेता/अभिनेत्री/तंत्रज्ञ) कलावंतास एकाच एकांकिकेसाठी स्पर्धेत सहभागी होण्याची अनुमती राहील. मात्र, एकच लेखक स्पर्धेसाठी एकापेक्षा अधिक महाविद्यालयांसाठी एकांकिका लिहू शकतो.
 • समांतर अथवा व्यावसायिक रंगभूमीवरील दिग्दर्शकही एकांकिकेचे दिग्दर्शन करण्यास पात्र आहेत.
 • एकांकिकेतील पात्रांची नावे एकदा दाखल केल्यानंतर स्पर्धा समितीच्या संमतीशिवाय त्यात बदल करता येणार नाही.
 • एकांकिकेत सहभागी होणा-या सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र स्पर्धेच्या दिवसात सोबत ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धा समितीने मागणी केल्यास विद्यार्थ्यांना ते विनाअट सादर करावे लागेल.
 • लॉट्स/ड्रॉ पध्दतीने एकांकिका सादरीकरणाचे क्रम ठरविण्यात येतील. मात्र २०० किमी पेक्षा जास्त अंतरावरून येणार्या महाविद्यालयांना सादर करणासाठी क्रम राखून ठेवण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील. ज्या संघाचे प्रतिनिधी हजर नसतील त्या संघाच्या सादरीकरणाचा क्रम बदलण्याचा अधिकार स्पर्धा समितीला असेल. स्पर्धक महाविद्यालयाला आपला नाटय़प्रयोग समिती ठरवेल त्या दिवशी विनातक्रार सादर करावा लागेल.
 • परीक्षक मंडळाने दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय समजला जाईल. स्पर्धेचा निर्णय स्पर्धेच्या अंतिम दिवशी जाहीर केला जाईल.
 • स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकेचा ०१ जानेवारी २०१९ पूर्वी प्रयोग झाल्याची तक्रार आल्यास आणि तपासाअंती तसे सिद्ध झाल्यास परीक्षकांच्या निर्णयानुसार कारवाई केली जाईल. तसेच सदर एकांकिकेचा निकाल राखून ठेवणे किंवा पारितोषिक परत घेण्याचा निर्णय आयोजक समितीचा राहील.
 • प्रत्येक महाविद्यालयाला एकांकिका सादरीकरणासाठी एक तासाचा कालावधी दिला जाईल. या कालावधीत स्पर्धक संघाने नेपथ्य, प्रकाशयोजना आदी तांत्रिक बाबी पूर्ण करून प्रयोग सादर करावा आणि नेपथ्य हलवून पुनःश्च रंगमंच मोकळा करावा. मात्र, प्रत्यक्ष नाटय़प्रयोग ३० मिनिटांपेक्षा कमी आणि ४० मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचा असू नये याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
 • स्पर्धेत सादर होणार्या प्रयोगात नग्नता, बीभत्सता, स्पष्ट लैंगिक गतिविधी यांचा समावेश नसावा तसेच धार्मिक भावना, जाती जमातीवर टीका टिपण्णीचा समावेश नसावा किंवा गोपनीयतेचे उल्लंघन नसावे किंवा अवैध, अनैतिक तसेच सार्वजनिक हिताच्या विरूध्द कोणतेही घटक समाविष्ट नसावेत.
 • स्पर्धकांना एकांकिका सादरीकरणादरम्यान श्राव्य किंवा द्रुक-श्राव्य चित्रण करण्याची अनुमती असणार नाही. जर कोणी स्पर्धक असे करताना आढळल्यास त्यांना अपात्र करण्यात येईल.
 • महाअंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कोणत्याही संस्थेला मुंबईत येण्यासाठी प्रवासखर्च देण्यात येणार नाही.
 • खास प्रकारचे नेपथ्य अगर प्रकाशयोजना असल्यास ती जबाबदारी स्पर्धक महाविद्यालयाची असेल.
 • सर्वसाधारण रंगभूषेसाठी (महाअंतिम फेरी) आयोजन संस्थेतर्फे व्यवस्था करण्यात येईल. विशेष रंगभूषेची आवश्यकता असल्यास त्याचा खर्च स्पर्धक संस्थेस करावा लागेल.
 • मुंबईत पार पडणार्या महाअंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिकांना प्राथमिक स्वरूपाचा मेक-अप, नेपथ्य आणि प्रकाशयोजना आयोजकांतर्फे पुरविण्यात येईल. त्याव्यतिरिक्त आवश्यक गोष्टींची व्यवस्था सहभागी महाविद्यालयांना स्वखर्चाने करावी लागेल.
 • प्राथमिक फेरीतील कलाकारांनीच उपांत्य आणि अंतिम फेरीमध्ये भाग घेणे बंधनकारक आहे. कलाकार बदलता येणार नाही.
 • स्पर्धेच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी बेशिस्त/असभ्य वर्तन करून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केल्यास कडक उपाययोजना केली जाईल. अशा संघांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
 • स्पर्धेच्या ठिकाणी विषारी, तंबाखूजन्य, मद्य किंवा अवैध पदार्थ आणू नयेत.
 • स्पर्धेच्या कार्यक्रमात व नियमात फेरफार करण्याचा अधिकार स्पर्धा समितीकडे राहील.
 • तसेच सदर एकांकिका ‘ लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेमध्ये यापूर्वी सादर न झालेली असावी.
 • स्पर्धेत सादर होणार्या एकांकिका मराठी भाषेतीलच असाव्यात इतर भाषेतिल एकांकिका सादरीक रणाची संधी दिली जाणार नाही.

प्रत्येक केंद्राअंतर्गत येणारे विभाग
पात्र क्षेत्र/जिल्हे

 • औरंगाबादः औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, अहमदनगर, श्रीरामपूर, संगमनेर, कर्जत, शेवगाव, कोपरगाव, पारनेर, पाथर्डी, अकोले
 • नागपूरः नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, वाशीम, बुलढाणा आणि भंडारा
 • रत्नागिरीः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव
 • मुंबईः मुंबई (मुलुंड पर्यंत, दहिसर आणि मानखुर्द)
 • ठाणेः संपूर्ण ठाणे जिल्हा, पनवेल, वाशी, विरार, अलिबाग/रायगड
 • नाशिकः नाशिक, ईगतपूरी, सिन्नर, मालेगाव, सतना, कळवन, धुळे, नंदूरबार आणि जळगाव
 • पुणेः पुणे, सातारा आणि सोलापूर
 • कोल्हापूरः सांगली आणि कोल्हापूर