आधुनिक वैद्यकाच्या अनेक वैशिष्टय़ांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे लसीकरण. पृथ्वीतलावरून ‘देवी’चे समूळ उच्चाटन लसीकरणानेच साध्य झाले आणि पोलिओचेही लवकरच उच्चाटन अपेक्षित आहे. लसीकरणाची नेत्रदीपक प्रगती ही २०व्या शतकाची देणगी आहे.
लसीकरण दोन प्रकारचे असते. १) अ‍ॅक्टिव्ह- गोवर ‘फ्लू’ ‘ब’ कावीळ. २) पॅसिव्ह – नागिणीची लस.
आपण सर्वाना बालकांमधील लसीकरणाची माहिती आहे. परंतु प्रौढांनाही लसीकरण आवश्यक आहे, असे म्हटले की चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटते. म्हणूनच हा लेखप्रपंच!
प्रौढ व्यक्ती म्हणजे १९ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्ती, ज्यात ज्येष्ठ नागरिकही येतात. शिक्षणासाठी परदेशी विशेषत: अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या लसीकरणाचा पुरावा द्यावा लागतो, अन्यथा प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

धनुर्वाताची लस
टी. टी. (टिटॅनस टॉक्साइड) या नावाने ही लस सर्वपरिचित आहे. ज्यांचे प्राथमिक लसीकरण झाले आहे अशा १९ वर्षांवरील व्यक्तींनी ही लस दर दहा वर्षांनी घ्यावी, जेणेकरून धनुर्वाताची शक्यता राहणार नाही. धनुर्वाताच्या रोग्यांतील मृत्यूंचे प्रमाण खूप अधिक आहे ते लक्षात ठेवावे.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?

एचपीव्ही लस
ही लस स्त्रियांसाठी आहे. ज्या स्त्रिया कामसुखाचा आनंद घेतात अशांसाठी ही लस अनिवार्य आहे. मात्र आपल्या संस्कृतीत हे अनिवार्य करावे का याबद्दल तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. याचे तीन डोस द्यावे लागतात. ०-२-६ महिन्यात हे दिले जातात. हल्ली cervical cancer vaccine  देण्याकडे तज्ज्ञांचा कल आहे.

गोवर, गालगुंड व रुबेला (एमएमआर) लस
सध्या बहुतेक सर्व व्यक्तींनी १९ वर्षांपूर्वीच ही लस घेऊन टाकलेली असते. परंतु ही लस घेतली नसेल आणि ज्या व्यक्तींना हे आजार झाले नसतील तर या लसीचे दोन डोस घ्यावेत.

कांजण्यांची लस
कांजण्या हा आजार १५ वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व्यक्तींमध्ये गंभीर स्वरूपाचा नसतो. मात्र त्यानंतर हा आजार गंभीर ठरू शकतो. म्हणून १५ वर्षांनंतर जर आधीच हा आजार होऊन गेला नसेल तर लसीचे दोन डोस घ्यावेत.

‘फ्लू’ ची लस  (influenza vaccine)
१९९८ व १९५७ च्या जागतिक साथींमध्ये (world epidemic)  लाखो लोकांचे ‘फ्लू’मुळे मृत्यू झाले. आजही पाश्चिमात्य देशांत वृद्ध व्यक्ती (६५ वर्षांहून अधिक) या आजाराला बळी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. म्हणून ६५ वर्षांवरील व्यक्ती विशेषत: मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, दमा, कर्करोग आदी आजार असणाऱ्या व्यक्तींनी ही लस दरवर्षी घ्यावी. (दरवर्षी व्हायरस बदलतो.)

न्युमोनिया (नवज्वर) लस
ही लसही ६५ वर्षांनंतर आणि विशेषत: मधुमेह, यकृत, मूत्रपिंड यांचे आजार, दमा, हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी दर ५ वर्षांनी घ्यावी. पाश्चात्त्य देशांत न्युमोनियाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे.

हिपॅटायटिस ‘ए’ ( ‘अ’ प्रकारची कावीळ)

ही कावीळ १५ वर्षांपर्यंत त्रासदायक नसते आणि म्हणून १५ वर्षांनंतर ज्यांना कावीळ झाली नसेल, अशांनी या लसीचे दोन डोस ०-६ ते १२ महिन्यांत घ्यावे. कारण १५ वर्षांनंतर ही कावीळ गंभीर ठरू शकते. ही कावीळ पाणी व अन्नावाटे पसरते आणि म्हणून महानगरात वारंवार आढळते.

हिपॅटायटिस ‘बी’ (ब प्रकारची कावीळ)
ही कावीळ रक्तावाटे पसरते. सध्या बालकांमध्येच ही लस दिली जाते. ०-१-६ महिने या क्रमाने परंतु जर ही लस प्रौढ व्यक्तींनी घेतली नसेल आणि त्यांना हा आजार झाला नसेल तर विशेषत: मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग असणाऱ्यांनी ही लस घ्यावी.

मेनिंगोकॉकल लस
ही अमेरिकेला शिक्षणासाठी जाणाऱ्या मंडळींना आवर्जून घ्यावी लागते. मेंदुज्वर होऊ नये म्हणून ही लस दिली जाते.

यलोफीवर
आफ्रिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांना ही लस घेणे अनिवार्य आहे.

विषमज्वर व कॉलर
विषमज्वराची (टायफॉइड) लस २० ते ४० वर्षांपर्यंत दर पाच वर्षांनी घ्यावी. कारण या वर्षांत विषमज्वर होण्याचे प्रमाण अधिक असते. कॉलराबाधित प्रदेशात जावयाचे असल्यास कॉलरा लस घ्यावी.
थोडक्यात आपल्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरांशी सल्लामसलत करून लसीकरणाच्या कवचकुंडलांचा लाभ घ्यावा हे इष्ट!
– डॉ. सुहास पिंगळे