‘आकल्लको ह्युष्णवीयरे

बलकृत् कटुकोमत:।

Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच

प्रतिश्यायंच शोथं च वातं

चैव  विनाशयेत्॥ भा. प्र.

माझ्या लहानपणी मी किंचित ‘तोतरा’ बोलत असे. माझ्या आई-वडिलांच्या हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी खऱ्या अक्कलकाऱ्याची मुळी उगाळून त्याचा गंध माझ्या जीभेला काही दिवस चाटवल्याचे मला स्मरण आहे. खऱ्या अक्कलकाऱ्यास आकारकरभ (स.), अक्कलकरो (गु.), आकल्लक (सं), आकारकारा (हिं.), आकिरकिर्हा (अरबी) अशा विविध नावांनी ओळखले जाते. खऱ्या अक्कलकाऱ्याचे लॅटीन नाव अ‍ॅनासायक्लस पायरेथ्रम तर खोटय़ा अक्कलकाऱ्याची स्पिनॅथस ओलेरे सिया या नावाने ओळख आहे.

खरा अक्कलकारा अल्जेरिया व अफ्रिकेतील छोटय़ा देशातून सर्वत्र निर्यात होतो. खोटय़ा अक्कलकाऱ्याच्या आकाराने लहान, वर्षांयुक्षुपाची सर्वत्र लागवड करतात. खरा अक्कलकारा हे सुकलेले मूळ आहे. मूळ साधे करंगळीएवढे जाड ३ -४ इंच लांब व निमुळते असते. साल जाड, उदी, खरखरीत व सुरकुतलेली असून त्यावर काळे चकचकीत ठिपके असतात. मूळ मोडण्यास कठीण घट्ट व ठिसूळ, अंतर चक्राकार; गाभा नसतो. चावल्यास जिभेस व ओठांस विरविर सुटते व उष्णता वाढते. वास जरा सुगंधी असतो.

खोटय़ा अक्कलकाऱ्याचे दांडे गोल, गुळगुळीत, मांसल व विभक्त असतात. पाने समोरासमोर, देठयुक्त हृदयाकृती; फुलांची बोंडे एकेरी व लांब देठांवर; बोंड गोल; फुलें उदी पिवळी; सर्व भागाची रुचि तिखट; बोंड तोंडात धरल्यास तिखट व विरविरी सुटून लाळ सुटते.

खऱ्या अक्कलकाऱ्यांत राळ, पिवळे उड्डनशील तेल व साखर असते. राळ नरम असून दारूत मिसळते. शास्त्रिकाद्रव्य या मुळांत पुष्कळच असते. खऱ्या प्रमाणे खोटय़ा अक्कलकाऱ्यात ही लाळ उत्त्पन्न करणारी तेलकट राळ व पुष्कळ द्रव्य आहेत. खऱ्या अक्कलकाऱ्याचे मूळ उत्तेजक, वातहर, वेदनास्थापन आणि मज्जतंतूस बल्य देणारे आहे. रास्न्याच्या बदली वापरल्यास चालेल. अक्कलकाऱ्याचे थोडेसे चूर्ण सडक्या दांतात भरल्यास लाळ पडून दु:ख कमी होते. तोंडदुखीत व दांत दुखीत लहानसा तुकडा तोंडात धरतात. जीभ्ोव घसा यांच्या त्रासात, आवाज सुटण्यास व तोंडात ओलावा येऊन त्याची शिथिलता कमी होण्यास तोंडात धरतात.

माझे घरी लाडाने बोलले जाणारे टोपण नाव राजाराम असे आहे. मी वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षांपर्यंत स्वत:चे नाव बोबडय़ा  बोलात ‘वाजावाम’ असे सांगत असे. याची मला या लेखामुळे सुखद आठवण होत आहे. हरी परशुराम औषधालयाच्या कुमारी आसव नं. ३ मध्ये खऱ्या अक्कलकाऱ्याचा समावेश आहे.