*  विडय़ाचे पान उष्ण असल्यामुळे वात व कफ विकारांमध्ये ते उपयोगी आहे. डोके जड होणे, दुखणे, सतत शिंका येऊन सारखे नाक गळणे अशा सर्दीमध्ये पाती चहाच्या काढय़ात धने, आले, मिरे यांबरोबर विडय़ाची दोन पानेही टाकावी.
*  तोंडात दरुगधी येत असेल तर कंकोळ, जायपत्री, कापूर, वेलची व बडीशेप घालून दोन्ही जेवणानंतर विडा खावा.
* विडय़ाची पक्की पाने देठासकट खावीत. याने पोट साफ होते.
*  घशामध्ये कफ साठून आवाज खरखरतो किंवा बसतो. अशा वेळी ज्येष्ठमध पावडर, कंकोळ, मिरी, कात घातलेले विडय़ाची पाने बराच वेळ चावून चघळून खावीत. त्यामुळे घसा, कंठ साफ होतो.
*  सतत सुक्या खोकल्याची ढास लागत असेल तर पानांमध्ये ज्येष्ठमध आणि थोडा कात टाकून चघळावे. ढास थांबते.
*  कोणताही विषारी प्राणी, कीटक चावला किंवा अंगावर चिरडला तर त्याचा विखार शरीरामध्ये पसरू नये म्हणून लगेच त्या ठिकाणी विडय़ाच्या पानाचा रस चोळावा.
*  सूज कमी होण्यासाठी, गळू फुटण्यासाठी विडय़ाची पाने वाटून त्यामध्ये तूप व हळद घालून ते गरम करून त्याचे पोटीस बांधावे.
*  सुपारी, चुना, कात, हिरवी पत्ती घालून केलेला विडा, दोन्ही जेवणानंतर खावा. हा उत्तम बलवर्धक आहे.

 

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

– वैद्य राजीव कानिटकर