थंडीत अनेक विकार त्रास देत असतात. त्यातलाच एक म्हणजे संधिवात. सकाळी उठल्यावर गुडघे धरणे, सर्व अंग आखडणे, हातापायाची बोटे वळवता न येणे, रात्री झोपेत पायात गोळे येणे, सांध्याला सूज येणे अशी अनेक लक्षणे संधिवाताची आहेत.
सर्वसामान्य उपचार : जेवणात तहान लागेल तेव्हा पाणी कोमटच प्यावे. तांब्याभर पाण्यात एक छोटा चमचा सुंठ पावडर टाकून ते पाणी उकळवून ठेवून तेच प्यावे. पायात दिवसभर स्लीपर वापराव्यात. जमेल तेवढय़ा सकाळी लवकर व जमेल तेवढय़ा गरम पाण्याने अंघोळ करावी. सर्व दुखऱ्या सांध्यांना थंडीमध्ये अगोदर शेक करून मग तेलाचे मालिश करावे. हेच मालिश सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा करावे. ‘आमवात’ असणाऱ्यांनी (ऱ्हुमॉटिझम) नुसते सांधे शेकवावेत. तेल लावू नये. औषधे, पथ्ये याबरोबर सांध्यांना नियमित व्यायामही आवश्यक आहे. दुखणारे सांधे शेकवून घ्यावे. रुईच्या पानांना वातशामक तेल लावावे आणि ती पाने सांध्यांवर बांधावी. त्याचा चांगला उपयोग होतो. रात्री झोपताना सुंठीच्या पाण्यातून (कोमट) एक चमचा एरंडेल घ्यावे किंवा दुखऱ्या सांध्यावर सुंठ व एरंडेलचा लेप द्यावा.
– वैद्य राजीव कानिटकर

मोजमाप आरोग्याचे
मधुमेहग्रस्त रुग्ण
६,५१,००,०००
२०१५ मध्ये भारतातील मधुमेहग्रस्तांची संख्या
७,७०,००,०००
रुग्ण मधुमेह होण्याच्या मार्गावर
५,०८,००,०००
२०१० मध्ये मधुमेहग्रस्त रुग्ण
१,१९,००,०००
पाच वर्षांतील मधुमेहग्रस्त रुग्णांमध्ये वाढ
१५,००,०००
मधुमेहामुळे जगभरातील रुग्णांचा मृत्यू
९ टक्के
जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी लोकांना मधुमेह
९,८४,००,०००
चीनमधील मधुमेहग्रस्त रुग्ण (जगभरात सर्वाधिक)

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….