डॉ. अद्वैत पाध्ये

गुलजारजींची शायरी खूप काही सांगून जाते. कोणताही तागा विणताना विणकर खूप नजाकतीने तो विणतो. तागा विणताना तो तुटतो किंवा नाजूक होतो, तिथे तो गाठी मारतो पण अशा काही नजाकतीने वा कौशल्याने गाठी मारतो की त्या आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. पती-पत्नीसारखे नाते किंवा तसे बघता कोणतेही नाते हे अशा अनेक चढाव-उतारातून जातेच, तुटण्यासारखे प्रसंग येऊ  शकतात पण आपल्याला अशा न दिसणाऱ्या गाठी मारता आल्या पाहिजेत, नातेसंबंध टिकवता, जोपासता आले पाहिजेत. आपल्याला येत नसेल तर असे कौशल्याने नात्यांचे तागे विणण्यात मदत करणाऱ्या विवाह समुपदेशकांची मदत घेणे केव्हाही रास्त ठरते.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

विवाह समुपदेशनात दोन भाग येतात. एक म्हणजे विवाहपूर्व समुपदेशन आणि विवाहोत्तर समुपदेशन. विवाहपूर्व समुपदेशनात जोडीदाराची निवड कशी करावी, तसेच समजा जोडीदाराची निवड आधीच झाली असेल/ केली असेल, प्रेमविवाह असेल तरी एकमेकांशी समायोजन नीट व्यवस्थित होण्यासाठी आधीच काय खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन, सल्ला दिला जातो. विवाहोत्तर समुपदेशन हे विवाहानंतर कधीही म्हणजे लगेच, काही वर्षांनी, अनेक वर्षांनी कधीही काही समस्या आल्यास करता येऊ  शकते.

आज एकविसावे शतक सुरू होऊन दुसरे दशक पण पूर्ण व्हायला आले तरी एरवी तंत्रज्ञानातील बदल सहज स्वीकारणारा तरुण वर्ग लग्न/ विवाह या विषयांबाबत किंवा त्यातील बदल स्वीकारण्याबाबत तयार नाही. अजूनही ती पालकांच्या अखत्यारीतील बाब समजली जाते. ‘प्री-वेडिंग शूट’ अगदी आवडीने केले जाते, समाजमाध्यमांवर पसरवले जाते. पण स्वत:ची अचूक ओळख करून घेऊन जोडीदाराची डोळस पद्धतीने निवड कशी करायची हे मात्र समजून घेतले जात नाही. मग ‘प्री-वेडिंग’मध्ये एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडताना दिसणारे हे जोडपे अनेकदा, लवकरच वादाच्या वादळात, घटस्फोटाच्या फुफाटय़ात अडकताना दिसते.

स्वत:ची अचूक ओळख म्हणजे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची, स्वभावातील गुणदोषांची ओळख करून घेतली तर त्याच्याशी मिळतेजुळते जोडीदाराचे व्यक्तिमत्त्व बघता येऊ शकते. आधीच जोडीदार निवडला असेल तरी मग दोघांनी एकमेकांना कसे, कुठे समजून घ्यायचे, हे समजावून घेता येऊ  शकते. एकमेकांना अशा पद्धतीने ओळखणे हे खूप गरजेचे असते. यासाठी आपण आपला ‘मॅरेज बायोडेटा’ कसा तयार करायचा हे शिकता येते. स्वत:चे शिक्षण आणि जोडीदाराच्या शिक्षणाविषयीच्या, शिक्षणाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दलची आपली मते आणि जोडीदाराला प्रश्न, नोकरी, व्यवसाय, आर्थिक प्राप्ती, आर्थिक स्वातंत्र्य, स्थलांतर, आरोग्य, स्वत:च्या स्वभावाचे वर्णन, आपल्याला येणाऱ्या कला, खेळ, आवडीनिवडी, शिस्त, स्वच्छताविषयक सवयी व आग्रह, आपल्या राहणीमानाबद्दलच्या कल्पना, श्रद्धा-चालीरीतीविषयी धारणा, मैत्री, प्रेमप्रकरण, विवाहबाह्य़ मैत्री, संबंधाविषयीची मते, आपली आर्थिक विचारसरणी, पैसा, प्रतिष्ठा, करिअर, सामाजिक काम, बांधिलकी यांविषयीचा आपला प्राधान्यक्रम, आपल्या कुटुंबाविषयी कुटुंबातल्या वातारवरणाविषयी, विचारसरणीविषयी माहिती, आपल्या संसारात आई-वडिलांची भूमिका काय असावी यांविषयीची मते, लग्नसमारंभाविषयीच्या कल्पना, अपेक्षा, लैंगिक सहजीवनाविषयीच्या संकल्पना, माहिती, अपत्याविषयी विचार, एकमेकांचा पती-पत्नीच्या भूमिकांपलीकडे केलेला विचार असा सविस्तर ‘बायोडेटा’ केल्यास आणि समोरच्याशी त्या त्या बाबीवर विस्तृत चर्चा करून जोडीदाराची निवड करणे हे ‘कुंडली’चे ‘गुण’ जुळवण्यापेक्षा नक्कीच शास्त्रशुद्ध आणि कालानुगतिक आहे. असा सर्व बायोडेटा तयार करायला आपण विवाहपूर्व समुपदेशन नक्कीच घेऊ शकतो. त्यातून ही संकल्पना नीट समजावून घेतली तर पुढच्या विवाहोत्तर समायोजनात कमी त्रास/ समस्या येतात किंवा आल्या तरी ‘न दिसणाऱ्या गाठी’ मारून पुढे जाता येते.

विवाहोत्तर समुपदेशन हे कधीही घेता येऊ शकते. समस्या आल्यानंतर घेण्यापेक्षा समस्या न येण्यासाठी विवाहानंतर लगेच घेतले तर जास्त चांगले! समजा विवाहपूर्व समुपदेशन केले नाही तरी विवाहानंतर एकमेकांना वरील पद्धतीने समजून घेणे हे केव्हाही रास्तच!

बऱ्याचदा विवाहपूर्व समुपदेशन घेतले असले तरी, प्रत्यक्ष संसार सुरू झाल्यानंतर काही समस्या जाणवू शकतात त्या वेळीसुद्धा पुन्हा जाऊन समुपदेशन घेतले तर नक्कीच फायदा होईल. शेवटी प्रत्येक व्यक्तीच स्वत:चे वर्तुळ असते. ते स्वत:चं वर्तुळ तसेच ठेवून दोघांचं सामायिक वर्तुळ तयार करणे हे कौशल्याचं काम आहे. कारण मग अनेकदा ही वर्तुळं फक्त शेजारी-शेजारी राहतात किंवा एकमेकांवर कुरघोडी करत दुसऱ्याला व्यापण्याचा प्रयत्न करतात किंवा मग दूरच जातात. हे कौशल्य, कसब विवाहाचा अभ्यास केल्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी विवाहपूर्व-विवाहोत्तर समुपदेशन खूपच अत्यावश्यक आहे. संयुक्त कुटुंब नसलेल्या आजच्या जमान्यात विवाहाचा ‘इव्हेंट’ करण्यावर भर देण्यापेक्षा तरुण जोडप्यांनी ‘अ‍ॅडजस्टमेंट’ कशी सोपी होईल याचा विचार करण्यावर भर दिला पाहिजे.

Adwaitpadhye1972@gmail.com