‘रोज खाओ अंडे’ किंवा उन्हाळ्यात अंडी खाणे टाळू नका, असा संदेश देणाऱ्या दूरचित्रवाणीवरील जाहिराती आपण बघतो. पण तरीही रोज अंडी खाण्याबाबत अनेकांच्या मनात साशंकता असते. अंडय़ात प्रथिने असतात हे जसे सर्वाना माहीत असते, तसेच त्यात ‘कोलेस्टेरॉल’ही असल्यामुळे अंडी कितपत फायदेशीर असा प्रश्न खूप लोक विचारतात. अंडय़ांमध्ये आरोग्याला उत्तम असे अनेक घटक आहे. त्यामुळे ती खरोखरच अगदी रोज (हो, उन्हाळ्यातही!) खाता येतात. मुद्दा आहे तो अंडय़ातील पांढरा भाग आणि पिवळा बलक यातील फरकाचा.

वाढत्या वयातील मुलामुलींना समतोल आहार गरजेचा असतो. या काळात स्नायू व हाडांची वाढ होत असल्यामुळे शरीराला जास्त प्रथिनांची गरज भासते. त्यामुळे या वयात अंडे हे पौष्टिक अन्न आहे.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Weather Forecast
भारतात एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा इशारा
Padma Shri awardee, Chami Murmu, tree plantation, environmental protection, Saraikela Kharsawan district of Jharkhand
पर्यावरणरक्षणार्थ झाडं लावणाऱ्या चामी मुर्मू

अंडय़ातील प्रथिनांमध्ये ‘अमायनो अ‍ॅसिडस्’ असतात. यातील नऊ ‘इसेन्शियल’ अमायनो अ‍ॅसिडस् शरीर तयार करु शकत नाही अशी आहेत. ही अमायनो अ‍ॅसिडस् असलेल्या पदार्थामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात. प्रथिनांबरोबरच अंडय़ांमध्ये चरबी, ‘ड’, ‘बी १२’ आणि ‘अ’ जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस, सोडियम, कॅल्शियम, सेलेनियम आणि लोह ही खनिजे आहेत. अंडय़ातील ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोळे व त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयोग होतो. ‘ड’ जीवनसत्त्वामुळे हाडे व स्नायू बळकट होतात. अंडय़ातील लोह शरीरात चांगले शोषले जाते व त्यामुळे अ‍ॅनिमियासारख्या आजारांना प्रतिबंध होतो.

विशेष म्हणजे अंडय़ांमध्ये ‘कोलिन’ हा अन्नघटक देखील आहे. तो शरीरात कमी असेल तर ‘फॅटी लिव्हर’सारखे आजार होण्याची शक्यता असते. कोलिनमुळे मज्जासंस्थेचे कार्य सुधारते. गरोदरपणात कोलिन कमी पडले तर जन्मलेल्या बाळाला पुढे जाऊन ‘लर्निग डिसॅबिलिटी’ किंवा स्मरणशक्तीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. एका अंडय़ाच्या पिवळ्या बलकात ११५ मिलिग्रॅम कोलिन असते.

अंडे हे ‘लो सोडियम’ व ‘हाय पोटॅशियम’ असे अन्न आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, पर्यायाने हृदयविकार टाळण्यासाठी अंडय़ाचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. असे अनेक फायदे असूनही मोठी माणसे अंडी खाताना साशंक असतात. ही भीती असते ‘कोलेस्टेरॉल’ची. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. त्यासाठी अंडय़ाच्या पांढऱ्या व पिवळ्या भागांमधील फरक जाणून घेऊया.

एक अंडे साधारणपणे ५५ ग्रॅम वजनाचे असते. एका आख्ख्या अंडय़ात ७५ उष्मांक असतात. त्यात ६.२ ग्रॅम प्रथिने, ५ ग्रॅम चरबी आणि २१० मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल असते. महत्त्वाची बाब ही, की या घटकांचे प्रमाण अंडय़ाच्या दोन्ही भागांमध्ये वेगवेगळे असते.

  • अंडय़ातील पांढरे : एका अंडय़ाच्या पांढऱ्या भागात केवळ १८ उष्मांक, ९० टक्के पाणी आणि ४ ग्रॅम प्रथिने असतात. त्यात चरबी अजिबात नाही, म्हणजेच ‘कोलेस्टेरॉल’ही नाही. कमी उष्मांकाचे व चरबीरहित असे ‘एग व्हाइट’ सध्या वजन उतरवणाऱ्या व्यक्तींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. एका अंडय़ाचे पांढरे खाल्ले की दिवसभराच्या प्रथिनांमधील ५ टक्के वाटा पूर्ण होतो.
  • अंडय़ातील पिवळे : अंडय़ाच्या पिवळ्या भागात मात्र ५५ उष्मांक असतात. त्यात ५ ग्रॅम चरबी, २.२ ग्रॅम प्रथिने आणि २१० मिलिग्रमॅ ‘कोलेस्टेरॉल’ असते. कोलेस्टेरॉलच्या नावाखाली अनेक जण अंडे खाणे टाळत असले तरी अंडय़ाच्या पिवळ्या भागात ‘अ’, ‘ड’, आणि फोलेटसारखी जीवनसत्त्वे, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि सेलेनियमसारखी खनिजे अधिक असतात.
  • या तुलनेवरून साधारणपणे हे लक्षात येईल की वजन जास्त असलेले लोक, हृदयविकार व मधुमेह असलेले लोक तसेच रक्तातील कोलेस्टेरॉल ज्यांचे वाढले आहे अशांनी अंडय़ाचा पिवळा भाग टाळणे योग्य.
  • आजार नसलेल्या व्यक्तीसाठी रोजच्या आहारात ३०० मिलिग्रॅमपेक्षा कमी कोलेस्टेरॉल खाऊन चालते. परंतु आजार असलेल्या व्यक्तींच्या आहारात कोलेस्टेरॉल दिवसाला २०० मिलिग्रॅमपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. त्यामुळे एक अंडे पूर्ण खाल्ले तर इतर प्राणीजन्य पदार्थ (चीज, चिकन, मांस, दूध व दुग्धजन्य पदार्थ वगैरे) हे खाताना खूपच काळजी घ्यावी लागते. कारण त्यातूनही कोलेस्टेरॉल पोटात जात असते.
  • वर सांगितल्याप्रमाणे काही आजार असलेल्या व्यक्तींनी दर आठवडय़ाला दोन अंडय़ांचा पिवळा भाग खाऊन चालू शकेल. मात्र अंडय़ातील पांढरे दर दिवशी ४ ते ५ अंडय़ांचे खाता येते. कारण त्यातील प्रथिनांमुळे अधिक काळ भूक लागत नाही. ज्यांना प्रथिनांचे प्रमाण कमी करायला सांगितले आहे त्यांनी मात्र अंडे कोणत्याही स्वरूपात खाताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • अंडय़ांचे पदार्थ अनेक आहेत. ज्यांना उकडलेले अंडे आवडते त्यांनी ते तसे जरूर खावे. भुर्जी, ‘एग रोल’, ‘फ्रेंच टोस्ट’, ‘हाफ फ्राय’, ‘अंडा करी’ कशाही स्वरूपात अंडे खाता येते. ज्या मुलांना अंडी आवडत नाहीत, पण त्यांना अंडी खायचा सल्ला दिला आहे त्यांनी केक, पुडिंग वा मूस स्वरूपातही अंडे खाऊन चालेल. अर्थात त्यातील मैदा, लोणी वा क्रीम याच्या प्रमाणाचीही खाताना जाण ठेवायला हवी. ज्यांना नुसते अंडय़ातील पांढरे खायचे आहे त्यांना ऑम्लेट, भुर्जी वा ‘एग सॅलड’ करुन खाता येईल.
  • शक्यतो कच्चे अंडे खाऊ नये. कच्चे ‘एग व्हाईट’ वा पिवळा बलक खाल्ल्याने ‘सॅल्मोनेला टायफी’ या विषमज्वराचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
  • ज्यांना ‘एग व्हाइट’मधील प्रथिनांची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी मात्र अंडे नक्कीच टाळावे.

drjoshivaishali@gmail.com