08 March 2021

News Flash

प्रकृ‘ती’ : स्तन आजारांबाबत सावधान!

‘स्तनाचा कर्करोग’ हा वयोपरत्वे व आनुवंशिक पद्धतीने प्रदíशत होणारा समजला जातो.

स्त्रीरोगतज्ज्ञ व शल्यविशारद यांच्या तपासणीद्वारे स्त्रियांच्या स्तनांच्या आजाराचे निदान लवकरात लवकर होऊ शकते, तसेच स्तन-आजाराबाबत स्वत: स्तनाची तपासणी करण्याची सज्ञानता हे रोगनिदान लवकर होऊन उपचाराची आवश्यकता जाणवून पुढे पाऊल टाकण्यास महत्त्वाचे आहे. प्रत्येक आठ स्त्रियांमागे एका स्त्रीला स्तनाचा आजार आढळून येतो. पुरुषांमध्ये स्तनाची वाढ होणे हे स्वाभाविक नाही. जर पुरुषांच्या स्तनांमध्ये अशी गाठ दोन सें.मी.पेक्षा अधिक आढळून आली तर शस्त्रक्रिया करून काढून टाकणे हितावह आहे. या स्थितीला ‘गायनाकोमॅस्टिआ’ असं संबोधिले जाते. वयात आल्यानंतर कदाचित ही गाठ कमी होऊ शकते. ही संपूर्णपणे संप्रेरकाच्या पातळीवर अवलंबून असते. यात कर्करोग होण्याची शक्यता नसली तरी हल्लीच्या प्रदूषणाची पातळी लक्षात घेता कोणत्याही प्रकारची वेगळी पेशीवृद्धी ही तपासणीस पाठविणे जरुरीचे आहे.

‘स्तनाचा कर्करोग’ हा वयोपरत्वे व आनुवंशिक पद्धतीने प्रदíशत होणारा समजला जातो. म्हणूनच आईला जर स्तनाचा कर्करोग असेल तर सर्व मुलींनी आपली तपासणी व जनुकांचा अभ्यास करून घेणे आवश्यक आहे. तसेच स्तनाग्राद्वारे होणारा स्राव दुर्लक्षित करू नका कारण ५० टक्के यात काळजी करण्यासारखे नसले तरी अडीच ते तीन टक्के प्रमाणात कर्करोगाची ती पूर्वसूचना असते. या स्रावाचा रंग दूध, पाणी, पू, माती किंवा हिरव्या रंगाचा असू शकतो. कधी एका स्तनाग्रातून स्राव येत असेल तर त्याबरोबरच एखादी गाठ हातास जाणवू शकते. दोन्ही स्तनाग्रातून येणारा स्राव हा संप्रेरकामुळे असतो. त्याचे असंतुलन औषधाद्वारे योग्य स्थितीत आणता येते. परंतु विशेषत: मासिक पाळी थांबल्यानंतर, एका स्तनाग्रातून पाझरणारा द्रव व त्याखाली हाताला जाणवणारी गाठ दुर्लक्षित करू नका. यात कर्करोगाची शक्यता नक्कीच असते.

स्तनाचा कर्करोग म्हटलं की स्त्री स्वत:हून पुढे येऊन सांगणं हे काही वर्षांपूर्वी दुरापास्त होतं. पण आता साधी गाठ असली तरी अगदी १७ ते १८ वर्षांच्या मुलीही तपासणीस येतात. स्तनाच्या गाठी सर्वसाधारणपणे कर्करोगासंबंधित असतील तर त्या ३८.५ टक्के वेळा स्तनाच्या वरील बाहेरील बाजूस जाणवतात. तर स्तनाच्या मध्यभागी २९ टक्के तर वरील आतील भागात १४.२ टक्के तर खालील आतील भागात ५ टक्के तर खालील बाहेरील भागात ८.८ टक्के वेळा जाणवतात. काही जणींना दोन्ही स्तनात कर्करोग होण्याची शक्यता असते. स्तनाच्या गाठीबरोबरच काखेतील गाठीही वाढतात. त्यानुसार कर्करोगाची पातळी सांगितली जाते. कर्करोगाचे उपचार त्यावर अवलंबून असतात.

मागील भागात कर्करोगाव्यतिरिक्त असलेल्या गाठी व उपचार पाहिलेत तर कर्करोगाची गाठ ही घट्ट व विस्कळीत जाणवते, ती आतील भागास पूर्णपणे चिकटली असल्याने हलू शकत नाही. या गाठीबरोबर काखेतली गाठही विचारात घेणे जरुरीचे आहे.  ही गाठ जाणवते परंतु दुखत नाही. पण काही वेळेस दुर्लक्षित राहिलेल्या कर्करोगाने पूर्ण स्तनातून दरुगधी येऊन ती वाढ स्तनाबाहेर येऊन दुखू लागते. लवकरात लवकर निदान होऊन उपचार जरुरीचे आहेत. कर्करोगाची आखणी टी-टय़ूमर, एन- रिजनल लिम्फ नोडस, एम-मेटाटेसिस-म्हणजेच त्याचे बाहेर पसरणे अशी केली जाते. त्यानुसार शस्त्रक्रिया वा औषधे – औषधांचा डोस ठरविला जातो.

स्तनाच्या कर्करोगाची पातळी ठरविल्यानंतर शस्त्रक्रिया वा स्तनाचा कर्करोग असलेला भाग काढून रेडिएशन सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सीप्रमाणे हा निर्णय घेतला जातो. काही वेळेस टॅमॉस्कीफेमसारख्या औषधांचा योग्य वापर करून कर्करोग आटोक्यात ठेवला जातो. एॅडज्युवन्ट स्टिटेमिक केमोथेरेपी यात अनेक औषधांचा वापर करून कर्करोग आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

स्तनाचा कर्करोग यावर अनेक उपचार व वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आहेत. परंतु स्तनाचा कर्करोग – चाहूल लागताच क्षणी उपचारांकडे वळणं हे अधिक हितावह आहे. स्तनाच्या कर्करोगावर भाष्य हे वैज्ञानिक बठकीवर होणं जरुरीचं आहे. कर्करोगाच्या निदानात स्तनाग्रांना जोडणाऱ्या नलिकांचा कर्करोग, पॅजेट डिसीज, लोबार कारसिनोमा, इनव्हेजिव डक्ट कारसिनोमा, इन्फिल्टेिरग लोबार कारसिनोमा, इन्फ्लमेटरी कारसिनोमा असे नानाविध प्रकार असले तरी स्त्रीने आपल्या आरोग्याशी सतर्क राहणे महत्त्वाचे आहे.
woman-chart

rashmifadnavis46@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 3:09 am

Web Title: aware about breast disease
Next Stories
1 आयुर्मात्रा : गुळवेल
2 ‘मासिक’ स्वच्छतेचे दिवस!
3 राहा फिट! : सीट अप
Just Now!
X