कॅफीन ६० पदार्थापासून मिळते. चहा, कॉफी, शीतपेय, चॉकलेट, कोको पावडर, औषधे या पदार्थामध्ये कॅफीन असते. कामाचा थकवा दूर करण्यासाठी किंवा ताणतणाव कमी करण्यासाठी चहा, कॉफी यांसारखे पर्याय निवडले जातात. यातील कॅफीन या घटकामुळे व्यक्तीला तरतरी किंवा उत्साह येतो. कॅफीनच्या सेवनामुळे शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होते. कॅफीन हे मज्जासंस्थेवर काम करीत असल्यामुळे कार्यक्षम राहण्याची ऊर्जा मिळते. कॅफीनमुळे श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण, चयापचय व उर्त्सजन याचा वेग वाढतो, म्हणून या पेयाच्या सेवनामुळे तरतरी आल्यासारखे वाटते. सर्वसाधारणपणे हा उत्साह २० मिनिटे ते १ तासापर्यंत राहतो आणि पुन्हा चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा निर्माण होते. कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांना एक कप कॉफी किंवा चहा हितावह ठरू शकतो. प्रत्येक व्यक्तीने सरासरी २०० ते ४०० मिलीग्रॅम कॅफीनचे सेवन करणे आरोग्यासाठी हितावह ठरते. कॅफीनमुळे चयापचय वाढते, त्यामुळे वजन कमी करण्याच्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो.

एक कप म्हणजे २४० मिलीलिटर पेयातील कॅफीनचे प्रमाण

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Are you getting enough sleep at night 5 habits that are slowing down your
तुमची झोप पूर्ण होत नाही का? तुमच्या ‘या’ पाच सवयींमुळे बिघडते तुमचे चयापचय
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

एक्स्प्रेसो कॉफी – ४०० ते ७२० मिलीग्रॅम

चहा – १२० मिलीग्रॅम

कॉफी – १२० ते २०० मिलीग्रॅम

रेडबुल – १५० ते १६० मिलीग्रॅम

शीतपेय – ५० ते ६० मिलीग्रॅम

चॉकलेक मिल्क शेक – २ ते ७ मिलीग्रॅम

डार्क चॉकलेट – १५ ते ३५ मिलीग्रॅम

चहा जास्त उकळवल्यामुळे कॅफीनचे प्रमाण वाढते. साधारण

१ मिनिट चहा उकळवल्यामुळे २० मिलीग्रॅम, ३ मिनिटात

२८ मिलीग्रॅम, ५ मिनिटांत ४० मिलीग्रॅम कॅफीन निर्माण होते.

 

कॅफीनच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम

झोप न येणे.

अस्वस्थ वाटणे.

सतत राग किंवा चिडचिड वाढणे.

पोट खराब होणे.

रक्तदाब वाढणे.

डोकेदुखी (मायग्रेन).

वंध्यत्व.

हृदयाचे ठोके वाढणे.

पित्त वाढणे.

कॅफीनच्या अतिसेवनावरील उपचार

भरपूर पाणी प्यावे.  लिंबुपाणी घ्यावे.

फळ किंवा त्याचे रस घ्यावेत.  शहाळ्याचे पाणी घ्यावे.

तुळस किंवा पुदिन्याचे सेवन करावे.

 

गर्भवती महिलांना कॅफीन धोकादायक

गर्भवती महिलांनी कॅफीनचे सेवन टाळावे. सातत्याने दररोज २०० मिलीग्रॅमहून अधिक कॅफीन शरीरात गेल्यास गर्भातील बाळाचे वजन कमी होण्याची शक्यता असते. कॅफीनचे प्रमाण दररोज सरासरी ४०० मिलीग्रॅमपर्यंत पोहोचले तर गर्भपात होण्याचीही शक्यता असते. हे प्रमाण ४०० मिलीग्रॅमहून अधिक झाले तर हृदयाशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात.

डॉ. कांचन पटवर्धन, आहारतज्ज्ञ

डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ

(शब्दांकन – मीनल गांगुर्डे)