‘स्टॅटिक सायकलिंग’ म्हणजे घरातच किंवा व्यायामशाळेत सायकलिंगच्या मशीनवर केलेला व्यायाम. वजन कमी करण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतोच, पण मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या लोकांबरोबरच ज्यांचा चालताना मध्येच तोल जाऊ शकतो अशा व्यक्तींनाही स्टॅटिक सायकलिंगचा व्यायाम करता येतो. एखाद्या अपघातात पायाचे किंवा मांडीचे हाड मोडले, तर ते बरे झाल्यावर पूर्ववत दिनक्रम सुरू होण्याच्या काळात हा व्यायाम करता येतो. बाहेर खुल्या वातावरणात सायकल चालवणे केव्हाही चांगलेच, पण स्टॅटिक सायकलिंग चार भिंतींच्या आत आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या देखरेखीखाली करता येत असल्याने काही आजार असलेल्यांना त्याचा विशेष उपयोग होतो.

आजार असलेल्यांसाठी ‘स्टॅटिक सायकलिंग’
’ स्टॅटिक सायकलिंग हे आजार असलेल्या व्यक्तींनाही करता येत असले तरी मुळात सायकल चालवण्यासाठी शरीराची व्यवस्थित हालचाल करता यायला हवी. मधुमेह, हृदयविकार, गुडघेदुखी, दृष्टी अधू झाल्याने चालण्यावर मर्यादा आलेले लोक आणि स्थूल मंडळी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मशीनवर सायकल चालवण्याचा व्यायाम सुरू करू शकतात. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्यानमुळे आपल्याला किती सायकलिंग झेपेल, त्रास होऊ लागला तर काय करावे, सायकल मशीनच्या सीटची उंची किती ठेवली म्हणजे आरामात सायकल चालवता येईल, या गोष्टी प्रशिक्षित व्यक्तीशी बोलून घेणे गरजेचे.
’ मधुमेही व्यक्तींमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात नसणाऱ्या व्यक्तींना या सायकलिंगचा चांगला फायदा होतो. जेवणानंतर दोन तासांनी रक्तातील साखरेची चाचणी केली (पोस्ट प्रँडल शुगर) आणि ती वाढलेली आढळली तर ते बरे नव्हे. नियमित व्यायाम व मधुमेहीवरील इन्शुलिन हा त्यावरचा उपाय आहे, पण अनेक मधुमेही व्यायाम टाळतात. जेवणानंतर अर्धा किंवा एक तास स्टॅटिक सायकलिंगचा व्यायाम केल्यास ही ‘पोस्ट प्रँडल शुगर’ कमी येऊ शकते. ‘सौम्य ते मध्यम’ अशा प्रकारचा हा व्यायाम असावा. दुपारच्या जेवणानंतर बाहेर व्यायामासाठी जाणे शक्यही नसते. अशा शरीरातील वाढलेली साखर जाळण्यासाठी घरीच स्टॅटिक सायकलिंग करता येते.
’ मधुमेहात एखाद्या रुग्णाच्या पायाला जखम झाली किंवा मधुमेहामुळेच पावलाचा काही भाग कापावा लागला असेल तर चालण्या-फिरण्यावर मर्यादा येतात. त्यांना मशीनवर सायकल चालवताना पॅडलशी पाऊल नीट जुळवून घेऊन सायकलिंग करता येऊ शकते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
* हृदयविकार असलेल्यांना स्टॅटिक सायकलिंग करता येते. बाहेर रस्त्यावर सायकल चालवताना मात्र आपल्या चढ आल्यावर जोराने पॅडल मारावेच लागते. मशीनवर सायकल चालवताना जोर किती लावायचा हे आपण नियंत्रित करू शकतो. त्यामुळे हृदयविकाराचे रुग्ण स्टॅटिक सायकलिंग करताना त्यांच्या प्रकृतीनुसार कमी-जास्त जोर लावू शकतात, त्रास झाला तर लगेच व्यायाम बंद करून थोडी विश्रांतीही घेऊ शकतात.
* ज्यांना मोतीबिंदूसारख्या आजारामुळे कमी दिसते ते लोक बाहेर फिरू शकत नाहीत. त्यांनाही मशीनवर सायकल चालवण्याचा व्यायाम जमू शकतो.
* वयोमानापरत्वे गुडघ्यांची झीज झालेले लोक जास्त चालू शकत नाहीत व व्यायामाअभावी त्यांचे वजन वाढते. या व्यक्ती मशीनवर पायांना अधिक ताण न देता सायकल चालवू शकतात. कंबरदुखीचे रुग्णही डॉक्टरांच्या सल्ल्याने सायकल मशीन वापरू शकतात.
* मशीनवर सायकल चालवण्याचा व्यायामही इतर व्यायामांप्रमाणे नियमित केला तर फायदेशीर ठरतो. अनेक लोक फार उत्साहाने सायकलिंगचे मशीन विकत घेतात व काहीच दिवसांत ती टॉवेल वाळत घालण्याची जागा होते! हे नक्कीच टाळावे.
* सायकल मशीनवरही स्पोर्ट शूज घालून सायकल चालवलेली चांगली.

रस्त्यावरील सायकलिंग
* ज्यांना सकाळच्या खुल्या हवेत बाहेर साधी सायकल चालवणे शक्य आहे त्यांनी हा व्यायाम जरूर करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने व आपल्या प्रकृतीला झेपेल तसतसे सायकलिंग वाढवत नेता येते.
* वृद्ध किंवा काही आजार असलेल्या व्यक्ती रस्त्यावर सायकल चालवत असतील तर त्यांनी सायकिलगसाठी ठरावीक रस्ता निवडावा. आपल्याबरोबर आपले नाव, तातडीचे दूरध्वनी क्रमांक, रक्तगट वगैरे माहिती लिहिलेले ओळखपत्र बाळगावे. सायकल चालवताना काही त्रास सुरू झाला तर थांबावे व गरज भासल्यास लगेच वैद्यकीय मदत घ्यावी.
* सायकल चालवायला जाताना थोडे साखर-मीठ घातलेले पाणी, मधुमेह्य़ांनी लिमलेटच्या गोळ्या जरूर बरोबर ठेवा.
* गुडघेदुखी असणाऱ्यांनी बाहेर सायकल चालवण्यासाठी शक्यतो गिअरची सायकल वापरावी. त्याने गुडघ्यावर कमी ताण येतो.
डॉ. अभिजीत जोशी dr.abhijit@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…