25 March 2019

News Flash

कर्कविकार : ‘ट्रिपल निगेटिव्ह स्तन कॅन्सर’

४० वर्षांखालील स्त्रियांमध्ये या कॅन्सरची शक्यता अधिक असते.

भारतात दर तीन स्तनांच्या कॅन्सरग्रस्त रुग्णापैकी एक ट्रीपल निगेटिव्ह स्तन कॅन्सर रुग्ण आढळतो.

कर्करोगाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. म्हणूनच जगभरात विविध प्रकारच्या कर्करोगासंबंधीच्या प्रबोधनार्थ कॅन्सर दिन पाळला जातो. ३ मार्च हा जगभरात ‘ट्रीपल निगेटिव्ह स्तन कॅन्सर दिन’ पाळण्यात येतो. भारतात दर तीन स्तनांच्या कॅन्सरग्रस्त रुग्णापैकी एक ट्रीपल निगेटिव्ह स्तन कॅन्सर रुग्ण आढळतो. या  प्रकारात कॅन्सरपेशींच्या पृष्ठभागावरील केमोथेरपी चिकत्सिेला सहाय्यभूत ठरून विकृत कॅन्सरपेशींची वाढ थांबण्यास सहाय्यक  इस्ट्रोजेन (ER), प्रोजेस्टेरॉन (PR), हर-२ (HER-2) या तिन्ही रिसेप्टरचा अभाव असल्याने पारंपरिक केमोथेरेपी चिकित्सा तसेच दीर्घकाळ प्रतिबंधात्मक दिली जाणारी हार्मोनल चिकित्सा निरुपयोगी ठरते. परिणामी स्तनांच्या कॅन्सर प्रकारांमध्ये ‘ट्रीपल निगेटिव्ह स्तन कॅन्सर’ हा अधिक आक्रमक स्वरुपाचा कॅन्सर आहे. ४० वर्षांखालील स्त्रियांमध्ये या कॅन्सरची शक्यता अधिक असते.

१९९४ पासून सुरू झालेल्या वाघोली, पुणे येथील कॅन्सर संशोधन प्रकल्पात TNBC बाबत आतापर्यंत आढळलेली निरीक्षणे

संभाव्य कारणे –

* आहारीय कारणे- गोड, खारट, तिखट, तेलकट, आंबवलेले, बेकरीचे, जळजळ निर्माण करणाऱ्या पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन. मांसाहार , शिळे पदार्थ, गरम मसाल्याचे पदार्थ यांचे अतिप्रमाणात व वारंवार सेवन, जेवणाच्या अनियमित वेळा

* विरुद्धान्न – परस्परविरोधी गुणधर्माचा आहार (दूध व केळे एकत्र करून केलेली शिकरण, मिल्कशेक इ.)

* विहार कारणे- दिवसा झोपणे, रात्री जागरण, व्यायाम न करणे, भूक, तहान, मल-मूत्र विसर्जन या नैसर्गिक संवेदनांचा दुर्लक्ष करणे किंवा त्यांची बळजबरीने प्रवृत्ती

* स्त्रीविशिष्ट प्रजनन संस्थाविषयक कारणे- वयाच्या १२व्या वर्षांपूर्वीच मासिक पाळी सुरू होणे व उशिरा थांबणे, पहिले अपत्य वयाच्या ३०व्या वर्षांनंतर होणे, स्तनपानाचा अभाव/ बालकास अल्पकाळ/ एकाच स्तनातून  स्तनपान, स्तनप्रदेशी Benign Fibroadenoma स्तनप्रदेशी आघात, आधीच एका स्तनाचा कॅन्सर

*      मानसिक कारणे- संतापी, चिडचिडा, काळजी वा अतिचिंता करण्याचा, संवेदनशील, असमाधानी, निराशावादी, अंतर्मुख स्वभाव, दीर्घकालीन मानसिक ताण, मानसिक आघात, अपेक्षाभंग, फसवणूक

*      आनुवंशिक कारणे – कुटुंबात स्तन, स्त्रीबीजाण्ड व गुद – आतडय़ाच्या कॅन्सरची आनुवंशिकता, एकापेक्षा अधिक रक्ताच्या नातेवाईकांना स्तनांच्या कॅन्सरचा इतिहास, रक्ताच्या नातेवाईकांच्या ब्रॅका १ व २ या जनुकांत म्युटेशन म्हणजे बदल आढळणे

*  लक्षणे- स्तनाच्या ठिकाणी वेदनारहित अनियमित आकाराची गाठ / सूज किंवा बारीक खळगे पडणे (डिंपिलग)/ न थांबणारी खाज, स्तन दुखणे, स्तनाग्रातून स्राव, आत गेलेले (अंतर्मुखी) स्तनाग्र, अशक्तपणा/ वजन कमी होणे

* आधुनिक चिकित्सा – शस्त्रकर्म, केमोथेरेपी, रेडिओथेरेपी

* आयुर्वेदीय चिकित्सा

*     शमन- व्याधी निर्माण करणाऱ्या वाढलेल्या वात, पित्त, कफ दोषांना मुखावाटे औषधे देऊन साम्यावस्थेत आणणारी तसेच भूक व पचन सुधारणारी शमन चिकित्सा (गुटी- वटी इ.)

* पंचकर्म / शोधन – प्रकुपित दोषांना जवळच्या मार्गाने बाहेर काढून शरीरशुद्धी करणारी शोधन चिकित्सा पुढीलप्रमाणे –

* वमन- (औषधाने उलटी करविणे), विरेचन (रेचक औषधाने जुलाब करविणे), बस्ति (गुदमार्गाने औषधी तेल/ तूप किंवा औषधी काढे यांचा एनिमा देणे), रक्तमोक्षण (सिरावेध करून दूषित रक्त बाहेर  काढणे) व नस्य (नाकपुडय़ांतून औषधी तेल / तुपाचे थेंब सोडणे)

ट्रिपल निगेटिव्ह स्तनाच्या कॅन्सरमध्ये स्थानिक पुनरुद्भवाची तसेच अन्य अवयवांमध्ये कॅन्सर पसरण्याची शक्यता अधिक असल्याने शरीरशुद्धी करणारी पंचकर्म चिकित्सा विशेष फलदायी

* रसायन – धातूंना बल देणारी, व्याधी पुनरुद्भव टाळणारी चिकित्सा

* उपक्रम – मानसिक स्वास्थ्यासाठी शिरोपिचू (डोक्यावर औषधी तेलाचा कापसाचा बोळा ठेवणे), शिरोधारा (कपाळावर औषधी तेलाची धार सोडणे) यासारखे उपक्रम

* पथ्यकर आहार विहार मार्गदर्शन – पचण्यास हलका परंतु पोषक आहारविषयक तसेच स्वास्थ्यरक्षक विहाराबाबत मार्गदर्शन

* समुपदेशन – कॅन्सर आजाराविषयीची भीती घालविणे, सकारात्मक दृष्टिकोन रुजवून आत्मविश्वास वाढवणे, मानसिक कारणे दूर करणे यासाठी समुपदेशन उपयुक्त

३ मार्च ‘ट्रिपल निगेटिव्ह स्तन कॅन्सर दिन’ तसेच ८ मार्च ‘जागतिक महिला दिन’ निमित्त इंटिग्रेटेड ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर, वाघोली, पुणेतर्फे दिनांक ११ मार्च २०१८ रोजी मुंबईमध्ये वैद्य स. प्र. सरदेशमुख क्लिनिक, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बिल्डिंग, दादर -पूर्व (सकाळी ९ ते १) व ९ मार्च २०१८ रोजी इंटिग्रेटेड ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे येथे (सकाळी ११ ते ४) स्तनाच्या कॅन्सरग्रस्त स्त्रियांसाठी आयुर्वेदिक चिकित्सा सल्ला शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

वैद्य स. प्र. सरदेशमुख – ictrcpune@gmail.com

First Published on March 6, 2018 2:06 am

Web Title: breast cancer symptoms and causes